स्वान सूटस्: ‘अतिथी देवो भव:’ चे साकार रूप

0

हैद्राबादच्या रंजना नाईक यांनी आपल्या पतीना मदत करता यावी म्हणून एक कॉल सेंटर सुरू करून उद्योग जगतात आपले पहिले पाऊल ठेवले. आज त्या ‘सर्व्हिस अपार्टमेंट’च्या दुनियेत एक अग्रगण्य कंपनी असलेली ‘स्वान सूट्स’ ही कंपनी यशस्वीपणे चालवत आहेत. रंजना नाईक यांनी आपल्या ‘कॉल सेंटर’ ने आपल्या उद्योगाची सुरूवात केली. मात्र पुढे प्रवास करत त्या ‘हॉस्पिटॅलिटी’च्या क्षेत्रात येऊन यशस्वी झाल्या. जर महिलांनी आपल्या क्षमतेचा काही अंश जगापुढे आणला तर ती काहीही करून दाखवू शकते याचेच हे एक उदाहरण आहे.

शिक्षण घेत असतानाच रंजना यांना आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. परंतु पदवीनंतर वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी ‘एपेक्स इंस्टीट्यूट ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग’ मध्ये मार्केटिंगची नोकरी सुरू केली. आपल्या कामाच्या प्रति असलेल्या त्यांच्या निष्ठेचा पुरस्कार त्यांना लवकरच मिळाला. त्यांना केंद्र प्रमुख बनवण्यात आले. ही नोकरी करत असताना त्यांची भेट नितीन यांच्याशी झाली. हेच नितीन पुढे रंजना यांचे जीवनसाथी बनले.

नितीन एका खासगी बँकेत क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत होते. त्या दिवसांमध्ये टेलीमार्केटिंग हे क्षेत्र भारतीय बाजारपेठेत एक विकसित होत असलेला व्यवसाय होता. नितीन त्यावेळी बंगळुरूला जाऊन एका डिलरकडून टेलीमार्केटिंगचे बारकावे शिकून घेतले. बंगळुरूहून परतल्यानंतर त्यांनी रंजना यांना एक कॉल सेंटर सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मग दोघांनी मिळून कॉल सेंटर सुरू केले.

रंजना सांगतात, “ आम्ही पट्टागंजामध्ये एक कॅमेरा भाड्याने घेतला आणि ‘स्वान फिनमार्ट’च्या नावाने एका कॉल सेंटरची सुरूवात केली. सुरूवातीला नितीनसाठी क्रेडिट कार्डाच्या नवीन ग्राहकांचा डेटा तयार करणे हे आमचे लक्ष होते.”

हे काम करत असताना रंजना ‘शॉपर्स स्टॉप’ आणि ‘लाईफस्टाईल’ सारख्या रिटेल चेन आऊटलेट यांच्या संपर्कात आल्या. रंजना यांनी या आऊटलेटच्या ग्राहकांचा डेटा डिजीटाईज करण्याचा संकल्प केला. या कामापासून त्यांना दोन फायदे होऊ शकले. पहिला फायदा म्हणजे त्यांना या कामाचे पैसे मिळाले आणि दुसरा म्हणजे त्यांना टेलीमार्केटिंगसाठी संभाव्य ग्राहकांचा डेटा मिळाला.

त्या सांगतात, “ डेटा एंट्री ऑपरेटरकडे मी माझा सारा डेटा सुपूर्द केला आणि माझी टेलीमार्केटिंगची टीम संभाव्य ग्राहकांना कॉल करण्याच्या कामाला लागली. या व्यतिरिक्त मी बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळवलेल्या ग्राहकांचा डेटा मिळवला. यानंतर आमचे काम अधिकच सोपे होऊन गेले. त्या वर्षी आम्ही ‘स्टँडर्ड चॅटर्ड डीएसए नेटवर्क’ मध्ये सर्वाधिक ग्राहक बनवले होते.”

लवकरच ‘स्वान फिनमार्ट’चा व्यवसाय चांगला चालू लागला. या कंपनीत ५० हून अधिक कर्मचारी वर्ग काम करत होता. परंतु त्याच काळात बँकांनी आपली नीती बदलली आणि त्यामुळे रंजना यांनी आपले हे काम बंद करण्याचे ठरवले.

त्याच काळात त्यांची भेट त्यांच्या एका जुन्या मित्रासोबत झाली. तो मित्र बंगळुरूमध्ये सर्विस अपार्टमेंटचा व्यवसाय करत होता. लवरकच दोघांनी हैद्राबादमध्ये भागीदारीत सर्विस अपार्टमेंटचे काम करणे सुरू केले. त्या वेळी बंगळुरूची टीम ग्राहक आणत असे, तर रंजना या हैद्राबादमध्ये ग्राऊंड ऑपरेशन सांभाळत असत.

रंजना सांगतात, “ सुरूवातीला आम्ही स्वीमिंग पूल आणि अन्य सुविधांनी सुसज्ज असलेले कॉम्प्लेक्स बनवले आणि सुरूवातीपासूनच आमच्या ८० टक्के खोल्यांमध्ये ग्राहक रहात असत. आमचा व्यवसाय चांगला चालण्यास सुरूवात झाली आणि काही महिन्यांनंतर अचानकपणे भागीदार आमची साथ सोडून गेले. यानंतर मी माझ्या हिंमतीवर हा व्यवसाय करायचा असे ठरवले आणि बाजाराचे सर्वेक्षण करणे सुरू केले.”

रिअल इस्टेटवाले रिकाम्या अपार्टमेंटचा गेस्ट हाऊस सारखा वापर करत आहेत आणि दररोज ग्राहक देण्याव्यतिरिक्त मासिक आणि वार्षिक या प्रमाणे त्यांना ग्राहक पुरवत आहेत असे रंजना यांच्या लक्षात आले.

यानंतर रंजना यांनी इव्हेंट मॅनेजमेंटच्या सहकार्याने हैद्राबादमध्ये काही दिवसांसाठी येणा-या लोकांना आपले अपार्टमेंट भाड्याने देऊ लागल्या. काही दिवसांमध्ये रंजना यांच्या मेहनतीला फळ आले आणि त्यांना दोन मोठ्या कंपन्यांसोबत कॉर्पोरेट करार करण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांच्या कामाला एक नवी दिशा मिळाली.

रंजना सांगतात, “दोन कॉर्पोरेट करार झाल्यानंतर आमच्या जवळजवळ ८५ टक्के खोल्या भरलेल्या राहू लागल्या आणि यामुळे आमच्या व्यवसायाला एक नवे परिमाण लाभले. २००८ च्या शेवटपर्यंत आमच्याकडे देण्यासाठी २८ तयार खोल्या होत्या आणि त्यांपैकी बहुतेक भरलेल्याच असायच्या. यानंतर मी माझ्या कामाचा विस्तार करायचा असे ठरवले.”

फेब्रुवारी २००९ मध्ये आपली नोकरी सोडून नितीन हे सुद्धा ‘स्वान सूट्स्’ या कंपनीसोबत जोडले गेले आणि आपल्या कामाचा विस्तार करण्याचे काम रंजना सुद्दा मोठ्या उत्साहाने करू लागल्या. सुरूवातीला २४ खोल्यांसोबत सुरू झालेल्या ‘स्वान सूट्स’ या कंपनीकडे आज १२५ खोल्या आहेत आणि आत्ताच्या घडीला कंपनीत १०० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत.

‘स्वान सूट्स’चा प्रत्येक निवासी सूट विशाल बैठक आणि डायनिंग क्षेत्र असलेले, सुंदर बेडरूम आणि एक स्वयंपाक खोलीने परिपूर्ण असलेले असे २००० वर्गफूटाचे सुसज्जित असे अपार्टमेंट आहे. या व्यतिरिक्त टीव्ही, एअरकंडिशन रूम सारख्या मुलभूत सुविधाबरोबर वाय-फाय ब्रॉडबँड इंटरनेट आणि व्यक्तिगत टेलीफोनची सुविधा देखील प्रत्येक सूटमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच प्रौढांसाठी एक जीम, स्वीमिंग पूल, टेबल टेनिस आणि योगकक्ष अशा व्यवस्था देखील आहेत. शिवाय लहान मुलांसाठी दिलेल्या खेळाच्या मैदानाच्या सुविधे मुळे ‘स्वान सूट्स’ ही कंपनी इतरांपेक्षा खूपच पुढे आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Stories by sunil tambe