‘अपनी शाला’मुळे आता शाळाही झाल्या, नैतिकता आणि जीवनमूल्यांची पाठशाळा!

 ‘अपनी शाला’मुळे आता शाळाही झाल्या,
     नैतिकता आणि जीवनमूल्यांची पाठशाळा!

Wednesday October 28, 2015,

4 min Read

नेल्सन मंडेला यांनी म्हटल होतं- ‘शिक्षणच एक असे आयुध आहे ज्यातून जगात सकारात्मक बदल होऊ शकतात.’ परंतू त्यांचे हे म्हणणे केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादीत आहे? एक मूल जीवन जगण्याची कला आणि अनुभवातून मिळालेले शिक्षण कुठून शिकून येते? कोणत्याही मुलाला शिक्षणाव्यतिरिक्त इतरही कौशल्य तितकीच आवश्यक आहेत जितके शिक्षण आवश्यक आहे. दुर्दैव हे आहे की, आमच्या देशात जीवन कौशल्य प्रशिक्षण या विषयाबाबत कुणीही गांभिर्याने विचार करीत नाही. जेंव्हा ही गोष्ट गरीब आणि निम्नवर्गीयाबाबत असते तेंव्हातर या बाबी त्यांच्यात खूपच कमी आढळून येतात.

शालेय विकास आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण यातील वाढत्या दरीला कमी करण्यासाठी तीन मैत्रिणीनी असे पाऊल टाकले जे या दिशेने लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा यशस्वी प्रयत्न ठरले. श्र्वेता, अनुकृती आणि अमृता यांनी मिळून ‘अपनी शाला’चा पाया रचला. मुलांच्या सामाजिक आणि भावनात्मक विकासासाठी ‘अपनी शाला’ गरीब मुलांना मदत करते.

image


जिथे विद्यालये गणित, विज्ञान, इतिहास आणि भाषेच्या ज्ञानावर जोर देतात तिथेच त्यांच्याकडून जीवन कौशल्य प्रशिक्षण आणि प्रयोगशिल शिक्षण यासारख्या महत्वाच्या बाबी दुर्लक्षित राहतात. आजच्या मुलांना त्यांचा सामाजिक विकास होणे तेवढेच आवश्यक आहे. ती व्यवहार कुशल व्हावीत. त्यांच्यात समस्यांचे समाधान करण्याची क्षमता असावी त्यासोबतच निर्णय घेण्याची क्षमता देखिल असावी. या गोष्टी केवळ पुस्तकी शिक्षणातून मिळवता येत नाहीत.

श्र्वेता, अनुकृती आणि अमृता यांनी आपल्या अथक प्रयत्नातून यातील बदलांचा पाया घातला आहे. श्र्वेता यांनी काही काळ मुलांना शिकवले आहे. त्या दरम्यान एका घटनेने त्यांच्या विचारांचा दृष्टीकोनच बदलून टाकला आहे. जेंव्हा त्या ‘इच वन टिच वन’ मध्ये शिकवित होत्या तेंव्हा तेथे एक मुलगा येत होता जो खूपच आग्रही होता. त्याचे कोणी मित्र नव्हते आणि त्याचे विचारही खूपच नकारात्मकतेने भरलेले असत. त्याच्याबाबत जेंव्हा श्र्वेता यांनी जाणून घेतले तेंव्हा समजले की,त्याच्या अशा वागण्याच्या मागे काय कारण आहे? त्यावेळी श्र्वेता यांना समजले की, त्याचे वडील खूपच मद्यपी होते आणि मुलांना शिव्या देत होते. याशिवाय हा मुलगा शाळेनंतर काम देखिल करत होता. या घटनेने त्यांना विचार करण्यास विवश केले. तो मुलगा तेच शिक्षण घेत होता जे इतर मुले घेत होती, परंतू त्याच्यात जीवन कौशल्याची कमतरता होती. त्यानंतर श्र्वेता यांनी ठरवले की, त्या या दिशेने काहीतरी काम नक्की करतील जेथे त्यांना अशा प्रकारच्या मुलांना मदत करता येईल. त्यानंतर त्यांनी ‘प्रथम’ या संस्थेत प्रवेश घेतला. सोबतच त्यांनी आपले पुढील शिक्षण देखिल सुरूच ठेवले आणि टाटा समाजविज्ञान संस्थेत शिक्षण घेऊ लागल्या. काही काळाने त्यांनी टि आय एस एस मधून एम. ए. सोशल इंटरप्रिनीअरशिप या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांची भेट अमृता आणि अनुकृती यांच्याशी झाली. त्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. अनुकृती यांना नेहमीच एक उद्यमी व्हायचे होते. तर अमृता मनोवैज्ञानिक होत्या आणि समुपदेशन देखिल करत होत्या. तिघींनाही हे माहिती होते की त्यांना काही नविन करायचे आहे. ज्यात मुले आणि शिकवण्याचा समावेश असेल. तीनही मैत्रिणींचे विचार आणि लक्ष्य एकसारखेच होते त्यामुळे तिघीनी एकत्रच काम सुरू केले. ठरवले की त्या मुलांना जीवन कौशल्याचे शिक्षण देतील.

उद्दीष्ट ठरले होते परंतू मार्ग सोपा नव्हता. आता त्यांच्याकरीता सर्वात आवश्यक होते की, त्या वेगवेगळ्या शाळांना जीवन कौशल्य प्रशिक्षणाचे महत्व पटवून देतील जेणेकरून त्यांना या शाळांत जाऊन मुलांना प्रशिक्षित करता येऊ शकेल. त्या अनेक शाळांमधून गेल्या परंतू पदरी निराशाच पडली. मग त्यांनी ठरवले की, या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत का घेतली जाऊ नये? ज्या संस्था मुलांसाठी आधीपासूनच कार्यरत आहेत. या स्वयंसेवी संस्था आधीपासूनच शाळांशी सलग्न असतात. त्यामुळे मुलांपर्यंत पोहोचणे सुलभ होणार होते. मग तिघींनी मिळून वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांशी चर्चा केली आणि त्यांना त्यात यश देखिल आले. परंतू अजूनही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावाच लागत होता. जसे सरकारी परवानगी घेणे. याशिवाय देखिल छोट्या मोठ्या अडचणी येतच होत्या.

एका बाजुला अशा अडचणींचा सामना करावा लागत होता त्याचवेळी एक चांगली बाब ही होती की, त्यांना निधीबाबत डीबीएसचे सहकार्य मिळाले. आता त्यांना केवळ पुढाकार घेऊन सेवा द्यायची होती. निधीच्या चिंतेतून त्या मुक्त झाल्या होत्या.

त्या मुलांच्या अंगभूत प्रायोगिक प्रशिक्षणासाठी अनेक गोष्टी करतात. जसे गोष्टी सांगणे, अभिनय आणि विविध प्रकारचे खेळ. आता त्यांना असे वाटते की, ‘अपनी शाला’ ज्या प्रकारचे प्रयोग करते आहे त्या दिशेने व्यापक प्रयत्न व्हावेत. भारताच्या प्रत्येक शाळेत प्रायोगिकता आणि जीवन कौशल्य प्रशिक्षणाला प्राधान्य मिळावे. पुढील वर्षात ‘अपनी शाला’ चे लक्ष्य अकराशे मुलांना प्रशिक्षण देण्याचे आहे. या शिवाय शिक्षकांनाही या कामात जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, जेणेकरून या कामाला आणखी गती देता येईल.