सहा ई -पुस्तकांची मेजवानी तुमच्यासाठी

ई-साहित्य हे सुगंधासारखं असतं. ते ज्याच्याकडे असेल त्याला तर आनंद मिळतोच पण दुसर्याला दिल्याने ते कमी होत नाही. बिनधास्त वाटत रहा, नवनवीन मित्र मिळवा. मोबाईलवरून ई पुस्तके ब्ल्यु टुथ किंवा व्हाट्स ऍप वरून देऊ शकता. मेल करू शकता. रस्त्याने जाता येताना, मॉर्निंग वॉक, रेल्वेतून प्रवास करताना, वेटिंग रूममध्ये, एखाद्या क्यू मध्ये उभे उभे आपण ही पुस्तके वाटू शकता. समोरचा खुश. आम्ही आभारी. आणि आपल्या भाषेची श्रीमंती वाढवण्याचे,वाचनसंस्कृती पसरवण्याचे पुण्यकार्य.

2

इंग्लंडच्या दुप्पट लोकसंख्या असलेल्या या महाराष्ट्राच्या अमृतासारख्या गोड भाषेत, मराठीत लवंगी मिरचीच्या ठेच्यासारख्या तिखट भाषेत, मराठीत तलवारीच्या पात्यासारख्या लखलखीत भाषेत, मराठीत आता नव्या युगाच्या नव्या टेक्नोसाव्ही पुस्तकांची आणि वाचकांची लाट आली आहे. नवनवीन ताज्या दमाचे लेखक ई बुकच्या माध्यमातून हजारो वाचकांसमोर सादर होत आहेत. दिवसाला हजारो नवीन वाचक ई साहित्य मध्ये दाखल होत आहेत.

आपल्यासाठी सहा सुंदर पुस्तके आणली आहेत.

1.मला मोठं व्हायचंय : संतोष कामेरकर

एकदा जर का मनाने ठाम निश्चय केला की मग सोपं असतं. मोठं होण्यासाठी, यशस्वीतेसाठी काय करावं याचं उत्तम मार्गदर्शन करणारं एक छान पुस्तक. आजवर आठ आवृत्त्या संपल्या या पुस्तकाच्या.


http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mala_mot_havychy_e_book_canvert_file_singl_pages.pdf

अमेरिकावारी भाग ३ : नंदिनी देशमुख

आयुष्यात कधी विमानप्रवासही न केलेली एक मध्यमवर्गीय स्त्री. आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी त्या अमेरिकेत गेल्या आणि त्यांना जी नवलाई जाणवली ती त्यांनी अतिशय सोप्या साध्या शब्दांत लिहून सादर केली. वाचकांना भाग १ आणि २ अतिशय आवडले. म्हणून आता सादर आहे भाग तीन.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/majhi_amerikawari_3_nandini_deshmukh.pdf

गांधीहत्येचा इतिहास : चुनीभाई वैद्य

महात्मा गांधीजींची हत्या हा भारताच्या इतिहासातील एक न धुता येणारा कलंक आहे. जगातील सर्व नेत्यांना दीपस्तंभाप्रमाणे असणार्‍या या अलौकिक नेत्याची हत्या एका भारतीयानेच करावी याहून मोठा दैवदुर्विलास तो काय! या हत्येमागच्या पार्श्वभूमीची चर्चा करणारी ही छोटी पुस्तिका

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/assassination_of_gandhi_-_truths_and_facts__1_.pdf

पाकिस्तानचे जन्मरहस्य : वसंत नगरकर (अनुवाद : माधव लिमये)

अखंड भारताची फ़ाळणी ही सर्वच भारतीयांच्या मनात ठसठसणारी वेदना आहे. जगात अनेक देशांच्या फ़ाळण्या झाल्या आणि नंतर ते जोडलेही गेले. गेल्या शंभर वर्षांतील जगाचा भूगोल पाहिला तर जगाचा नकाशा जवळपास दरवर्षी बदलत असतो. कालचे मित्र आजचे कट्टर शत्रू होतात आणि पुन्हा मित्र होतात. राजकारणात कायमचे शत्रू किंवा मित्र कधी नसतात. याला अपवाद भारत आणि पाकिस्तानचा. खुद्द भारताचा नकाशा गेल्या चारशे वर्षांत वारंवार बदलत राहिला. या सर्व इतिहासाचा आणि सांस्कृतिक उलथापालथींचा वेध अत्यंत संयमाने आणि अभ्यासपूर्वक घेणारं हे पुस्तक आहे. कारण भारताची फ़ाळणी हे एकट्या दुकट्या व्यक्तीच्या मनाने आणि दोन चार बैठकींत झाली हे शक्य नाही. त्यामागे बरीच मोठी व गुंतागुंतीची पार्श्वभूमी आहे. आणि ही सर्व गुंतागुंत या पाचशे पानी ग्रंथामध्ये उलगडून दाखवण्यात आली आहे.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/pakistanche_janmrahasya.pdf

आई विरुद्ध बाई :(कथासंग्रह) – लेखक- श्रीकांत भोसले

तारुण्यातून एक पाऊल पुढं सरकल्यावर आपोआप आपल्या खांद्यांना जबाबदार्‍यांचं ओझं जाणवू लागतं. डोळ्यासमोरची स्वप्नं जवळ आल्यासारखी दिसू लागतात. आपल्या अनुभवाने आपण बरेच शहाणे सुद्धा झालेले असतो. नकळत आपल्याला जाणवतं की आपल्यापेक्षा लहानच नाही तर मोठी मंडळी सुद्धा आपल्याकडून काहींना काही शिकतायत. तेंव्हा तर आपण शहाणे असू वा नसो, शहाण्यासारखंच वागावं लागतं. वेड्यासारखं काही करण्याची परवानगी ही नसते आणि इच्छाही.

आणि अशाचवेळी हृदयाच्या आतून प्रेमाची एक हाक येते आणि शहाण्या जीवाला वेडं करण्याचा प्रयत्न सुरू करते. एकाच शरीरात असलेलं एकटं मन दोन एकमेकाच्या विरुध्द असलेल्या पात्रांमध्ये विभागलं जातं आणि सुरू होते आतल्या आत एक वेगळ्याच प्रकारची घुसमट. एक सुंदर कथासंग्रह. वाचायलाच हवा. एक थेट भिडणारा विषय.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/aai_viruddh_baai_shrikant_bhosle.pdf

मण्यांच्या वस्तू : मनिषा देवळे, नंदिनी धारगळकर

हस्तकलेचं एक सुंदर पुस्तक. मण्यांचा आकाशकंदिल, पर्स आणि बरंच काही.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mani_art__manisha_devale.pdf