'माझ्या मते आमच्या मनातील भिती हीच सर्वात मोठी मर्यादा असते'

1

४३ वर्षांच्या अंजली सरोगी या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत ज्यांनी ८९ किमीच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून यश मिळवले आहे. त्यांना बिल रॉडन पदक देवून सन्मानित करण्यात आले, कारण त्यांनी जगातील सर्वात जुन्या असलेल्या या मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन द.आफ्रिकेच्या डर्बन ते पिटरमॅरीथझबर्ग दरम्यानचा पल्ला धावून पूर्ण केला. अंजली यांनी केवळ दोन वर्षापूर्वी  धावण्यास सुरूवात केली आहे, ज्यावेळी कुणी ऍथेलीटस त्यांचे बूट खुंटीला टांगून निवृत्त होतो त्या वयात! त्यामुळे त्यांनी हेच दाखवून दिले आहे की वय ही केवळ एक अंक असलेली गोष्ट आहे त्याचा अडसर येवू शकत नाही!

त्यांच्या १८ वर्षांच्या कन्या ममता यांनी त्यांना ज्यावेळी यासाठी प्रोत्साहन दिले त्यावेळी त्या शहर मॅरेथॉनमध्ये दोन वर्षापूर्वी रस्त्यावर उतरल्या. ज्यावेळी त्या पहिल्या आल्या तेंव्हा त्यांना उत्सुकता वाटली की त्या कशा धावू शकतात आणि मग त्यांची यातील रूची वाढली. एका मुलाखती दरम्यान त्या म्हणाल्या की, “ महिला साधरणत: न्यूनगंड ठेवतात, माझ्या मते आमच्या मनातील भिती हीच सर्वात मोठी मर्यादा असते आणि आम्ही जास्त वेळ स्वप्नात रमतो आणि भिती बाळगतो.” त्या पुढे म्हणाल्या की, “ मी आंतरराष्ट्रीय कारकिर्द करण्याचे ठरविले ज्यावेळी मी मुंबई हाफ मॅरेथॉन मध्ये दुसरी आले, जो मी सहभाग घेतलेला पहिला आंतरराष्ट्रीय इवेंट होता.”


असे असले तरी अंजली यांच्यासाठी रस्त्यावरील प्रवास सुरळीत नव्हता. अंजली त्यांच्या पतीसोबत वैद्कीय चिकित्सा केंद्र चालवितात, ऍथेलीट म्हणून त्याच्या कारकिर्दीला बहर त्यावेळी आला ज्यावेळी यावर्षी त्या शिकागो मॅरेथॉनसाठी तयारी करताना जखमी झाल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता की, त्यांनी यानंतर पुन्हा धावू नये.

पण मैत्रिनीनं त्यांना अमीत सेठ लिखित पुस्तक दिले 'धावण्याचे साहस करा' (डेअर टू रन) , अमीत सेठ भारताचे पहिले कॉमरेडस मॅरोथॉन २००९मध्ये जिकंणारे, यांचे ते पुस्तक होते. या पुस्तकाने जखमी असतानाही अंजली यांना प्रेरणा मिळाली. यावेळी जी आव्हाने होती त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “ माझे वडील आणि माझे पती यांनी माझ्या आरोग्याची फार काळजी घेतली ज्यावेळी मी हे आव्हान स्विकारले कारण यात मी नवखी होते. परंतू माझ्यातील जिद्द पाहून शेवटी त्यांनी मला पाठींबा देण्यास सुरूवात केली.”

लहानपणापासून अंजली या लाडाकोडात वाढलेल्या असल्याने त्यांच्यात असुरक्षितपणाची भावना होती. मात्र ज्यावेळी त्यांनी धावण्यास सुरूवात केली, तंदुरस्त आणि आरोग्यपूर्ण होत असतानाच त्यांच्या मनात आत्मविश्वास देखील वाढत गेला.

आता कुटूंबियांच्या पाठींब्याच्या बळावर त्यांनी स्वत:चा विक्रम मोडण्याचे आव्हान समोर ठेवले आहे आणि येणा-या वर्षात कॉमरेडस मॅरोथॉनमध्ये धावण्याचा सराव त्या करत आहेत. त्यांच्या मुलीसोबत देखील त्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि तिच्या सोबत ही स्पर्धा पूर्ण करायची आहे.