या ग्रामीण भागातील शास्त्रज्ञाला भेटा, ज्याने सामान्य लोकांसाठी तयार केली २० गॅजेटस्!

या ग्रामीण भागातील शास्त्रज्ञाला भेटा, ज्याने सामान्य लोकांसाठी तयार केली २० गॅजेटस्!

Wednesday November 23, 2016,

2 min Read

३५ वर्षीय रुद्र नारायण मुखर्जी झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात सिंदूरपूर या छोटयाशा गावात राहतात. त्यांच्या परिसरात मात्र ते सर्वपरिचित आहेत ते ग्रामीण वैज्ञानिक म्हणूनच! आतापर्यत त्यांनी २२असे शोध लावले आहेत ज्यातून तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्यांच्या ग़ंभीर समस्या दूर केल्या आहेत.

रुद्र त्यांच्या पालकांसोबत तसेच त्यांचे मोठे बंधू, त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत राहतात. सेवानिवृत्त अभियंत्याचा मुलगा म्हणून रुद्र यांनी नवनवीन गॅजेटस अर्थात उपकरण तयार करण्यात अगदी लहान वयापासूनच रुची दाखवली, आजही त्यात खंड पडला नाही. त्यांनी सांगितले की, “ मी किफायतशीर पध्दतीने २० ते २२ प्रकारच्या उपकरणांची निर्मिती केली आहे, ज्यांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. आजही मी सुमारे ४० प्रकारच्या नव्या कल्पनांवर काम करत असून त्या जगात यापूर्वी कुणी अंमलात आणल्या नाहीत”.

image


रुद्रा यांनी असे हेल्मेट तयार केले आहे जे अपघात झाल्यास त्याची सूचना अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना देते, स्त्रियांसाठी धोक्याची सूचना देणारी घंटा तयार केली आहे, जी वाजल्यावर संकटातील महिलेला तात्काळ मदत मिळू शकते. त्याच प्रमाणे हायजीन पध्दतीचे डायपर तयार केले ज्यामुळे पालकांना सुरक्षित, सुखावह पध्दतीने संगोपन करता येते. रुद्र यांनी असे उपकरण तयार केले आहे जे वाहनाला लावल्यावर वाहन चोरी झाल्यास त्याच्या मालकाला आपोआप अलार्म वाजून सूचना मिळते.

आपले हे संशोधन लोकांच्या समोर नेताना, रुद्र यांनी ‘मेक इन इंडिया’ च्या अधिका-यांना संपर्क केला. सीआयएमएफआर आणि एनआयएफ यांच्या पाठिंब्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्याबाबत बोलताना रुद्र सांगतात की, त्या सर्वांनी माझ्या कल्पना आणि तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली, मात्र त्याची नक्कल होणार नाही किंवा कुणी स्पर्धा करणार नाही याची कुठलीही हमी दिली नाही. मला पालकांच्या सुरक्षेसाठी हे तंत्र विकसित करु द्यायचे आहे मात्र त्यासाठी ८६हजार रुपयांची गरज आहे ज्यातून मला त्याचे पेटंट घेता येईल. जे माझ्यासाठी शक्य नाही”.

    Share on
    close