रात्र गस्तीच्या वेळी तान्ह्या मुलीला सोबत घेऊन जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी 'अर्चना झा'

0

पोलीस सेवा ही स्त्रियांसाठी काहीशी ‘कठीण’ मानली जाते, त्यात गुन्हेगारी खात्यावर (क्राईम ब्रँच )  पुरुषी वर्चस्व असते. कोणत्याही प्रदेशाच्या राजधानीत क्राईम ब्रँच प्रमुख पद सांभाळणे हे आव्हानात्मकच असते. छत्तीसगढची राजधानी रायपुर येथील क्राईम ब्रँचची धुरा धडाडीची स्त्री अधिकारी अर्चना झा यांनी पेलली आहे. वडिल शिक्षक व चार भावंडांमध्ये शेंडेफळ असलेल्या अर्चना यांच्या कुटुंबात पोलीस खात्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती तसेच अर्चना यांनी सुद्धा कधी पोलीस क्षेत्रात काम करण्याचा  कधी विचार केला नव्हता, फक्त जीवनात आपल्या उद्देशपूर्तीसाठी कार्यशील रहाण्याची त्यांची इच्छा होती. याच अदम्य इच्छेने त्या छत्तीसगढ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची निवड करून उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. अर्चना यांनी २००७ मध्ये पोलीस सेवेत भरती होऊन या आव्हानाचा स्वीकार केला.

२००७ मध्ये अर्चना यांच्या जीवनात दोन मोठे बदल झाले. त्यांची निवड राज्य पोलीस सेवेसाठी झाली व त्यांचे लग्न झाले. पोलिसांचे कठीण प्रशिक्षण व वैवाहिक जीवनाची सांगड त्यांनी अतिशय उत्तम रीतीने घातली. अर्चना यांचे सासरे भारतीय पोलीस सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी आहे, त्यांनी व त्यांच्या पत्नी दोघांनीही  सुनेचे नेहमीच मनोधैर्य वाढवले. अर्चना यांचे पती निमेष छत्तीसगढ उच्च न्यायालयात, विलासपुर मध्ये वकील म्हणून कार्यरत आहे. अर्चना सांगतात की,’’लग्नानंतर जेव्हा त्यांची मुलगी अन्विता त्यांच्या जीवनात आली त्यावेळेस पोलिसांची दिवस-रात्रीची नोकरी, मुलीची देखरेख व सासरच्या लोकांच्या अपेक्षा या तिहेरी भूमिका त्यांनी आपल्या नवऱ्याच्या व सासरांच्या सहयोगाने व्यवस्थित पार पडल्या. पण जेव्हा मुलगी छोटी होती तेव्हा रात्रीच्या गस्तीच्या वेळी मुलीला आपल्या सोबत घेऊन आपली जबाबदारी पार पाडली. निवडणुकीच्या वेळी कडक बंदोबस्त, आई.पी.एल. मॅचच्या दरम्यान असलेली सुरक्षेची जबाबदारी व आता गुन्हेगारी शाखेत अपराध्यांच्या तपास कार्याचे अतिशय कठीण व पुरुषी एकाधिकार असलेले दायित्व अर्चना झा ह्या स्त्री असूनसुद्धा अतिशय उत्तम रीतीने पार पाडत होत्या. त्यांचे पुरुष सहकारी त्यांच्या या मेहनतीने, धडाडीने निरुत्तर व अचंबित झाले.

अर्चना यांचे असे मानणे आहे स्त्रीला ईश्वराने अशी शक्ती प्रदान केली आहे ज्यामुळे ती प्रत्येक अडचणींचा निडर होऊन सामना करू शकते हीच तिची विशेषता आहे. अर्चना सांगतात की,  "कोणत्याही मुलीला घरातील व बाहेरची जबाबदारी सांभाळतांना आपल्या स्त्रीत्वाचा आदर करून स्वीकारले पाहिजे. करियर (क्षेत्र) च्या मागे लागून कुटुंब व आई बनण्याच्या आपल्या दैवी देणगीला विसरता कामा नये.’’

आता मुलगी मोठी झाली, तिच्या आजी-आजोबांबरोबर ती राहू शकते पण उच्च न्यायालय विलासपूर मध्ये असल्यामुळे त्यांचे पती आठवड्यातून फक्त एकदाच रायपुर मध्ये येतात पण पोलिसाच्या नोकरीमध्ये आठवड्यातील एकही दिवस सुट्टीचा नसतो. तरीही अर्चना यांनी यात समतोल साधला आहे.

आता काही महिन्यापूर्वीच दुर्ग जिल्ह्यात एका अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये अर्चना झा यांच्या गुन्हेगारी खात्याच्या टीमने २४ तासात हे प्रकरण सोडवले. ज्यासाठी छत्तीसगढचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले.

अर्चना सांगतात की त्या आपल्या मुलीला तिचे आवडीचे क्षेत्र निवडण्याची पूर्ण मुभा देतील, जर तिने भविष्यात पोलीस खात्याचे क्षेत्र निवडले तर त्या  तिला अडवणार नाहीत.   

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

ज्या समाजाने वाळीत टाकले त्याच समाजाच्या रोल माॅडेल बनल्या सुशीला कठात

“ सोलर दीदी”ची कहाणी वाचा, तुमचा विश्वास बसेल की, खरचं महिला काहीही करू शकतात!”

एकट्यानेच सुरुवात करून शिक्षणाचे सखोल ज्ञान वाटण्याच्या प्रयत्नात ‘विद्या’!

लेखक : रवी वर्मा
अनुवाद : किरण ठाकरे