'पॉप्स किचन' बेकरी व्यवसायातील यशस्वी उद्योजिका : शिवाली प्रकाश

0

चॉको लावा पिझ्झा हे 'पॉप्स किचन'चे एक वैशिष्ट आहे. याव्यतिरिक्त बैनोफी पाई ,रेड वेलवेट केक, डेथ बॉय चोकलेट केक,आणि ब्लुबेरी चीज केक हे यांच्याद्वारे तयार होणारे विशेष आणि प्रसिध्द व्यंजन आहे. आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी बहुतेकांना केकच हवा असतो. म्हणूनच पॉप्स किचनची धुरा शिवाली प्रकाश हिने यशस्वी पणे सांभाळली आहे. जिचा प्रयत्न आपल्या ग्राहकांना प्रेमाने खाद्य व्यंजन सादर करण्याचा आहे. बेंगलोर स्थित ह्या घरगुती व्यवसायाने सन २०१२ मध्ये पॉप्स किचनची स्थापना केली. शिवालीचे प्रेरणास्थान असलेल्या तिच्या वडिलांनी ३० वर्षापूर्वी बेंगलोर सेंट मार्क्स रोड वर सॅनिटरीच्या एका रिटेल आऊटलेटची स्थापना केली. साल २०१२ मध्ये वडिलांच्या मृत्यूने शिवाली एकदम एकाकी झाली. तिने नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचे आत्मनिरीक्षण करू लागली. ती सांगते की तिचे वडील नेहमी तिचे प्रशंसक आणि प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी तिने स्वतः एक उद्यमी होण्याचा निर्णय घेतला. ‘ पॉप्स किचन ' हे नाव त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आले ".


प्रारंभ

शिवालीने सन २०१० मध्ये क्राईस्ट कॉलेज मधून पदवी घेतली. त्यानंतर एक्सेंजर कंपनी मध्ये मार्केटिंग आणि कम्युनिकेशन टीम बरोबर ती दोन वर्ष कार्यरत होती. ती सांगते की, "तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की ती बेकरीच्या क्षेत्राला एवढ्या गंभीरतेने घेईल. अनपेक्षितरीत्या तिने तीन वर्षापूर्वी यशस्वीपणे बेकरीच्या कामाला व्यवसायाच्या रुपात प्रारंभ केला. चेहऱ्यावरच्या स्मित हास्याने शिवाली सांगते की, मी खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ आहे. प्रारंभी तिने आपले नातेवाईक ,मित्रपरिवार यांच्या समारंभप्रसंगी केक देऊन त्यांची प्रशंसा मिळविली. वाढत्या प्रतिसादाने तिचा हुरूप वाढला. प्रसिद्ध चित्रपट कलाकार विवेक ओबेराय यांच्या मुलीच्या जन्मानिमित्त केक तयार करण्यासाठी मिळालेल्या संधीमुळे बेकिंग व्यवसायाला उभारी मिळाली. यानंतर ऋतिक रोशनकडे सुद्धा तयार कपकेक पोहोचविण्यात ती यशस्वी झाली.


बेंगलोरची मुलगी

बेंगलोर मध्ये जन्मलेली आणि मोठी झालेली शिवाली गेल्या २७ वर्षातल्या या शहराच्या झपाट्याने झालेल्या आधुनिकीकरणाची साक्षी आहे. ती सांगते ‘’माझे बालपण हे अतिशय आनंदात गेले. तिचे शालेय शिक्षण बिशप कॉटनगर्ल्स हायस्कूल मध्ये झाले. अभ्यासाव्यातिरिक्त मी वॉइस ट्रेनिंग, पियानो, गिटारच्या वर्गांना जात होती. लहानपणापासून मी एक उत्तम खेळाडू आहे. ’’शिवालीच्या सांगण्याप्रमाणे प्रयोग आणि नवे उपक्रम शिकण्यासाठी तसेच पाकशास्त्र शिकण्यासाठी बेंगलोर सारखे दुसरे शहर नाही. या व्यतिरिक्त ह्या शहरात खूप मोठा तरुण वर्ग आहे. त्यांच्यात कामाची अपार शक्ती आणि आत्मविश्वास आहे. व्यावसायिकदृष्ट्या त्यांचे विचार प्रगल्भ आहेत. आपल्या कलात्मक गुणांना वाव मिळण्यासाठी हा वर्ग उद्योग- धंद्यात आपला ठसा उमटवीत आहे. मोठ्या क्षमतेचा एक छोटा व्यवसायपण कमी वेळेत आपली वेगळी ओळख बनविण्यात कार्यक्षम ठरत आहे. ह्या पद्धतीने प्रवेश मिळवून ते यशस्वी होत आहे. ती विश्वासाने आणि ठामपणे हे सांगू शकते कारण ती स्वतः याची साक्षीदार आणि एक भाग आहे. बाजारात आपले स्थान पक्के करण्यासाठी तिने सुरुवात घरातल्या बेकरीपासून करून मग आपल्या ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवून त्यांच्या पसंतीची स्वीकृती प्राप्त केली .


भविष्यात शिवाली एक आउटलेटची स्थापणा करण्यासाठी पुढे वाटचाल करीत आहे.

पॉप्स किचन –

मिठाई ( मिष्टान्न) तसेच स्वादिष्ट, चमचमीत पदार्थ हे पॉप्स किचनचे वैशिष्ट्ये आहेत . शिवाली वाढदिवस, लग्नसमारंभ, साखरपुडा आणि इतर कार्यक्रमांसाठी केक आणि कपकेक तयार करते.

शिवालीने बनवलेल्या केकची चव खाणाऱ्याच्या जिभेवर रेंगाळू लागली आहे. शिवाली आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून कामाची प्रसिद्धी करीत आहे. लवकरच ती एक वेबसाईट सुद्धा सुरु करणार आहे. फेसबुकचा वापर वास्तविक मार्केटिंग साठी असून अधिकतर व्यवसायाची सफलता ही मौखिक प्रशंसेवर निर्धारित आहे. याच्यापेक्षा महत्वाचे असे की, पॅकेजिंगच्या माध्यमाद्वारे ती आपल्या ब्रांडची सत्यता सुनिश्चित करीत आहे. ती आठवड्याला जवळ जवळ ५० केक तयार करते आणि दिवसेंदिवस ह्या संख्येत वाढ होत आहे. ती बिलासाठी कॅश आॅन डिलीवरीच्या माध्यमाचा उपयोग करते. शिवाय नियमित केक घरपोच सेवेसाठी एका व्यक्तीला नियुक्त केले आहे. ती सांगते की ३ डी सारख्या विशेष तयार होणाऱ्या केकच्या डिलिवरीसाठी एक वेगळा डिलिवरी बॉय ठेवला आहे जो आपल्या मोटारीने केक मुळ रुपात आणि आकारात ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. शिवाली सांगते की तिने बनवलेल्या केक ची विशिष्ट चव पाहून ग्राहक तिच्या उत्पादनाकडे आकृष्ट होतात. ती बेकिंगच्या संबंधित सगळे काम स्वतः करते. फक्त साफसफाई साठी एक मदतनीस नेमला आहे.

विशेषता

जूनी टॅन च्या कृतींची प्रशंसक असलेली शिवाली जेंव्हा एखादा केक करते तेंव्हा रोल मॉडेल च्या रुपात त्यांच्या कडे लक्ष्य केंद्रित करते. ती नेहमी नव्या कल्पकतेला, नव्या कृतीला आत्मसात करून स्वतः इतर स्पर्धकांच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असते.

अंततः शिवाली सांगते की, मी माझ्या ग्राहकांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करते. तसेच गुणवत्ता टिकवून ठेवणे ही एक कला आहे. या प्रयोगांसाठी लागणारे समान ती सिंगापूरहून मागवते. तिचा एकच उद्देश आहे की आपल्या ग्राहकांचे मन जिंकण्यासाठीचा मार्ग हा पोटातून जातो. म्हणून दर्जेदार आणि चविष्ट केक हे व्यंजनाच्या रूपाने उपलब्ध करून अनेकांच्या आनंदात सहभागी होण्याचे तिला समाधान आहे.  

 

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : किरण ठाकरे