शाळकरी राहुल बनले सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ

आपल्याला उपलब्ध असलेल्या सुविधांचा केवळ वापर न करून न थांबता आपल्या प्रतिभेनं आपल्या असामान्य कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची किमया करून दाखवली आहे राहुल डॉमिनिक यांनी. फक्त १६ वर्षाच्या या शाळकरी मुलानं आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून सर्वांना आश्चर्यचकित करून सोडलं. अशा या प्रतिभान राहुलची चमकदार कथा.

शाळकरी राहुल बनले सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ

Thursday October 08, 2015,

5 min Read

राहुल डॉमिनिक. वय वर्ष १६. पौगंडावस्थेत असलेले राहुल विलक्षण अशा प्रतिभेचे धनी आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की राहुल आपल्या बेडरूममधूनच एक कंपनी ऑपरेट करतात. इतक्या छोट्या वयात एका कंपनीचे सीईओ बनलेल्या राहुलचं यश हे कोणत्याही वयाच्या उद्योजकासाठी एक उदाहरण बनलंय. राहुल युवरस्टोरीसोबत आपल्या प्रवासात लाभलेली नशीबाची साथ, कामाच्या प्रति त्यांची खरी निष्ठा, सध्याच्या आणि भविष्यातल्या योजनांबाबत अगदी उत्साहानं सविस्तर बोलतात

राहुल डॉमिनिक

राहुल डॉमिनिक


राहुल सांगतात की खेळण्यांसोबत खेळण्याच्या वयात ते कॉम्प्यूटरवर काम करणं शिकले होते आणि आपल्या वयाच्या नऊ किंवा दहाव्या वर्षापर्यंत ते प्रोग्रॅमींग सुद्धा शिकले होते. “ लहानपणापासूनच मी माझ्या वडिलांना कॉम्प्यूटरवर काम करत असताना बघायचो. त्याकाळात मला त्या कामाबद्दल अधिक काही माहित नव्हतं. पण स्क्रीनवर जे काही दिसायचं, ते मला आकर्षित करायचं. वडिल नेहमीच माझ्या शंकांचं निरसन करायचे आणि मला कधीही कॉप्यूटर वापरण्यापासून त्यांनी रोखलं नाही.

लहानपणापासूनच घरात कॉम्प्यूचरचा उपयोग करण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यानं राहुलना याबाबत शिकण्यासाठी बरीच मदत झाली. असं नाही की राहुलनी कधी चूका केल्याच नाहीत. आपण केलेल्या चुकांबाबत बोलत असताना ओठांवर हसू आणत राहुल त्यांच्या बालपणीचा एक किस्सा आम्हाला ऐकवतात.

ते चार वर्षांचे असताना आपल्या आईसोबत त्यांच्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. ही मैत्रीण सन मायक्रोसिस्टमच्या आयटी विभागात कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगचं काम करायची. त्या दिवसांमध्ये त्या एक प्रोग्रॅम तयार करण्यात गुंतलेल्या होत्या आणि १८ तास खर्ची घालून त्यांनी कोडिंग तयार केलं होतं आणि हा प्रोग्रॅम कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर उघडलेला होता. राहुलच्या आई आणि त्यांच्या मैत्रीण कॉफी पिण्यासाठी निघून गेल्या आणि राहुल त्या खोलीत कॉम्प्यूटरसोबत एकटेच राहिले. राहुल त्यावेळेसंदर्भात बोलताना सांगतात, “मला चांगलं आठवत नाही मी नेमकं काय केलं, पण मी जे केलं ते पाहिल्यानंतर माझ्या आईची मैत्रीण बेशुद्ध होता होता राहिली.” राहुलनी त्यांचा १८ तास मेहनत करून बनवलेला तो प्रोग्रॅम चक्क डिलीट करून टाकला होता.

१० वर्षांचे असताना राहुलनी प्रतिष्ठित एनआयआयटीत ‘सी’ प्रोग्रॅमिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्यांचं लहान वय पाहून तिथल्या शिक्षकांना आणि जीएमना त्यांच्या पात्रतेवर शंका निर्माण झाली. ते सांगतात, “ त्यांनी विचार केला की हा छोटा मुलगा काय करू शकेल. पण जशी जशी वेळ जाऊ लागली तसे तसे ते लोक माझ्या प्रतिभेनं प्रभावित होत गेले. तेव्हा पासून मी प्रोग्रॅमिंग करतोय.”

एक आवड म्हणून प्रोग्रॅमिंग सुरू केल्यानंतर जवळजवळ १२ वर्षांच्या वयात त्यांना पहिल्यांदा व्यवसायिक दृष्ट्या आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी एक फायनान्शियल कंपनी सुरू केली आणि राहुलनी त्यांना या कंपनीची वेबसाईट तयार करण्याबाबत सांगितले. त्यांच्या वडिलांनी त्यांना मोठ्या आनंदानं आपल्या कंपनीची वेबसाईट डिझाईन करण्याची संधी दिली.

ही वेबसाईट तयार केल्यानंतर जवळजवळ एका वर्षानंतर राहुलनी लहान मुलं आणि तरूणांसाठी ग्राफिक डिझाईन टूल तयार केलं. त्यांनी या टूलला नाव दिलं ‘ड्यूकोपेंट’. घरगुती कॉम्प्यूटरसाठी ते टूल तयार केलं गेलं होतं. लहान मुलं आणि तरूणांसाठी बनवलेला हा प्रोग्रॅम लवकरच मोठ्या लोकांनाही आवडू लागला. राहुल सांगतात, “ दरम्यानच्या काळात मला हे लक्षात आलं, की नोकरी करणारी आई घाईत घरी परतल्यानंतर जेव्हा संध्याकाळी जेवण बनवण्याची तयारी करते तेव्हा ब-याचदा तिला हे समजत नाही की आज काय बनवावं. ही परिस्थिती लक्षात घेऊन माझ्या मनात एक विचार आला की आपण पाकशास्त्रावर आधारित एक अॅप का तयार करू नये. लवकरच मी खाण्याबाबत एक अॅप तयार केलं. या अॅपच्या सहाय्यानं माझ्या आईसारख्या कामाला जाणा-या महिलांचं स्वयंपाक घरातलं काम खूप सोप होऊन गेलं. या अॅपच्या सहाय्यानं महिलांना त्यांच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या सामानाबाबत माहिती मिळते. यासोबतच हे अॅप आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या सामानानुसार आपण कोणती रेसीपी बनवू शकतो याचाही सल्ला देण्याचं काम करतं.”

एक खूप जुनी म्हण आहे “ गरज ही शोधाची जननी आहे.” या म्हणीचा प्रत्यय राहुलच्या प्रतिभेमुळे नक्कीच येतो. म्हणजे बघा, गेल्या वर्षी राहुल आणि त्यांच्या एका मित्रानं शाळेत न जाता एक दिवस सुटी घेतली. तेव्हा त्यांना हे जाणवलं की दुस-याकडून नोट्स गोळा करणं आणि प्रत्येक विषयाचा गृहपाठ घेणं खूपच कठीण काम आहे. अशा अडचणींचा अनुभव आल्यानंतर राहुलनी विद्यार्थ्यांची ही समस्या सोडवण्याच्या दिशेनं काम सुरू केलं आणि लवकरच त्यांनी त्यांचं ‘वियर्डइन’ हे सर्वात महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी प्रोजेक्ट तयार केलं.

राहुल म्हणतात, “ आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक असं व्यासपीठ उपलब्ध करून देऊ इच्छित होतो, ज्याच्या सहाय्यानं आपल्याला आवश्यक असलेली सर्व प्रकारची माहिती ते एकाच ठिकाणी मिळवू शकतील. तास संपल्यानंतर आमच्या शिक्षकाना जी जी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असते त्यासाठी ते ती माहिती फक्त आता ‘वियर्डइन’च्या सहाय्यानं टाईप करतात आणि सर्वच्या सर्व विद्यार्थ्याना ती उपलब्ध होते.

राहुल पुढे सांगतात, “ ‘वियर्डइन’च्या वापरासंदर्भात त्यांनी ३०० शिक्षकांमध्ये एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणातून आलेली माहिती आश्चर्यचकित करणारी आहे. हे अॅप खूप उपयोगाचं आहे असं सुमारे ८६ टक्के शिक्षकांनी या सर्वेक्षणात सांगितलं. प्रत्येकानच ‘वियर्डइन’बाबत अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आत्तापर्यंत फक्त एकच गोष्ट आहे जी नकारात्मक आहे आणि ती म्हणजे या अॅपची किंमत. आम्ही या दिशेनही काम करत आहोत आणि लवकरच हे वियर्डइन सर्वांच्या खिशाच्या आवाक्यात असेल.”

आपल्या हेतूबाबत बोलताना ते सांगतात, “‘वियर्डइन’ तयार करण्यामागे माझा मुख्य हेतू हा विद्यार्थ्याना इंचरनेटवरच वर्गासारखं वातावरण मिळवून द्यावं हा आहे. याच्या मदतीनं विद्यार्थी इंटरनेटवर आपल्या लेखन- वाचनासंबंधी माहितीचे आणि इतर अभ्यासासंबंधी गोष्टींचे इतर विद्यार्थ्यांसोबत आदान प्रदान करू शकतील आणि घर बसल्या अभ्यास देखील करू शकतील.”

एका बाजूला तर राहुल आपल्या मित्रांना ‘वियर्डइन’च्या सहाय्यानं अभ्यासात मदत करत आहेत, तर दुस-या बाजूला सर्वसामान्य लोकांची मदत करण्य़ासाठीही प्रयत्न करत आहेत. याच दिशेन काम करत त्यांनी एक अॅप तयार केलय. या अँपचं नाव त्यांनी ‘व्हेरीसेफ’ असं ठेवलय.

ही एक बेववर आधारित अशी सुविधा आहे, जिच्या मदतीनं तुम्ही देश वा जगाच्या कोणत्याही कोप-यातून मुख्य शहरांच्या सुरक्षेबाबत माहिती मिळवू शकता. सोप्या शब्दात सांगायचं झाल्य़ास तुम्ही कोणत्याही मोठ्या शहरात जाण्याअगोदर तिथलं वातावरण आणि परिस्थिती कशा प्रकारची आहे याबाबत माहिती घेऊन सावध होऊ शकता. या अँपमध्ये तुम्ही कोणत्याही मोठ्या शहरात घडणा-या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांबाबत देखील माहिती मिळवू शकता. या व्यतिरिक्त यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणांच्या एमर्जन्सी फोन नंबरची डिरेक्टरी सुद्धा मिळेल. ही डिरेक्टरी तुम्हाला कोणत्याही अडचणीच्या वेळी उपयोगी पडू शकेल. विशेष म्हणजे हे अॅप तुम्ही इंटरनेटवरून मोफत डाऊनलोड करू शकता हे सांगायला मात्र राहुल शेवटी मुळीच विसरत नाहीत.

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा