शेजारची दुकानं आणि ग्राहकांना जोडणारा ‘गुडबॉक्स’!

0

सकाळच्या चहासाठी दूध असो किंवा भूक लागल्यावर करायचा अल्पोपहार, आपण आपल्या गरजेनुसार या दुकानांतून जातो. ही दुकाने आपल्या परिसरातील असतील. थोडा विचार करा घरात दुध संपले आहे आणि तुम्हाला दुकानदाराला संदेश पाठवायचा आहे, पैसेही त्याच सेवेत अदा केले जातात, आणि घरपोच दुध मिळते. हे केवळ दुधाबाबतच नाही तर आपल्या मनात येईल त्यानुसार केक स्टोर, स्वस्त धान्य दुकान किंवा जीवनावश्यक गरजेच्या सामानाबाबतची सेवा पूर्ण केली जाते.

गुडबॉक्स
गुडबॉक्स

‘गुडबॉक्स’चा उद्देश लोकांच्या छोट्या-छोट्या समस्या दूर करणे हा आहे. हा एक मोबाईल ऍप आहे जो ग्राहकांना खरेदीचे स्वातंत्र्य देतो त्याच बरोबर व्यावसायिकांना त्यांची उत्पादने ऍपच्या मदतीने विकण्याची मुभा देतो. ‘गुडबॉक्स’चे सहसंस्थापक मयंक बिदवात्का म्हणतात की, “ आमच्या लक्षात आले की, बहुतेक असे उद्योग आहेत की जे ऍपवर विक्री करू इच्छितात कारण ग्राहकांचा कल त्याकडेच जात असतो. परंतू त्यांच्यासाठी स्वत:चे ऍप तयार करणे सोपे नसते, आणि त्यांना हे सुध्दा ज्ञात असते की वेगवेगळ्या गोष्टींसाठी ग्राहक अनेक ऍप्स डाऊनलोड करू शकत नाही.” खरेतर ‘गुडबॉक्स’ व्यापाराला ऍपच्या माध्यमातून नवे अस्तित्व मिळवून देतो. मयंक म्हणतात की,“ आम्ही छोट्या उद्योजकांसाठी सर्वात सोपा संभाव्य मंच तयार करु इच्छितो, ज्यातून ते आपल्या ग्राहकांशी बातचित करू शकतील आणि ऍपवर खरेदीची मुभा असेल.” या वर्षीच्या सुरूवातीला या ऍपबाबतचा विचार एबे जखारिया यांच्या मनात आला, जे रेडबसमध्ये कोरटिम सदस्य होते. मयंक यांच्यासोबत नितीनचंद्र, मोहित माहेश्वरी,आनंद कलगीनामणी,महेश हर्ले आणि चरणराज रेडबस सोबत काम करत होते. असे असले तरी मयंक पहिल्यापासूनच या चमुचे समर्थन करत होते. मयंक त्यावेळी त्यांच्यात सामिल झाले ज्यावेळी ते एका अडचणीचा सामना करत होते, जी सोडवण्याचा प्रयत्न हा चमू करत होता. रेडबसमध्ये ते विपणन आणि उत्पादन प्रमुख होते त्यानंतर ते द मिडियाएंट मध्ये सहसंस्थापक म्हणून सहभागी झाले. ‘गुडबॉक्स’च्या दिशेने आल्यावर ते म्हणतात की,“ मला नेटवर्क व्यवसाय करण्यात आणि उच्च विचार करायला आवडते. रेडबस, मिडिया एंट आणि गुडबॉक्स सर्वच जगावेगळ्या कल्पना आहेत ज्या या आधी केल्या गेल्या नाहीत. एखादे असे काम करण्यात वेगळाच थरार असतो जे य़ाआधी कधीच केले नसते. कारण त्याठिकाणी एक जरासा देखील संदर्भ नसतो आणि तोच तुम्हाला समस्यांना सोडवण्यासाठी उद्युक्त करतो.” चमूमध्ये अशा लोकांचा समावेश करण्याचा विचार केला जात आहे की, ज्यांच्या विचारांत असे वेगळे काहीतरी उद्योग करण्याच्या कल्पना असतील आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ते घाबरत नाहीत.

मयंक
मयंक

‘गुडबॉक्स’ व्यवसायाला कश्याप्रकारे मदत करतो? ते सा़ंगताना मयंक म्हणाले की, व्यापाराला नवीन तंत्रज्ञान हवे आहे, त्यांच्याकडे स्टोरफ्रंट आहे आणि ते आपल्या ग्राहकांशी योग्यवेळी संवाद करण्यात सक्षम आहेत, ते ऍपवर त्यांचा मेन्यू बनवू शकतात, आणि बिझनेस प्रोफाईल देखील! मोबाईल आणि ऍपच्या जमान्यात प्रत्येक ब्रँड विश्वास करू लागला आहे की ऍप हाच प्रगतीचा मार्ग आहे. आणि ते योग्य देखील आहे. मोबाईल इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे असे वाटते की, प्रगतीसाठी हाच सर्वात योग्य मार्ग आहे. असे असले तरी बाजारात अनेकांमध्ये उपस्थित अनेकांचे ऍप्स असल्याने ग्राहकांना त्रास होतो आणि कारण मिळते की, ते त्यांच्या गरजांसाठी कोणते योग्य ऍप निवडू शकतील. मयंक सांगतात की, ‘गुडबॉक्स’सोबत ग्राहक आपल्या विश्वासाच्या व्यापारी व्यवहारांसाठी हवे ते मिळवण्यात सफल होतात. मग ते जवळचे दुकान असेल किंवा एखादे नवे जे तुम्हाला शोधायचे असते. एक ग्राहक म्हणून ते आपल्या मनाजोग्या व्यवहारांना ‘चँट’ करू शकतात. मागणी नोंदवू शकतात आणि ऍपच्या माध्यमातूनच पैसे अदा करु शकतात.

व्हॉटसअपशी या ऍपची तुलना करताना मयंक म्हणाले की, “ व्यापारी आणि ग्राहक व्हॉटसअप दोघेही वापरतात, त्यामुळे आम्ही काहीतरी असे नवे देण्याचा प्रयत्न केला, ज्याची कार्यप्रणाली व्हॉटसअप प्रमाणेच असेल आणि त्यातून एकमेकांना संवाद देखील साधता यावा” ऍप मध्ये संदेश देण्याची व्यवस्था आहे, त्याबाबत टिम सांगते की, हे दुस-यांपेक्षा असे वेगळे आहे कारण ग्राहक व्यापा-यांशी सरळ चँट करू शकतो, ना कुणा प्रतिनिधीशी. मागील काही काळापर्यंत ऍप प्रायोगिकतत्वावर होता आणि दोन महिन्यापूर्वीपासून त्यावर पैसे घेण्याची सुविधा दिली जात आहे. चमूचा दावा आहे की, पहिल्या साठ दिवसांतच व्यवहारात पन्नास टक्के वाढ झाली आहे. ‘गुडबॉक्स’ला बीजभांडवल मणिपाल समूह, टँक्सी फॉर शुअरचे अप्रामेया राधाकृष्ण आणि रेडबस चे सहसंस्थापक चरण पद्मराजू यांच्याकडून मिळाले आहे. सध्या कंपनी बंगळूरू मध्येच व्यापारी करार करत आहे, मयंक सांगतात की, “ ‘गुडबॉक्स’वर आम्ही लघुद्योजक/छोटे व्यावसायिक आणि त्यांचे ग्राहक यांना दैनंदिन व्यवहार सोपे करण्याच्या आमच्या स्वप्नाला पूर्ण करु इच्छितो.”, देशात वाढत्या ऑनलाइन व्यवहारांच्या वापराकडे पाहता ते अशक्य अजिबात नाही.

ऍसोचेम-पीडब्ल्यूसी च्या संशोधनानुसार सुमारे चार कोटी उपभोक्त्यांनी सन२०१४मध्ये ऑनलाईन खरेदी केली आणि चालू वर्षात हा आकडा वाढून साडेसहा कोटीवर पोहोचेल. भारतीय ई-कॉमर्स चा व्यवहार २०२०पर्यंत शंभर अब्ज डॉलरच्या पलिकडे पोहोचण्याची अपेक्षा आहे.

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte