१४००० रुपयांपासून कंपनी सुरु करून विनीत वाजपेयी यांचा शून्यापासून शिखरापर्यंतचा अद्भुत प्रवास !

१४००० रुपयांपासून कंपनी सुरु करून विनीत वाजपेयी यांचा शून्यापासून शिखरापर्यंतचा अद्भुत प्रवास !

Saturday April 16, 2016,

5 min Read

व्यक्तीच्या यशामध्ये नशिबाची एक महत्वाची भूमिका असते, परंतु ती व्यक्ती त्याच्यावर अवलंबून नसते. यशाच्या इमारतीत जितके आवश्यक नशिबाचे सिमेंट आहे, त्याहून अधिक महत्वाचा त्याचा पाया आणि भिंती आहेत, ज्या आपले मजबूत विचार आणि दृढ निश्चयाने बनतात. ‘मँगनॉन ग्रुप’ चे संस्थापक आणि अध्यक्ष विनीत वाजपेयी यांचा ‘शून्य’ ते ‘शिखरा’ पर्यंतच्या प्रेरणादायी प्रवास हेच सिद्ध करतो. ‘आसमान से आगे’ पुस्तक लिहिणारे विनीत वाजपेयी यांची ओळख त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकातून खूप मिळती जुळती आहे. ते आपल्या जीवनात सर्वात पहिले एक लक्ष्य निर्धारित करतात. त्यानंतर महत्वाकांक्षा आणि ‘जिद्दी’ने त्याला गाठण्यासाठी प्रयत्न करतात. ते सध्याच्या त्या यशस्वी उद्योजकांमध्ये सामील आहेत, ज्यांनी आपल्या स्टार्टअपची सुरुवात एका लहानशा किंमतीपासून केली आणि काही वेळातच त्याला एका ‘डिजिटल मार्केट’चे रुप दिले. 

image


विनीत वाजपेयी यांनी केवळ २२ व्या वर्षात आपल्या व्यवसायाची सुरुवात १४ हजार रुपयांसोबत केली होती. असे म्हणतात की, संघर्षाशिवाय यश मिळत नाही. विनीत या कथनाला चांगल्याने समजत होते. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी आणि प्रतिष्ठीत लाल बहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्थेतून एमबीए करणा-या विनीत यांनी ‘स्थायी नोकरी’ आणि संघर्षात’, संघर्षालाच आपला जोडीदार निवडले. ते जीई कँपिटल मध्ये काम करत होते, त्याच दरम्यान त्यांनी डीजिटल एजेन्सी मँगनॉनच्या परिकल्पनेला साकार रूप दिले. ते एक स्थायी स्वरुपाची नोकरी करत होते. ज्यात पुढे जाऊन त्यांचे पद आणि वेतन देखील वाढण्याची शक्यता होती.

मात्र विनीत यांच्या मनात काहीतरी वेगळेच सुरु होते. त्यांना काहीतरी स्वतःचे करायचे होते. कदाचित त्यांना आपल्या कर्तुत्वावर खूप विश्वास होता. त्यांनी उशीर न करता, जीई – कँपिटल मधून नोकरी सोडली आणि मित्रांसोबत मिळून वर्ष २०००मध्ये ‘मँगनॉन’ चा पाया रचला. विनीत यांच्या कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शनात ‘मँगनॉन ग्रुप’ ने एकानंतर एक शिखर प्राप्त केले होते. विनीत वाजपेयी, ‘डिजिटल वर्ल्ड’ मध्ये एक नाव बनले होते. विनीत यांच्या ग्रुप ‘मँगनॉन’ ने मोठमोठे डिजिटल -प्रोजेक्ट आपले बनविले होते. मँगनॉन ग्रुपच्या महसुलाच्या आकड्यांमध्ये (मागे लागणा-या शून्या मध्ये) सतत वाढ होत होती. विनीत यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “सुरुवातीला मुलभूत संसाधनांच्या नावावर ‘मँगनॉन’ जवळ एक जनरेटरची खोली, दोन संगणक आणि दोघे सोबत काम करणारे होते. मात्र यापेक्षा अधिक मोठी गोष्ट जी आमच्याकडे होती, ती म्हणजे मनौधैर्य. आम्हाला माहित होते की, योग्य दिशेने काम केल्यास यश नक्कीच मिळेल.”

सध्या ‘मँगनॉन ग्रुप’ च्या कंपन्या मँगनॉन/टीबीडब्ल्यूए आणि मँगनॉन इजीप्लसचे दिल्ली, मुंबई आणि बंगळूरू सारख्या शहरात कार्यालय आहे. २५० हून अधिक व्यावसायिक मँगनॉन ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. नॅस्काॅमची सदस्यता असलेले, आयएसओ ९००१ने प्रमाणित, मँगनॉन ग्रुप कडे हायर, डायकिन, हुंडाई, हैवलेट – पॅकर्ड आणि स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक आणि इतिहाद जसे मोठे ग्राहक आहेत.

वर्ष २०१२मध्ये विनीत वाजपेयी यांना अजून एक मोठे यश मिळाले होते. जगातील डिजिटल जगतातील प्रतिष्ठीत नाव असलेले ‘टीबीडब्ल्यूए ग्रुप’(जे फोर्च्युन ५००ओमिनिकॉम ग्रुपचा भाग आहे.) ने मँगनॉन ग्रुपचे अधिग्रहण केले. अधिग्रहण केल्यानंतर देखील, विनीत मँगनॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यरत राहिले. इतकेच नव्हे, मार्च २०१४ मध्ये ‘टीबीडब्ल्यूए, ने विनीत यांना, त्यांच्या विशाल अनुभव आणि कुशल नेतृत्व क्षमतेला बघता, टीबीडब्ल्यूए इंडिया ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. ते या पदावर नोव्हेंबर २०१५पर्यंत राहिले. आता विनीत मँगनॉन ग्रुपच्या अध्यक्षांची जबाबदारी सांभाळत आहेत. 

image


२०१४ मध्ये इंपॅक्ट नियतकालिकाच्या डिजिटल इंडस्ट्रीच्या १०० प्रभावी लोकांच्या यादीत विनीत सामील होते. २०१३ मध्ये सिलिकॉन इंडिया पत्रिकेने आपल्या मुखपृष्ठावर विनीत यांना भारतीय मिडियाचा नवा पोस्टर बॉय असल्याचे सांगितले. विनीत यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. २०१३ मध्ये लाल बहादूर शास्त्री (कॉर्पोरेट एक्सिलेंस) पुरस्कार, २०१२ मध्ये एमीटी (कॉर्पोरेट एक्सिलेंस) पुरस्कार, २०११मध्ये सीएनबीसी टीवी मर्सिडीज बेंज यंग तुर्क पुरस्कार आणि आशिया पॅसिफिक उद्योजकतेच्या पुरस्काराने नावाजण्यात आले आहे.

नुकतेच विनीत यांनी ‘टॅलंटट्रैक’ या आपल्या एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. विनीत यांनी सांगितले की, ‘टॅलंटट्रैक’ एक असे परस्पर संवादात्मक मंच आहे, जेथे मिडिया, कला आणि रंगमंच जगताशी जुडलेल्या प्रतिभा आपल्या कलेसाठी योग्य संधी शोधू शकतात. या अभिनव मंचाला इंडस्ट्रीमधून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. आतापर्यंत ३० हजारपेक्षा अधिक कलाकारांची नोंदणी ‘टॅलंटट्रैक’ वर केली आहे. विनीत सांगतात की, “देशात प्रतिभेचे भंडार आहे. येथे लोकांमध्ये खूप प्रतिभा आणि कला आहे. काही लोकांना संधी मिळते. काही लोक संधी न मिळाल्याने निराश होतात. ‘टॅलंटट्रैक’ प्रतिभाशाली लोकांसाठी संधी देण्याचे माध्यम बनेल. आम्ही ‘टॅलंटट्रैक’ च्या मंचामार्फत लोकांना स्टार बनवू.”

विनीत यांच्यात सकारात्मकता आणि तत्परता होती. आपल्या उद्योजक होण्याच्या प्रवासादरम्यान विनीत यांनी (इंग्रजी भाषेत) व्यवस्थापनावर दोन पुस्तके ‘ड स्ट्रीट टू द हायवे’ आणि ‘बिल्ड फ्रोम द स्केच’ देखील लिहिले. ज्यानंतर हिंदीमध्ये त्यांचे पुस्तक ‘आसमान से आगे’ देखील प्रकाशित झाले. त्यांच्या पुस्तकाला समाजाच्या प्रत्येक वर्गाकडून (मुख्यत: उद्योजकतेचा वर्ग) खूप प्रशंसा मिळाली आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून विनीत युवा उद्योजकांना आपला व्यवसाय पुढे वाढविण्यासाठी प्रेरित करतात. ते सांगतात की, "एका लहानशा व्यवसायाला मोठे बनवले जाऊ शकते. फक्त गरज आहे, आत्मविश्वासाची आणि जिद्दीची जी आपल्याला खूप पुढे घेऊन जाते. जर तुमच्या हातात एखाद्या कामाची कमान सोपविली जाते, तेव्हा सर्वात पहिले काम तुमच्यासाठी अभिवृत्तीत परिवर्तन करण्याची असते. तुमची अभिवृत्ती झाली पाहिजे, नाही तर मी आराम करणार नाही आणि आराम करू देणारही नाही.” विनीत सांगतात की, कुठल्याही स्टार्ट- अप ला वाढविण्यासाठी एखाद्या विशेष रणनीतीची गरज नसते. तुमची मेहनत आणि समर्पण स्वतःच यशाचा प्रकाश दाखवेल.

विनीत सांगतात की, “थोडे धैर्य... जास्त समर्पण...आणि सलग मेहनत, तुम्हाला यशस्वी बनविते.”

या सारख्या आणखी काही यशस्वी उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एक लाखांवरुन १०० कोटी रुपये, इ-कॉमर्स स्टार्टअपच्या विकासाचा सातत्यपूर्ण आलेख

प्रेम जैन : ८६३ दशलक्षी डॉलरच्या Insieme Networks मागचा खंदा हात!

पंकज नवानी यांच्या ʻबिन्सर फार्म्सʼचा प्रेरणादायी प्रवास



लेखक : रोहित श्रीवास्तव

अनुवाद : किशोर आपटे