स्त्रियांना स्वस्थ, कुटुंबाला आनंदी बनवण्यासाठी ‘राजलक्ष्मी’ यांनी घेतला वसा

स्त्रियांना स्वस्थ,  कुटुंबाला आनंदी बनवण्यासाठी ‘राजलक्ष्मी’ यांनी घेतला वसा

Monday April 25, 2016,

4 min Read

स्वस्थ कुटुंब हा सुखी जीवनाचा आधार आहे, हे शब्द एखाद्या जाहिरातीच्या मथळ्याची आठवण करून देतात. घरातील सगळे सदस्य आरोग्यदायी असतील तर आयुष्याची गाडी रुळावर उत्तम प्रकारे चालते, हे वास्तव आहे. जेवढे पुरुषांचे तेवढेच घरातील स्त्रियांचे निरोगी रहाणे अतिशय गरजेचे असते. पण घर व ऑफिस सांभाळण्याच्या तारेवरच्या कसरतीमुळे त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळच नसतो व त्यामुळे आपल्या आरोग्याला त्या दुय्यम स्थान देतात. एका सर्वेक्षणाद्वारे असे समोर आले की मागच्या काही वर्षात मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब व कॅन्सर सारख्या आजारांनी पीडित स्त्रियांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अशातच गरजेचे झाले आहे की स्त्रियांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत जास्तीत जास्त सतर्कता दाखवली पाहिजे. काही अशाच विचारसरणीच्या मुंबईस्थित राजलक्ष्मी यांनी २००७ मध्ये ‘बीफिट ओन्ली लेडीज जिम’ ची सुरवात केली ज्याचा एकच उद्देश आहे की स्त्रियांचे आरोग्य व तंदुरुस्तीशी संबंधित असणाऱ्या सगळ्या समस्या निवारल्या गेल्या पाहिजे.

image


राजलक्ष्मी यांनी युवर स्टोरीशी झालेल्या चर्चेत सांगितले की, जर घरची मुलगी आरोग्यदायी असली तर येणारी पिढी ही निश्चित सशक्त असेल, स्त्रिया घर चालवतात त्यामुळे त्यांची तंदुरुस्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. मी माझ्या घरात आईला व आजीला अनेक अडचणीतून जातांना बघितले आहे. माझे मानणे आहे की स्वस्थ व सुखी स्त्रीच एक आनंदी कुटुंब तयार करू शकते. तसेच जिम चालवणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही, पण माझी जिम ही फक्त स्त्रियांसाठीच असल्यामुळे त्या येथे निसंकोच व्यायाम करू शकतात. जिमची वेळ ही सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत असल्यामुळे नोकरदार स्त्रियांमध्ये बरीच लोकप्रिय आहे आणि हेच माझ्या यशाचे कारण पण आहे. याच यशामुळे २०१२ मध्ये एक नवीन शाखा उघडण्याची हिंमत मिळाली. मला वाटते की उद्योग चालवणे हे पाण्यात पोहण्यासारखे आहे कारण जेवढ्या लाटा जोरात येतात तेवढेच हात-पाय जोरात हलवावे लागतात.

image


राजलक्ष्मी यांनी फूड अॅण्ड न्युट्रिशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व २०१६ मध्ये त्यांना एमबीए इन एन्टरप्रेनिअरशिप ची पदवी देखील मिळणार आहे. त्यांनी १९९८ मध्ये मुंबईच्या घाटकोपरच्या फिटनेस वर्ल्ड मध्ये न्युट्रिशनिस्ट म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली व इथेच त्यांना फिटनेसची थोडीफार माहिती मिळाली. मनातल्या मनात त्या या स्वप्नांना आकार देऊ लागल्या. पण त्यांनी या स्वप्नाला आपल्या पर्यंतच मर्यादित ठेवले व २००० मध्ये मुंबईच्या नामांकित फिटनेस सेंटर तळवलकर्समध्ये काम करू लागला. या क्षेत्रातील चांगल्या अनुभवानंतर २००४ मध्ये त्या ब्रांच मॅनेजर झाल्या व याच दरम्यान त्यांना व्यवसायातील चांगल्या-वाईटाची पारख होऊ लागली. या कामाच्या अनुभवानंतरच त्यांना उद्योग सुरु करण्याबाबत काही विशेष बारकावे कळले व त्यांनी आपला मित्र जगजीत संघवाल यांना आपल्या कल्पनेबद्दल सांगितले. त्यांनी राजलक्ष्मी यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देण्याचे वचन दिले व २००५ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. यानंतर आपल्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याची त्यांनी वाटचाल सुरु केली पण त्यांचा हा निर्णय अनेक जणांना प्रथम दर्शनी आवडला नाही. अनेक जणांनी त्यांना त्यात फायद्या ऐवजी तोटेच जास्त असल्याचे सांगितले. राजलक्ष्मी सांगतात की, ‘’मी नेहमी हेच ऐकत आले आहे की कोणताही व्यवसाय हा अशा लोकांची सद्दी आहे ज्यांचे पूर्वज पण व्यावसायिक होते. स्वतःचा व्यवसाय चालवणे हे मध्यम वर्गीय म्हणजे आमच्या सारख्या लोकांचे काम नाही. माझे आई-वडिल सुद्धा थोडे चिंतीत होते पण स्वतःवरचा विश्वास, अनुभव व स्त्रियांच्या तंदुरुस्तीच्या क्षेत्रात काही तरी वेगळे करण्याच्या निश्चयाने मी २००७ मध्ये ‘बीफिट ओन्ली लेडीज जिम’ ची स्थापना केली. या व्यवसायासाठी माझे पती जगदीश यांनी ७५% व वडिलांनी २५% गुंतवणूक केली. चालू खर्च हा मी माझ्या बचतीच्या पैशातून भागवला. एका स्त्रीने आम्हाला फिटनेस ट्रेनिंगसाठी विना डिपॉझिट (अनामत) आपली जागा भाड्याने दिली. सुरवातीला उपकरणांची कमतरता असल्यामुळे ट्रेनिंग सेंटर मीच सांभाळत होते. स्वतःच्या मेहनतीने व परिश्रमाने मी नफा मिळवून देणारा व्यवसाय सिध्द केला व २०१२ मध्ये दुसरी शाखा उघडली.”

image


राजलक्ष्मी यांचे बीफिट जिम नवी मुंबई च्या घणसोली ते ऐरोली दरम्यान अतिशय प्रसिद्ध आहे. जिम मध्ये कार्डिओ फ्लोअर वर्क आउट्स, पिलाटीज, योगा, थर्मल सेशन्स, रेडीओ फ्रेक्वेंसी ट्रीटमेंट, पॅसिव स्लिमिंग ची सुविधा उपलब्ध आहे. इथे येणाऱ्या स्त्रियांना वेगवेगळ्या समस्या आहेत. काहींना अतिरिक्त वजनामुळे अनेक शारीरिक त्रास आहे तर काहींना प्रसूती नंतर पूर्वीचा फिटनेस परत हवा आहे. राजलक्ष्मी सांगतात की त्यांच्या जिम मध्ये एक कॅन्सर पेशंट होती जिला डॉक्टरांनी काही हलके व्यायाम व वजन कमी करण्याचा सल्ला दिला. स्पा ट्रीटमेंट व पॅसिव स्लिमिंग मार्फत त्यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी तसेच स्टॅमिना वाढवण्यासाठी तिची मदत केली. याशिवाय राजलक्ष्मी ट्रेनिंग अॅकॅडमी सुरु करणार आहेत ज्यामुळे महिलांना फिटनेस च्या क्षेत्रात आपला उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.

image


राजलक्ष्मी सांगतात की,’’ मला वाटते की स्त्रियांच्या फिटनेस संदर्भात उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रियांना गरजेचे प्रशिक्षण मिळून त्यांना यात यश मिळो. माझी इच्छा आहे की बीफिट ट्रेनिंग अॅकॅडमी तर्फे आम्ही स्त्री व्यावसायिक सक्षम करून या क्षेत्रात मी त्यांच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त काम करू इच्छिते.’’

बीफिट सदस्यांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप आहे जो वेळोवेळी यांच्यासाठी सहल, महिला दिन, हळदी कुंकू या सारखे कार्यक्रम आयोजित करतो. बीफिट लेडीज जिम चा उद्देश स्त्रियांचा आनंद व फिटनेस कायम राखण्याचा आहे. अशी विचारसरणी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय गरजेची आहे कारण एक स्वस्थ व सुखी स्त्रीच एका संपन्न कुटुंबाचा आधार स्तंभ असते. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

सहज सुटसुटीत प्रसुतीचा मॉडर्न पर्याय म्हणजे 'डान्स ऑफ बर्दींग'

इमेज कंसल्टिंगने बनवा आपली पर्सनालिटी आणि यशस्वी व्हा

नूतन वर्षात स्थुलतेपासून सुटका ऋतू रानी यांचे अचूक उपाय

लेखिका - शिखा चौहान

अनुवाद - किरण ठाकरे