'योग्य वातावरण' हाच आहे मायक्रोसॉफ्टच्या यशाचा मंत्र : श्रीकांत कर्णकोटा

'योग्य वातावरण' हाच आहे मायक्रोसॉफ्टच्या यशाचा मंत्र : श्रीकांत कर्णकोटा

Sunday October 02, 2016,

2 min Read

माणसाच्या बौध्दीक सक्षमतेला, त्यातील उपलब्धता, कला आणि अभिव्याक्तीलाच त्याची संस्कृती म्हणून ओळखले जाते, त्यांच्या रितीभाती आणि सामाजिक वागणूकीला, किंवा एका सामाजिक समूहात वावरताना केलेल्या कृतीला आणि व्यावहारीक वैशिष्ट्यांना संस्कृती म्हटले जाऊ शकते.

टेकस्पार्क२०१६ कार्यक्रमाच्या दरम्यान मायक्रोसॉफ्ट एज्यूरचे कंट्री हेड श्रीकांत कर्णकोटा यांनी स्टार्टअप आणि इतर कंपन्यांच्या संस्थापकांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे की, कोणते काम कसे पूर्ण करावे, हा निर्णय घेण्याची कला संस्कृतीला जन्म देते. संस्कृतीचा अर्थ अनेक प्रकारच्या मुल्यांमध्ये किंवा व्यावहारिक स्वरुपाच्या परिभाषेत सांगितला जाऊ शकतो- इतरांच्या प्रति सातत्य, प्रामाणिकता, आदर सारखी अनेक मुल्ये त्यात समाविष्ट आहेत.

image


श्रीकांत यांच्या मते हीच मुलभूत मूल्य कंपनीच्या संस्कृतीची ओळख करून देतात आणि हे देखील निश्चित करतात की कंपनी कोणत्या दिशेने आणि कशी वाटचाल करेल. मायक्रोसॉफ्टच्या विकासाचा मूलमंत्र कंपनीत योग्य प्रकारचे वातावरण असणे हा आहे. विकासाला पूरक संस्कृतीबाबत प्रकाश टाकताना श्रीकांत यांनी मायक्रोसॉफ्टशी संलग्न मुल्य आणि नफ्याशी जोडल्या गेलेल्या उदाहरणातून हेच स्पष्ट केले की, त्यामागे कंपनीच्या संस्कृतीचे कसे योगदान आहे. जेंव्हा सन २००९मध्ये मायक्रोसॉफ्टने आपले सर्च इंजिन बिंग चे अनावरण केले त्यावेळी अनेकांनी शंका उपस्थित केली की, आणखी एका सर्च इंजिनची काय गरज आहे? या नव्या प्रकल्पाबाबत बाहेरच्या जगात फारच गैरसमज होते. आज सात वर्ष निघून गेली आहेत आणि डेस्कटॉपवर सर्चच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचा वाटा २१.६टक्के आहे. श्रीकांत यांच्या मते मेहनत आणि कार्यरत राहण्याची जिद्द ही दोन वैशिष्ट्येच एखाद्या उत्पादनाला उच्च स्तरावर नेऊन ठेवतात.

योग्य संस्कृतीची निर्मिती कशी करणार?

केवळ तंत्रज्ञानातून कंपनीचा विकास होत नाही, हे काम तोवर पूर्ण होत नाही जोवर कंपनीकडे चांगले विचार नसतील, ज्यालाच आम्ही संस्कृती म्हणतो. त्यामुळे सारे काही माहिती करून घेण्यापेक्षा गरज आहे की आपण काही चांगले शिकावे. श्रीकांत म्हणतात की कंपनीला आपले कर्मचारी आणि कर्मचा-यांच्या आणि व्यवस्थापनामध्ये एक संस्कृती विकसित करण्याची गरज आहे. इतकेच नाही तर ते म्हणतात की, अत्यंत अनुकूल संस्कृतीबाबत मोठमोठ्या चर्चा किंवा पॉवर पॉईंट स्लाईड पर्यत मर्यादीत न राहता ती संस्थापक आणि कर्मचारी यांच्या मन-मष्तिष्काचा भाग झाली पाहिजे.