मॅगी डोएन: लहानवयात पाठीवरून सामान वाहून नेणा-या; ज्या आता आहेत नेपाळमधील ५०मुलांची माता!

0

दहा वर्षांपूर्वी ज्यावेळी १८ वर्षांच्या मॅगी डोएन यांनी न्यूजर्सी मध्ये पाठीवर ओझे घेवून आपले घर सोडले, त्यावेळी त्यांनी स्वत: देखील चारशे अनाथ मुलांसाठी आपण नेपाळमध्ये शाळा सुरू करू असा विचार केला नव्हता. अन्यथा ही मुले दगड फोडायला गेली असती किंवा ते विकायला गेले असते कोणत्याही शिक्षणाची अपेक्षा न करता.

ज्यावेळी मॅगी यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, त्यांना महाविद्यालयात जाण्यापूर्वी जग काय आहे ते जाणून घ्यावे असे वाटले. त्यांचा हा निर्णय त्यांना स्वत:बद्दलची नवी ओळख देणारा होता आणि त्यांच्या जीवनात त्यांना काय करायचे आहे ते सांगणारा होता. त्यांच्या प्रवासाचा भाग म्हणून त्या उत्तर भारतात रहायला आल्या, जेथे त्यांना नेपाळमधून निर्वासित म्हणून आलेल्यांची दशा दिसली जे यादवी युध्द सुरू असताना तेथे आले होते.


Image: The Huffington Post
Image: The Huffington Post

त्यांच्या यादवी युध्दातील अनेक दर्दभ-या गोष्टी ऐकताना मॅगी यांना वाटले की नेपाळमध्ये नेमके काय सुरू आहे ते जाणून घ्यावे. मॅगी नेपाळला गेल्या तेथे त्यांना हिमी, एक सहा वर्ष वयाची मुलगी भेटली, जी रोज दगड फोडायला जात असे. हिमी काही एकटी नव्हती, लहान मुले दगड फोडायला जात होती आणि उपजिवीकेसाठी ते विकत होती हा त्यांचा जीवनाचा परिपाठ होता.

अशावेळी त्यांनी विचार केला की त्या लहानश्या मुलीला शक्य त्या सा-या प्रकारे मदत केली पाहीजे. त्या काळच्या आठवणी सांगताना मॅगी म्हणतात की, “ मी काही या मोठ्या दृष्टीकोनातून सुरूवात केली नाही. मी एका लहान मुली पासून सुरूवात केली. मी माणूसकीने विचार केला : या पुढे काय? आणि आता, पुढे काय? आणि नंतरचे पाऊल होते विशिष्ट काळानंतर घरी परत जाणे, कारण अनेक मुलांना अशी जागा हवी होती जिथे राहता यावे. ती मुले सुरक्षित नव्हती. त्यांचे पालक नव्हते, ती अनाथ होती. मला माहिती आहे की मी शाळेबाबत विचार करू शकत नव्हते, मी त्यांना भेटले त्यावेळी त्यांच्या मुलभूत गरजा महत्वाच्या होत्या. शाळा तर चैन होती. त्यांना घर आणि प्रेम हवे होते, कुटूंब हवे होते.”

असा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बारा वर्षे गेली, आणि मॅगी यांनी आता अनाथमुलांसाठी घर बांधले आहे, आणि या देखभाल नसणा-या मुलांसाठी शाळा देखील सुरू केली आहे. याशिवाय त्यांनी महिला केंद्र सुरू केले आहे ज्यात लैंगिक छळ झालेल्यांना आसरा दिला जातो. समाज मंदीर आणि आरोग्य केंद्र देखील सुरू केले आहे.

Image: The New York Times
Image: The New York Times

मॅगी यांनी सुरू केलेले दि कोपीला व्हॅली स्कूल २०१० मध्ये सुरू झाले ज्यात सध्या चारशे मुले शिकतात आणि त्यातून बहुतांश त्यांच्या कुटूंबातून प्रथमच शाळेत आली आहेत. त्यांचा प्रयत्न हा आहे की या मुलांना जीवनाचा आदर्श वस्तुपाठ घालून द्यावा, ज्यातून अनेक मतभेद बाजूला करून ही मुले पुढे जावू शकतील. मॅगी यांचा विश्वास आहे की ही जबाबदारी प्रत्येकानं पार पाडली पाहिजे.

त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेवून २०१५मध्ये त्यांना सीएनएन हिरो ऑफ दी इयर म्हणून गौरविण्यात आले. कोणताही सकारात्मक प्रतिसाद नसताना त्या सुरखेत नेपाळ, येथे कार्य करत आहेत, त्यांना देखील वाईट दिवसांचा सामना करावा लागला. त्या काळात कसे राहिलो त्याबाबत त्या सांगतात की, “ ते असे दिवस होते की मी निराश होत असे, परंतू माझ्या शयनकक्षातून बाहेर चालत येत असे आणि आजूबाजूला ही मुले पळताना पाहत असे. त्यावेळी हा बदल मला माझ्या डोळ्यासमोर यावा ही इच्छा निर्माण होत असे.”