तुलसीराम करतात १२५० वृक्षांचे स्व:खर्चाने संगोपन

0

कोणत्याही अपेक्षित आणि विस्तृत बदलावासाठी मोठ्या योगदानाची गरज नसते ती आपल्या छोट्या छोट्या योगदानाने पूर्ण होते, मोठ्या कार्याचा पाया रोवून सकारात्मक समाज जागृती करण्यास यशस्वी होते. राज्यस्थानमधल्या बुंदी जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीतील एक कर्मचारी तुलसीराम यांच्या प्रयत्नाने आज ते बुंदी जिल्ह्यात सगळ्यांसाठी एक उदाहरण बनले आहे. तुलसीराम यांनी आपला आजूबाजूचा परिसर हिरवागार ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.


राज्यस्थानच्या बुंदी जिल्ह्यात राहणारे गरीब तुलसीराम हे एका सरकारी शाळेत कार्यरत आहे. शाळेच्या मोठ्या आवरातील जमिनीचा एक तुकडा जो पडिक होता, त्याला कचराकुंडीचे रूप आले होते, काही लोकांची त्यात रात्रीच्या वेळेस दारू पिऊन असामाजिक कृत्य करण्यात भर पडत असे.

सन २००७ मध्ये बुंदी जिल्ह्यातले तत्कालीन कलेक्टर एसएस बिस्सा यांनी पूर्ण क्षेत्रात १२५० रोपटे लावून संपूर्ण परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्या जागेचे नामकरण ‘पंचवटी’ असे केले. काही दिवसांनी त्यांच्या बदली नंतर झाडांची निगा राखून परिसराची साफसफाईची समस्या निर्माण झाली. अशा वेळेस तुलसीराम यांनी पंचवटी ची निगा राखण्याची धुरा सांभाळली. परिसर सदैव हिरवागार आणि सुंदर ठेवण्याचा त्यांनी संकल्प केला. निसर्गाची आवड असणारे आणि पर्यावरणाबद्दल सदैव जागरूक असणाऱ्या तुलसीरामला निसर्ग आणि झाडा झुडपांबद्दल खूप प्रेम होते. आपल्या मुलांप्रमाणे त्यांनी झाडांचे पालनपोषण सुरु केले. पण परिश्रमाव्यतिरिक्त या परिसराच्या निगराणीसाठी आर्थिक चणचण भासू लागली. तुलसीराम सांगतात की, " मला कुणाचीही आर्थिक मदत न मिळाल्यामुळे तसेच स्वतःचे मासिक उत्त्पन्न कमी असल्यामुळे त्यांना परिसराच्या निगराणीसाठी अडचणी येऊ लागल्या. मग ते स्वतःचा वर्षाभरातील एक महिन्याचा पगार पंचवटीच्या निगराणीसाठी खर्च करू लागले.घरच्यांचा तसेच मित्रांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न चालूच ठेवला.


तुलसीराम सांगतात की, "सृष्टीचे सहृदय मित्र बना, निसर्गाचे रक्षण करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. सध्या उद्योगनगरात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे, ज्याने देशाची प्रगती तर होत आहे मात्र त्याच्या जोडीला पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच गरजेचे आहे. आपल्या मुलांप्रमाणे ते या झाडांची देखरेख करतात.


जर आपण निसर्गाचे जतन केले तर भविष्यात येणाऱ्या पिढीला आपण स्वस्थ व पोषक वातावरण देण्यास सक्षम होऊ असे तुलसीराम सांगतात. आजकाल आधुनिकरणाच्या नवा खाली निसर्गाची मोठा प्रमाणावर हानी होऊन मोठ मोठे कारखाने उभारले जातात. ज्यामुळे वातावरण दुषित होऊन आरोग्याचे नुकसान होत आहे. तुलसीराम विकासाच्या विरोधात नाही पण पर्यावरणाच्या बदल्यात विकासाच्या तीव्र विरोधात आहे. आपल्या या दृढ संकल्पासाठी तुलसीराम यांना बरीच मेहनत करावी लागते. शाळेतील नोकरी नंतर ते सरळ पंचवटी ची साफसफाई तसेच निगराणी करतात.


लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे