सर्वांना परवडणारी आणि त्वरित उपलब्ध असणारी कार्यक्षम कारसेवा 'रोडर'

सर्वांना परवडणारी आणि त्वरित उपलब्ध असणारी कार्यक्षम कारसेवा 'रोडर'

Wednesday August 10, 2016,

6 min Read

ज्यांना राजधानी दिल्लीपासून इतर शहरांकडे जाण्यासाठी विनाविलंब टॅक्सीसेवा हवी आहे अशा प्रवाशांसाठी आता एक नवी कार्यक्षम कॅब कंपनी उपलब्ध झाली आहे. मुख्यत्वे दिल्ली एनसीआर (नॅशनल कॅपिटल रीजन) आणि उत्तर भारतातील महत्वाची शहरे यांच्या दरम्यानच्या स्वस्त प्रवासासाठी आयआयटी खरगपूरच्या काही माजी विद्यार्थ्यांनी, भाड्याच्या टॅक्सीज् पुरवण्यासाठी रोडर (आधीचं नाव इन्स्टाकॅब) या नावाची एक कंपनी सुरु केली आहे.

image


त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची भाडी, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी, इतर कंपन्यांच्या तुलनेत नक्कीच स्वस्त आहेत. एकेरी, म्हणजे बिनपरतीच्या, प्रवासासाठी कमी भाडी आकारणे त्यांना आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य वापरल्यामुळे शक्य झाले आहे. रोडरच्या सेवेमुळे आता प्रवाश्यांना चालकाशी जराही वादविवाद करावा न लागता, सुरक्षित आणि काटकसरीचा प्रवास करता येतो. “सर्वांना परवडेल अशी आणि त्वरित उपलब्ध असेल अशी कार्यक्षम आणि दर्जेदार वाहतूक व्यवस्था स्थापन करणे.” हे या कंपनीचे ब्रीद वाक्य आहे.

कोणत्या दोन शहरांदरम्यान प्रवास करावयाचा आहे यावर एकेरी किंवा परतीच्या प्रवासाची भाडी आकारण्यात येतात. मुख्य म्हणजे एकेरी प्रवास करणाऱ्यांकडून परतीचे भाडे घेण्यात येत नाही. भाड्यांच्या दरांत टोल, कर आणि चालकाचा भत्ता इत्यादी सर्व जास्तीचे खर्च यांचा पारदर्शक समावेश असतो.

image


रोडरचे सह-संस्थापक आणि ‘औद्योगिक अभियांत्रिकी व व्यवस्थापन’ या विषयाचे (डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीअल इन्जिनिअरिंग अँड मॅनेजमेंट चे) सन २०१३ चे माजी विद्यार्थी श्री. सिद्धांत मात्रे म्हणतात की “दरांची अपारदर्शकता, चालकांची मग्रुरी, आणि साधी टॅक्सी मागवायला अनेक ठिकाणी करावे लागणारे फोन, यासारखे कटू अनुभव आम्हाला भारतात सतत येत असत.”

त्यातच भाड्याच्या टॅक्सींचे महागडे दर आणि सार्वजनिक वाहन व्यवस्थेची सतत वाढतच जाणारी अकार्यक्षमता यांमुळे प्रवाश्यांच्या कष्टांत आणखी सारखी भर पडत होती. दोन शहरामधला एकेरी प्रवास करणाऱ्यांकडूनही विनाकारण परतीचे भाडे वसूल करणे यासारख्या अनैत्तिक रूढी तर वाहतूक क्षेत्रात अनेक दशके बिनदिक्कत चालू आहेत आणि त्या बदलण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणत्याही मोठ्या वाहतूक व्यवसायाने केलेला नाही. यावर काहीतरी उपाययोजना कोणीतरी करायलाच हवी होती आणि म्हणूनच आम्ही या व्यवसायात पडलो. दिल्ली एनसीआर मध्ये या नव्या व्यवसायाची सुरुवात करण्याचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या राजधानीकडे येणारा आणि तेथून बाहेर जाणारा प्रवासी वाहनांचा अतिप्रचंड लोंढा.

image


गुडगांव, फरीदाबाद, नॉयडा, चंडीगढ यासारख्या शहराचे सान्निध्य लाभल्यामुळे दिल्ली शहराची ओळख आता एक अतिमहत्वाचे औद्योगिक केंद्र अशी होऊ लागली आहे. याशिवाय, प्रवाशांना प्रचंड आकर्षण असलेली आग्रा, जयपूर, जैसलमेर, सिमला यांसारखी अनेक पर्यटन केंद्रे जवळपास आहेत. देशात प्रचंड मागणी असूनही, विश्वासार्ह आणि विनासायास वापरता येईल अशी प्रवासी वाहतूकसेवा ग्राहकांना योग्य दरात आतापर्यंत उपलब्ध नव्हती. ग्राहकांच्या अनंत अडचणी लक्षात आल्यानंतरची सहानुभूतीपूर्ण प्रतिक्रिया म्हणून रोडरने आपली सेवा सर्वप्रथम दिल्लीत सुरु केली. दिल्लीबाहेर जाणाऱ्या एकेरी प्रवासाची स्वस्तात सोय करणारी पहिलीच कॅब संस्था म्हणून महत्व प्राप्त झाल्यामुळे रोडरला चांगलाच लाभ उठवता आला आहे. संपूर्ण जगात यापूर्वी कोणत्याही कॅब संस्थेने तांत्रिक कौशल्याच्या सहाय्याने प्रवाश्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी असा पुढाकार कधीही घेतला नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. प्रवाश्यांच्या अनंत अडचणीवर मात करण्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण आणि टिकावू तोडगा शोधून काढण्यातच रोडरच्या संस्थापकांना खूप वेळ आणि श्रम खर्च करावे लागले.

अभिषेक नेगी, सहसंथापक - रोडर

अभिषेक नेगी, सहसंथापक - रोडर


आजमितीसही वाहतूक क्षेत्रात बाजारपेठेतला लक्षणीय हिस्सा पटकावून या क्षेत्रावर अधिकार गाजवणारा असा एकही मोठा व्यावसायिक अजून तरी दिसत नाही. तरीही, रोडरचा संभाव्य हिस्सा किती वाढेल हे अटळ भविष्य सांगण्याची घाई कंपनी अद्याप करणार नाही. ग्राहकांना अतुलनीय मोबदला देण्याची ताकद आणि नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करून अत्यंत कार्यक्षम केलेली सेवा यांचा फायदा घेऊन प्रगती करत करत येत्या काही वर्षांतच बाजारपेठेमधला शक्य तितका मोठा हिस्सा मिळवण्याचे स्वप्न रोडरने आज बाळगले आहे.

आशिष राजपूत, सहसंथापक - रोडर

आशिष राजपूत, सहसंथापक - रोडर


दिल्ली ते आग्रा हा एकेरी प्रवास टॅक्सीने करायचं म्हटलं तर इतर ऑपरेटर्स साधारणतः सहा हजार रुपये घेतात. त्या तुलनेत रोडर कंपनी फक्त रू. 2600/- घेते, म्हणजे निम्म्याहून जास्त स्वस्त दराने! शहराबाहेर जाणाऱ्या कोणत्याही परतीच्या प्रवासासाठीसुध्दा प्रती किलोमीटर रू. नऊ इतक्या स्वस्त दराच्या टॅक्सीज् प्रवाश्यांना मिळू शकतात. रोडरकडे बाहेरगांवच्या एकेरी किंवा परतीच्या प्रवासासाठी भाड्याने देण्यासाठी हॅचबॅक, सिडान किंवा एसयूव्ही या प्रकारच्या असंख्य कार्सची मोठी यादी तयार आहे. टॅक्सी व्यवसायाच्या अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे इतर कंपन्या एकेरी प्रवासासाठीसुध्दा परतीचे भाडे वसूल करतात पण रोडर मात्र एकेरीच भाडे घेते. त्यामुळे प्रवाशांना पन्नास टक्के कमी खर्च करावा लागतो. ग्राहकांना सुलभतेने टॅक्सीचे आरक्षण करता यावे यासाठी रोडरने अॅण्ड्रॉइड अॅप, वेबसाईट आणि कॉलसेंटर अशा तीन सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देता यावी यासाठी रोडरने आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वतोपरी उपयोग केला आहे. रोडरच्या सेवेच्या अप्रतिम दर्ज्याविषयी बोलताना ‘पॅरलल डॉट’चे संस्थापक अंगम म्हणतात, “उज्ज्वल कार्य! अत्यंत विश्वासार्ह सेवा!” लांबचा प्रवास करणाऱ्या स्त्री एक्झिक्यूटीव्हज् या नेहमी, भाड्याच्या टॅक्सी ड्रायव्हर्सकडून चांगली वागणूक आणि कामातली पारंगतता या तशा दुर्मिळ गुणांची अपेक्षा करत असतात. अॅकसेन्चुअर कंपनीच्या सॉफ्टवेअर डेव्हलपर अंकिता यांनी रोडरच्या ड्रायव्हर्सचे मात्र याबाबत फार कौतुक केले आहे. गुगलचे व्यूह-तंत्रज्ञ अभिषेक म्हणतात, “ माझा प्रवास कमीतकमी खर्चात होणार आहे असा विश्वास आता मी बिनधास्तपणे बाळगू शकतो. वाहतूक क्षेत्रात प्रवासभाड्याचे एकेरी दर आकारण्याची प्रथा नव्याने विकसित करून रोडरने, एकीकडे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम व कार्यक्षम सेवा आणि दुसरीकडे अत्यंत योग्य दर, असा दुहेरी फायदा ग्राहकांना देणे शक्य केले आहे”.

सिद्धांत मात्रे, सहसंथापक - रोडर

सिद्धांत मात्रे, सहसंथापक - रोडर


येत्या काही महिन्यांत आमचे कार्यक्षेत्र उत्तर भारतातील आणखी तीस शहरांत वाढवून तिथे घट्ट पाय रोवायचा आमचा मानस आहे. आमच्या वाहनांच्या दळणवळणात अधिक सुसूत्रता आणणे आणि ग्राहकांच्या मागणीला अनुकूल अशा सेवा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय राहील. सिध्दांत म्हणतात, “त्यानंतरच्या प्रगतीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी आम्ही आत्ताच नव्या उपक्रमांना पतपुरवठा करणाऱ्या काही संस्थांबरोबर (व्हेन्चर कॅपिटॅलीस्ट बरोबर) चर्चा सुरु केली आहे. साधारणतः एक वर्षानंतर देशाच्या इतर भागातही बस्तान बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला सुरुवात करणार आहोत”. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करण्याचा धंदा हा सतत सक्रीय रहाण्यावर पूर्णपणे अवलंबून असणारा असा उद्योग आहे आणि त्यात अनेक अनाकलनीय कोडी आहेत. आम्हाला येतील त्या अडचणी आम्ही एक एक करून सोडवणार आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नवनव्या कल्पनांचा जास्तीतजास्त फायदा उठवून प्रवासी वाहतूक क्षेत्रात एक टिकावू वातावरण प्रणाली स्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आयआयटी खरगपूरमधून इलेक्ट्रीकल इंजिनिरिंग हा विषय घेऊन सन २०१३ ला बी. टेक. पदवी प्राप्त करणारे, रोडरचे सहसंस्थापक अभिषेक नेगी म्हणतात, “ कोणताही अडथळा, कोणतीही अडचण न येता शहराबाहेरचा प्रवास स्वस्त व आरामात करता येण्याचा सुखकर अनुभव आमच्या ग्राहकांना घेता येईल अशी उत्तम वाहन सेवा उभारण्याची आमची मनीषा आहे.”

आयआयटी खरगपूरमधून जिओलॉजी आणि जीओफिजीक्स हे विषय घेऊन २०१४ साली ‘इंटिग्रेटेड एम्. एस्सी.’ ही पदवी मिळवणारे रोडरचे आणखी एक सहसंस्थापक आशिष रजपूत म्हणतात, “आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रमाणबध्द कार्यपध्दती वापरूनच आमचे हे ध्येय साधता येणार आहे. भारतातील वाहतूक व्यवस्था आज अत्यंत अपारदर्शक, सेवेच्या जबाबदाऱ्यांबाबत गुप्तता राखणारी अशी आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ उठवून या सेवाक्षेत्राला नक्कीच खूप पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवता येईल”.

या अप्रतिम नव-उद्योगाची कल्पना तुम्हाला कशी सुचली असं विचारल्यावर सिध्दांत म्हणतात, “ आमच्या नव्या उद्योगाकडे वाटचाल करताना आयआयटी खरगपूरने आम्हाला प्रचंड प्रोत्साहन दिले.”

“नवीन उद्योजकांना प्रोत्साहन आणि सल्ला देणे, यांना स्वस्तात जागा पुरवणे, सुरुवातीचे साहित्य आणि भांडवल पुरवणे यासारख्या कार्यासाठी ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी आंत्रप्युनर्स पार्क (STEP)’ ही संस्था आयआयटी खरगपूरमधून कार्य करत आहे. व्हेक्टो टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही आमची कंपनी STEP मध्ये नोंदवलेली आहे”. जेंव्हा जेंव्हा आम्हाला जरूर पडली तेंव्हा तेंव्हा आमच्या प्रोफेसरांनी आणि औध्योगिक क्षेत्रातील इतर तज्ञांनी आम्हाला बहुमोल माहिती निःसंकोच दिली आणि उदार मदत केली. कायदा, वित्त, व्यवसाय-विकास आणि इतर अनेक क्षेत्रांत नैपुण्य असणाऱ्या खरगपूरमधील तज्ञ व्यक्तींनी आम्हाला प्रचंड सहाय्य केले आणि त्यामुळेच आमच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. पुढेही अनेक वर्षांत आम्हाला अशीच मदत मिळेल याची मला अगदी खात्री आहे.

आयआयटी खरगपूरच्या जागतिक उद्योजक मेळा - २०१५ चे (ग्लोबल समिट – २०१५ चे) प्रतिष्ठेचे पारितोषिक आमच्या गटाला मिळाले आणि त्यामुळे अनेक महत्वाच्या कंपन्यांशी आणि भांडवल पुरवणाऱ्या व्यावसायिकांशी आमचे चांगलेच संबंध प्रस्थापित झाले.

वेबसाईट : www.roder.in

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा