फॅशन जगतातल्या ४ भारतीय युवती त्यांचे लाईफस्टाईल ब्रँड घेऊन सज्ज

फॅशन जगतातल्या ४  भारतीय युवती त्यांचे लाईफस्टाईल ब्रँड घेऊन सज्ज

Saturday December 19, 2015,

5 min Read

१९९४ मध्ये जगतसुंदरी स्पर्धेत विजयी झाल्यावर १६ वर्षीय प्रिता सुखटणकर कानात जीव आणून सुश्मिताचे शब्द टिपत होती. विजयीयात्रेत सुश्मिताला विचारलं, “तुझ्याकरता स्त्रीत्व म्हणजे काय?” तिचं उत्तर होतं, “स्त्री ही देवाने दिलेली सुंदर भेट आहे. तिचा सर्वांनी आदर केला पाहीजे. प्रेम, काळजी, सहकार्य म्हणजे काय हे आपल्या कृतीतून ती दाखवते”. ही स्पर्धा थेट पाहणाऱ्या भारतातल्या घराघरांमध्ये सुश्मिताचं हे उत्तर पोहोचलं. प्रिता सांगतात, “मी सण्डे ऑब्जर्व्हरमध्ये सुश्मिताने जगतसुंदरी किताब जिंकल्यावर लिहिलं”. सौंदर्य आणि फॅशन जगतामध्ये पाऊल टाकण्यापूर्वी प्रिताची ही जणू तयारीच होती. आज ३८ वर्षीय प्रिता मुंबईच्या ई-कॉमर्स लाईफस्टाईल ब्रॅण्ड ‘द लेबल लाईफ (TheLabelLife)’ ची संस्थापक आहे.


image


१९६६ मध्ये रिएटा फारियाने विश्वसुंदरीचा किताब मिळवल्यावर एवढ्या वर्षांनंतर सुश्मिताने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बहुमान मिळवून दिला. प्रिता म्हणतात, “ही गोष्ट म्हणजे देशात सौंदर्य आणि फॅशन उद्योगाबद्दल माहिती होण्याकरता मैलाचा दगड ठरली. ज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रतिक्रियाही बऱ्याच उमटल्या”.

तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात, ती नेहमीच सुश्मिता सेन आणि तिच्या सारख्याच ध्येयशील भारतीय नवतरुणींवर बारीक लक्ष ठेवून असते. हा वर्गच तिच्या उत्पादनांचं बाजारात प्रतिनिधीत्व करतो.


image


प्रिता सांगतात, “मी एमटीव्ही मध्ये प्रोड्युसर असताना किंवा सेव्हेन्टीन मॅगझीन अण्ड एल’ऑफिशियल ची प्रकाशक म्हणून काम करताना मी सौंदर्य आणि विलासिक आवडीला जास्तीत जास्त समजण्याचा प्रयत्न करत राहायची. या सोबतच मी इव्हेंटस् प्रोड्यूस करताना सेलिब्रिटीजशी माझा संबंध यायचा. मी त्यांच्या स्टाईल बघायचे. हे सगळं करतांना मी भारतीय महिला ग्राहकाला ओळखू लागले, समजून घेऊ लागले. माझ्या टिममधल्या महिला जवळपास एकाच क्षेत्रातल्या आहेत. त्यांच्यावर माझा पूर्ण भरवसा आहे आणि मी त्यांचे वेगवेगळे पैलूही जाणते”.

२०१२ मध्ये लेबल कॉर्पची (Label Corp) सुरूवात झाली. २०१३ मध्ये कालरी कॅपिटल(Kalaari Capital. Disclaimer- कालरी कॅपिटल हे yourstory चे गुंतवणूकदार आहेत.)ने गुंतवणूक करून लेबल लाईफ या नावानं ब्रॅण्डला परत बाजारात आणलं. या वर्षांमध्ये इथला आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड भारताच्या बाहेरही पोहचवण्याची प्रिताची दूरदृष्टी अविचल राहिली. वन किंग्स लेन (One King’s Lane) अणि द ऑनेस्ट कंपनी (The Honest Company) या आंतरराष्ट्रीय ब्रँडमुळे त्यांच्या उद्योगाला पाठबळ मिळालं. शिवाय दर्जा आणि व्यापार यांचा योग्य मेळ साधून, वस्तूला आकर्षक स्वरूप देऊन त्यांनी ग्राहकाला वस्तू घ्यायला भाग पाडलं.


image


सेलिब्रिटी कार्ड आणि गाभा

पण त्यांना अपेक्षित असलेल्या चोखंदळ ग्राहकाने त्यांच्या शब्दावर विश्वास का ठेवावा? त्याकरता त्यांनी मान्यवर संपादकांना यात सामावून घेतलं. त्यांना त्या ‘टेस्टमेकर’ संबोधतात. या टेस्टमेकरना त्या त्या उत्पादनांची व्यक्तीगत आवड आणि माहितीही आहे. त्या स्वतः या उत्पादनांमध्ये वैयक्तिक लक्ष घालतात. यामुळे ग्राहकांना खरेदी करायला आवडतचं. सुझान खान, मलायका अरोरा खान आणि बिपाशा बासू या केवळ ब्रँडची जाहिरात करत नाहीत तर त्याची समीक्षा करून त्यावर आपल्या कल्पकतेची मोहोर उठवतात. विशेषतः घर सजावट, कपडे आणि ऍक्सेसरिज (accessories) वर त्यांची विशेष छाप असते. या तिन्ही बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि उद्योजिका ‘द लेबल लाईफ’ च्या समभागधारकही आहेत. उत्पन्नातून मिळालेला नफा त्यांच्यासोबतही वाटला जातो.


image


प्रिता सांगतात, “तिन्ही लेबल द होम लेबल, द क्लोसेट लेबल आणि द ट्रक लेबल एकत्र आल्यावर व्यापार अधिक आश्वासक झाला. एकाच ठिकाणी तीन प्रकार पाहता येत असल्याने विक्रीतही वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी खप वाढला. आमच्या ४५ टक्के वस्तू लोकांनी परत उचलून धरल्या. या गोष्टी आमच्या ग्राहकांचं आमच्यावर प्रेम अबाधित असल्याचं दाखवतातं”.

उत्पादनांना रिब्रँड केल्यावर त्यांच्या स्टार्टअपने व्यवसायवाढीसाठी मिंत्रा (Myntra)सारख्या ऑनलाईन शॉपशी हातमिळवणी केली. वूनिक (Voonik), रॉपोसो (Roposo) आणि अजून काही साईटस् वरही चांगला प्रतिसाद मिळाला.


image


प्रिता सांगतात, “हल्लीच आम्ही क्राफ्टस्विला डॉट कॉम (craftsvilla.com) सोबत हातमिळवणी केलीय. आम्ही या महिन्यात सुट्ट्यांच्या मौसमात घराला लागणाऱ्या नाविन्यपूर्ण कलात्मक गोष्टी सादर करत आहोत. आमची काम करण्याची धडाडी आणि आकर्षून घेण्याची क्षमता ऑनलाईन किरकोळ व्यापारातही मदत करते. यावर्षी ५० टक्के मागण्या या आम्हाला केवळ ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातूनच मिळाल्या”.

आंतरराष्ट्रीय दर्जाची चैनीची उत्पादनं देणाऱ्या जयपूर आणि फॅब इंडिया सारख्या इतर भारतीय ब्रँडची (त्यांच्या दुकानात जाऊन उत्पादन घेण्याचा अनुभव वेगळाच आहे.) बाजारात चलती आहे. पण ‘द लेबल लाईफ’चं वैशिष्ट्य म्हणजे ‘व्यक्तीगत स्पर्श’. प्रत्येक उत्पादनांना असलेली त्या त्या सेलिब्रिटीची छाप उत्पादनाला वेगळं ठरवते.

प्रिता दर महिन्याला एका सेलिब्रिटीला ‘डिझायनर ऑफ द मन्थ’ म्हणून आमंत्रित करतात. यात आघाडीचे डिझायनर त्यांच्या कलाशक्तीचा वापर करत ग्राहकांसाठी विशेष उत्पादन बनवतात. मालिनी रामाणी आणि रॉकी एस यांनी ग्राहकांना ‘द लेबल लाईफ’ वरून उत्पादनं घ्यायला मोह पाडलाय.

“आमच्या तिन्ही टेस्टमेकर याही पहिल्यांदाच आगळ्यावेगळ्या पद्धतीने एकत्र आल्यात. उदाहरण द्यायचं झालं तर, नुकतचं मलायकाने एका फोटोशूटसाठी सुझानची स्टाईल केली आणि सोशल मिडीयावर हे फोटो अपलोड करुन शेअर केले”.

डिसेंबर महिन्याचे संपादक आहेत, रॉकी एस्. त्यांच्या सूचनेनुसार बिपाशाने तिच्या आवडीप्रमाणे ‘कुशन्स’ बनवले. रॉकी आणि बिपाशा यंदाच्या ‘पार्टी सिझनची धमाल जोडगोळी’ ठरलीय.

त्याचप्रमाणे @askmalaika वर तुम्ही थेट शंका विचारु शकता, संवाद साधू शकतात. प्रिता म्हणतात, “आमचा ब्लॉग ‘द लेबल रिपोर्ट’ हाही आता कात टाकतोय. यात आता उत्कृष्ट संपादकीय तुम्हाला वाचता येतील”.

पाश्चात्य देशांमध्ये मजकूर आणि व्यापाराची एकत्रित नाळ बांधणं नवीन नाही. भारतातही आता हे लोण वेगाने पसरतयं. कोणालाच ‘हे विकत घ्या’ असं थेट सांगितलेलं आवडत नाही. पण जर तुम्ही या मौसमातले पाच लोकप्रिय फॅशन ट्रेण्ड दाखवलेत तर तुम्ही ग्राहकांचं लक्ष वेधून घ्यालं. स्वयंपाकघरातल्या अत्याधुनिक उपकरणासोबत ख्रिसमस पुडींगची पाककृती दाखवा, ग्राहकाला आपला खिसा रिकामा होण्याची रुखरुख लागणार नाही. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जा आणि डिझाईन असल्याचं कार्ड तुमच्या हातात असेल तर तुम्ही नक्की बाजी जिंकणारचं.

ज्या भारतीयांना शक्य आहे ते लोक चैनीच्या गोष्टी घ्यायला परदेशात जाणं पसंत करतात. युरोमॉनीटर या रिसर्च फर्म च्या मते पुढील पाच वर्षांत भारतीयांचा चैनीच्या वस्तू घ्यायचा कल चांगलाच वाढणार आहे. १३२ अब्ज रुपयांवरुन हा व्यापार २३६ अब्ज रुपयांवर पोहोचेल, म्हणजेच यात दुप्पटीने वाढ होणार आहे.

त्यामुळेच ‘द लेबल लाईफ’ यांसारख्या स्टार्टअप ब्रँडसाठी हे उत्साहवर्धक आहे. पण चैनीच्या वस्तूंची कितीजण ऑनलाईन खरेदी करतात? ‘अ वॉल स्ट्रीट जर्नल’च्या लेखानुसार चैनीच्या वस्तूंचे भारतीय ग्राहक ऑनलाईन पेक्षा दुकानांत जाऊन वस्तू खरेदी करायला अधिक पसंती देतात.

२०१४ मध्ये ९८ .८० टक्के लोकांनी दुकानात जाऊन खरेदी केली तर केवळ १.२० टक्के लोकांनीच ऑनलाईन खरेदीला पसंती दिली. युरोमीटर डाटा प्रोव्हाईडरचे अॅनालिस्ट श्रेयांश कोचेरी यांच्या मते, “दुकानात जाऊन खरेदी करण्याचा लोकांचा कल पुढील पाच वर्ष तरी असाच राहील”.

लोकप्रिय व्यापारी वेबसाईट मिंत्रासोबतच्या फसव्या भागीदारीनंतर प्रिता लबाडखोरांविरोधात तोफ डागतात. त्या म्हणतात, “गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट व्यापाराची आम्हांला यंदा आशा आहे. पण हे आत्ताच बोलणं जरा घाईचं होईल. कारण काही दिवसांपूर्वीच आम्ही मिंत्रा(Myntra)ची हकालपट्टी केलीय. पण तरीही दिवसाला आमच्याकडे १०० ऑर्डर्स नोंदवल्या जात आहेत”. प्रितांना त्यांच्या टार्गेट मार्केटची चांगली जाण आहे. जर ग्राहक त्यांच्याकडे नाही आले तर त्याच ग्राहकांकडे जातील.

लेखक : दीप्ती नायर

अनुवाद : साधना तिप्पनाकजे