पतंजली आयुर्वेदाची मध्यप्रदेशात ५०० कोटी रूपयांची गुतंवणूक, ७०० जणांना उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी

पतंजली आयुर्वेदाची मध्यप्रदेशात ५०० कोटी रूपयांची गुतंवणूक, ७०० जणांना उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी

Saturday August 06, 2016,

1 min Read

जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने मध्यप्रदेशात ५०० कोटी रूपयांची गुतंवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीतून मध्यप्रदेशातील धार जिल्हय़ात अन्न प्रक्रिया प्रकल्पाची स्थापना करण्यात येईल. मध्य प्रदेश सरकारने पतंजलि आयुर्वेदला पिथमपूर इंडस्ट्रीयल परिसरात ४०० एकर जमीन दिली आहे. याचप्रमाणे कंपनीने राज्य सरकारला एक कोटी रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले आहे. सरकारने ४०० एकर जमीन २५ लाख रूपये प्रति एकर दराने पतंजलि आयुर्वेदला दिली आहे.

image


महाराष्ट्र सरकार नागपुरमध्ये पंतजलि आयुर्वेदला ४०० एकर जमीन देण्यास तयार झाले होते. मात्र मध्यप्रदेशने पंतजलीला राज्यात गुंतवणूक करण्यास आवाहन केले आणि ५०० कोटी रुपयांचा अन्न प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यास पतंजलिने मध्यप्रदेशची निवड केली असे मध्य प्रदेशच्या औद्योगिक विभागाने सांगितले. पंतजलीच्या या नव्या प्रकल्पामुळे सातशे नवे रोजगार निर्माण होणार आहेत. येत्या तीन वर्षात या प्रकल्पामध्ये उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.