खरेखुरे तंत्रज्ञान- भारतीय शास्त्रज्ञांनी निर्माण केले आरोग्यदायी आइसक्रिम 

0

आपण मंगळयान पाठविले, युध्दासाठी देशी हलक्या वजनाचे लढाऊ विमान तयार केले आणि दुर्धर रोगांवर रामबाण औषध शोधून काढले. आता शाकाहारी पदार्थापासून आरोग्यपूर्ण आईसक्रिम तयार करण्यात आले आहे. अन्न तंत्रज्ञानातील अलिकडच्या शोधानुसार शास्त्रीय आणि औद्योगिक परिषद प्रयोगशाळेने सीएसआयआर ने मैसुरू येथील संशोधनात मे ओलेमे बायोसोल्युशन बंगळुरू आणि मे. डेअरी क्लासिक आईसक्रिम प्रा.लि.यांच्या सोबत न्यूटराईज विकसित केले आहे. न्यूटराईज आईस्क्रिम हे ओमेगा-३ आणि विटामीन ई यांनी भरपूर असलेल्या शाकाहारी घटकांचे बनले आहे. आहार शास्त्रानुसार ओमेगा-३ मध्ये पोषणद्रव्ये आहेत. एका अहवालानुसार त्यात लहान मुलांच्या मेंदूला पोषकघटकद्रव्ये आहेत ज्यामुळे त्यांची वाढ आरोग्यपूर्ण पध्दतीने होऊ शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहिती पत्रकानुसार या पदार्थातून आवश्यक पोषक घटकद्रव्य आरडीए ओमेगा-३ लहानमुलांसाठी आवश्यक आहे.

साधारणपणे, लोकांच्या अन्नसेवनाच्या सवयी विषम पध्दतीचे अन्न पदार्थ आणि पक्वान्न देणा-या असतात ज्यातून शरीराला आवश्यक वेगवेगळी पोषकघटकद्रव्य मिळतात. भारतीय पारंपारीक अन्नसेवनाबाबतच्या सवयींचा अभ्यास करून सीएसआयआर आणि सीएफटीआयआर यांनी वेगळ्या प्रकारचा अन्नपदार्थ तयार केला.न्यु्ट्रीचिक्की नावाच्या या पदार्थामध्ये भाताचे पिठ प्रथिने उत्तेजक अन्नघटक इत्यादी घटक वापरण्यात आले आहेत. त्यातून लोकांच्या भिन्न प्रकारच्या पोषण गरजा पूर्ण होतात. या उत्पादनांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या गेल्या जसे की त्यांचे टिकाऊपण, पॅकींग, जैवसुरक्षा इत्यादी.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा