लघुउद्योजकांसाठी मोठे व्यासपीठ ‘हँलो शॉपी डॉट कॉम’!

0

आज कोणताही लहान-मोठा व्यावसायिक चांगल्या नफ्यासाठी ऑफलाइनच्या जोडीने ऑनलाइन अस्तित्वाची अपेक्षा करतो आहे. पण असे करण्यासाठी त्याच्याजवळ अत्यंत कमी पर्याय असतात. जे थोडेसे पर्याय असतात ते ब-याचदा महागडे असतात. व्यावसायिकांच्या या समस्येवर राजस्थान भिलवाडा येथील अरविंद काबरा यांनी ‘हँलो शॉपी डॉट कॉम’ या नावाने एक व्यासपीठ तयार केले. जिथे ऑफलाइन व्यावसायिक देखील आपले अस्तित्व नोंदवू शकतात.

इंदूरच्या इंदिरा बिझनेस स्कूलमधून एमबीए करणारे अरविंद बेवसाइट (संकेतस्थळ)विकासक देखील आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, एमबीएच्या अभ्यासाच्या काळात ते ऑनलाइन खरेदी करत असत. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, ऑनलाइन खरेदीची मागणी खूप वाढली आहे. अशावेळी एखाद्या उद्योजकाला त्याचे उत्पादन एखाद्या संकेतस्थळावरून (वेबसाइट) विकायचे असेल तर, त्या व्यावसायिकाची ओळख लपली जाते. त्यामुळे त्यांनी एक असे संकेतस्थळ सुरू करण्यसाठी प्रयत्न केला जेथे व्यावसायिकांना त्यांची ओळख कायम ठेवून विक्री करता येईल. अरविंद यांचे म्हणणे आहे की, ‘आम्ही असा मंच तयार केला की जेथे कोणीही व्यक्ती येऊन नोंदणी करू शकेल आणि आपले उत्पादन आपल्या नावानेच विकू शकेल.’

हँलो शॉपी डॉट कॉम
हँलो शॉपी डॉट कॉम

अरविंद यांच्यामते आतापर्यंत ई-कॉमर्सच्या क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला तीचे उत्पादन विकण्यासाठी स्वत:ची वेगळी वेबसाईट तयार करावी लागत होती आणि त्यात बराच खर्च करावा लागत होता. याशिवाय व्यावसायिकांना अनेक तांत्रिक बाबींचा सामना करावा लागत होता, पण आता त्यांच्याकरीता बनविलेल्या व्यासपीठावरून कोणत्याही व्यावसायिकाला आपल्या वस्तू विकता येणे सहजशक्य झाले आहे. अरविंद म्हणतात की, “आम्ही असा मंच तयार केला जिथे कोणीही येऊन नोंदणी करू शकतो, आणि आपली उत्पादने आपल्याच नावाने विकू शकतो” त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून प्रत्येकाला खास आयडी दिला जातो ज्यामुळे वेबसाईटवर करण्यात आलेल्या मागण्या थेट त्या-त्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचतात. या कामाकरीता ‘हँलो शॉपी डॉट कॉम’ कोणतेही दलालीशुल्क आकारत नाही तर विक्रेत्यांना केवळ पंधरा रुपये प्रतिदिवस या हिशेबाने शुल्क (भाडे) द्यावे लागते. विशेष म्हणजे कुठल्याही विक्रेत्याला हवी तेवढी मागणी नोंदणी करण्याची मुभा आहे.

‘हँलो शॉपी डॉट कॉम’ची सुरूवात या वर्षीच्या जानेवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर एप्रिल,२०१५मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्वरुपात नोंदणी करण्यात आली. आज ‘हँलो शॉपी डॉट कॉम’सोबत १५०पेक्षा जास्त विक्रेता जोडले आहेत, तर ६८हजार पेक्षा जास्त ग्राहक या संकेतस्थळावर नोंदणीकृत आहेत. ‘हँलो शॉपी डॉट कॉम’ मध्ये आठ जणांचा मजबूत संघ आहे. या वेबसाईटवर कपडे, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पुस्तके, आणि शंभरपेक्षा जास्त प्रकारची वेगवेगळी उत्पादने खरेदी करता येतील. अरविंद यांचा दावा आहे की, जेंव्हा त्यांनी ‘हँलो शॉपी डॉट कॉम’ची सुरूवात केली होती, त्यावेळी दररोज जेमतेम हजार लोक त्यांच्या संकेतस्थळाला भेट देत असत, पण आज ही संख्या पंचवीस हजारांच्या टप्प्यात गेली आहे. कंपनीच्या महसूलवाढीबाबत अरविंद सांगतात की, त्यात प्रत्येक महिन्यात पंधरा-वीस टक्क्यांची वाढ होते. कंपनीनुसार सध्या सर्वाधिक ग्राहक गुजरातमधून येत आहेत. त्यानंतर बंगळूरू आणि दुस-या शहरातील ग्राहक वेबसाईटवरुन खरेदी करु इच्छितात.

आता ‘हँलो शॉपी डॉट कॉम’ची योजना जास्तीत जास्त ऑफलाईन दुकानदारांना ऑनलाइनला जोडण्याची आहे. जेणे करून त्यांना दुहेरी नफा मिळवता यावा. त्यांच्यामते जे दुकानदार ऑफलाईन व्यवसाय करतात त्याना ऑनलाईनवरुनही ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करता यायला हव्यात. त्यामुळे अशा लोकांना जोडणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हानच आहे. अरविंद यांचे म्हणणे आहे की, जेंव्हा त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली होती तेंव्हा लोकांना त्याबाबत माहिती नव्हती की ऑनलाईनवरून वस्तू कश्या विकव्या? ते समजावून देण्यासाठी खूपच मेहनत करावी लागली. त्यानंतर जस जसे लोकांना समजू लागले तस तसे ही समस्या सुटू लागली. ऑनलाइन बाजारात उपलब्ध अशाप्रकारच्या दुस-या वेबसाईटबद्दल अरविंद सांगतात की, “दुसरे लोक दलालीशुल्क घेऊन काम करतात. आम्ही मात्र विक्रेत्यांकडून किमान शुल्क घेतो.” आपल्या अडचणींबाबत ते सांगतात की, अनेकदा लोक एखाद्या वस्तूची मागणी करुनही ती स्वीकारण्यास नकार देतात. त्यामुळे त्यांना खूपच नुकसान सहन करावे लागते. असे असले तरी ग्राहकांना एखादी वस्तू खरेदीकरण्यासाठी त्यांच्या वेबसाइट शिवाय ऍपच्या माध्यमातूनही खरेदी करता येऊ शकते.

वेबसाईट
वेबसाईट

राजस्थानातील भिलवाडा येथून आपला व्यवसाय चालवणा-या अरविंद यांचे म्हणणे आहे की, “ ही गोष्ट काही महत्वाची नाही की तुम्ही कुठून ऑनलाईन व्यवसाय करता कारण ऑफलाइनप्रमाणे तुम्हाला कुणी बघायला येत नाही की तुम्ही कुठे आहात?”

वेबसाइट : www.halloshoppee.com

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte