काश्मीर खो-यातील तरूणांच्या उद्यमशीलतेची कहाणी: ‘पाईप’ऍपच्या नव्या’स्टार्टअप’चा शुभारंभ !

काश्मीर खो-यातील तरूणांच्या उद्यमशीलतेची कहाणी: ‘पाईप’ऍपच्या नव्या’स्टार्टअप’चा शुभारंभ !

Thursday December 10, 2015,

5 min Read

“ काश्मीर खो-यात सततच्या संघर्षामुळे आणि अस्थिरतेमुळे अर्थव्यवस्था आणि विशेषकरून श्रम बाजारावर खूपच नाट्यमय प्रभाव पडला आहे. त्यामुळे तरुणांमध्ये काही विशेष प्रकारच्या रोजगाराबाबत एक सामाजिक-सांस्कृतिक धारणा तयार झाली आहे. उदाहरणच सांगायचे झाले तर, सरकारी कर्मचा-यांना संप किंवा संचारबंदी दरम्यान देखील भरपाई मिळते, ज्यामुळे सरकारी नोकरीला स्थिर मानले जाते. जर आपण नाण्याची दुसरी बाजू पहिली तर, उद्योजकता आणि खासगी क्षेत्रातील नोक-या जोखमीच्या तर असतातच, शिवाय त्या अस्थिर देखील असतात. सतत सुरु असणारे संघर्ष आणि अस्थिरता आमची सध्याची शिक्षण प्रणाली आणि रोजगार बाजार, यांच्यातील असमानता कुठल्याही प्रकारच्या उभरत्या उद्योगाच्या (‘स्टार्टअप)’च्या वृद्धी आणि विकासात सर्वात मोठा अडथळा आहे. इतकेच काय तर, तंत्रज्ञानक्षेत्रातील ‘स्टार्टअप’ काश्मीरच्या वेगळ्या ‘स्टार्टअप’ तंत्राला एक चांगली संधी देऊ करत आहेत. अपयशी ठरल्यावर तंत्रज्ञानक्षेत्रातील ‘स्टार्टअप’ एखाद्या औद्योगिक किंवा उत्पादीत ‘स्टार्टअप’च्या बदल्यात कमी नुकसान होणा-या गोष्टीच्या समोर-समोर येतात. अशातच आम्ही येणा-या दिवसात खो-यात अधिकाअधिक तंत्रज्ञानविषयक ‘स्टार्टअप’ समोर येण्याची अपेक्षा करतो आहोत, जे काश्मीर मध्ये ‘स्टार्टअप’ संस्कृतीच्या निर्मितीत खूपच सकारात्मक पाऊल ठरेल.” हे म्हणणे आहे काश्मीरखो-यात एक तांत्रिक स्टार्टअप चालवणा-या दोन तरुणांचे. ज्यांचे नाव आबिद रशीद लोन आणि जुबेर लोन आहे.

image


काश्मीरचे हे दोन तरुण ‘पाइप’ नावाचे ऍप्लिकेशन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. ज्याच्या मदतीने ग्राहक एकमेकांना सूचना, मेसेज आणि लिंक आपल्या आवडीनुसार पाठवू शकतात. या ऍप बद्दल सांगताना जुबेर सांगतात की, “पाइप’ विभिन्न उपकरणे आणि त्या जागेशी संबंधित लोकांमध्ये एकसमानरित्या माहिती देण्याकडे आपले लक्ष केंद्रित करतो आणि ते देखील योग्य वेळेत. सोबतच आम्ही हे देखील समजतो की, वर्तमानात लोकांना केवळ तीच माहिती आणि संदेश हवा असतो, जो त्यांच्या कामाचा आहे किंवा ज्यात त्यांना रुची असेल. ‘पाइप’ आपल्या उपभोक्त्यांना याबाबतची सूट देतो की, ते सहजरित्या त्या लोकांची निवड करू शकतात, ज्यांचे संदेश आणि माहिती त्यांना पाहिजे आहेत.”

image


पुढे माहिती देताना ते सांगतात की, “ या आधी तुम्हाला मेसेज, ईमेल आणि समूह संपर्क माध्यमाच्या एका मोठ्या जाळ्यातून आपले काम आणि आपल्या आवडीचे संदेश इत्यादी निवडण्यासाठी खूपच उर्जा आणि वेळ वाया घालवावा लागत होता. आमच्या ‘पाइप’ ऍपच्या मदतीने उपभोक्ता सध्याच्या वेळेत केवळ आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून लगेचच महत्वाची आणि उपयोगी सामग्री प्राप्त करू शकतात.” याप्रकारे उपभोक्त्याचा अमुल्य वेळ वाचविण्यात हा ऍप खूपच महत्वाचा सिद्ध होत आहे.”

जुबेर यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी तर मिळालेली आहे, शिवाय ते एक व्यावसायिक प्रकल्प व्यवस्थापक देखील आहेत. तसेच दुसरीकडे त्यांचे सह-संस्थापक आबिद तांत्रिक माहितीच्या क्षेत्रात पदवीधर आहेत. आबिद सांगतात की, “ आमच्या दोघांची भेट वर्ष २००९ मध्ये झाली आणि त्यानंतर आम्ही कमी खर्च येणा-या काही संकेतस्थळांचा विकास करण्याव्यतिरिक्त काश्मीरखो-यातील स्थानिक व्यवसायाशी संबंधित एका ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित निर्देशिका तयार केली. त्यानंतर वर्ष २०१० मध्ये आम्ही संकेतस्थळावर आधारीत असा मंच तयार करण्याच्या दिशेने आपले पाउल टाकले, जे उपभोक्त्यांना एसएमएस च्या माध्यमातून विभिन्न आणि तात्काळ माहिती उपलब्ध करून देईल. त्याच दरम्यान वर्ष २०१० मध्ये काश्मीरखो-यात पसरलेल्या अस्थिरतेमुळे एसएमएस सेवेवर बंदी घालण्यात आली, जी २०१४पर्यंत लागू होती. एकदा प्रतिबंध हटल्यानंतर आम्ही आमच्या पाच वर्षाच्या जुन्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकत्र आलो. या पाच वर्षात खूप काही बदलले होते. त्यामुळे आम्ही एका संकेतस्थळाच्या जागी एक ऍप्लिकेशन तयार करण्याचा विचार केला आणि या प्रकारे ‘पाइप’ची निर्मिती झाली.

image


तंत्रज्ञानाचे वेड असलेल्या या तरुणांनी हा ऍप तयार करण्यासाठी कुणाकडूनही आर्थिक मदत घेतली नाही आणि त्यासाठी पूर्णपणे आपल्या व्यक्तिगत खर्चातून प्रारंभ केला. समोर आलेल्या अडचणीबद्दल बोलताना आबिद सांगतात की, “ आम्ही गेल्या ८ महिन्यापासून हा ऍप तयार करत होतो आणि १७ ऑक्टोबरला आम्ही याचे अनावरण करण्यात यशस्वी झालो. आमचा आतापर्यंतचा प्रवास खूपच शानदार आहे आणि यातून आम्हाला एक चांगली शिकवण देखील मिळाली आहे. आमच्या समोर हे आव्हान होते की, पुन्हा एकदा आम्हाला मेसेजिंग किंवा समूह संपर्क माध्यमातील ऍप तयार करायचे नव्हते. अशातच आम्ही एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालो.” ‘पाइप’ ‘गुगुल प्ले स्टोर’वर आल्यानंतर ते काही गुंतवणूकदारांच्या संपर्कात आहे, ज्यांनी त्यांच्या ऍप मध्ये रुची दाखवली आणि आता ते सकारात्मक होण्याच्या वाटेवर आहे.

गेल्या एका महिन्यात या जोडीने आपल्या ‘पाइप’ ऍप मध्ये सुधारणा करत ६ वेळा अपडेट केले आहे. आबिद सांगतात की, “आम्ही सुरुवातीला एंड्राइड आधारित ऍप सोबत सुरुवात केली आहे आणि आम्ही आयोएस आणि विंडोज साठी नविन योजना आखण्याचे काम सुरु केले आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही संकेतस्थळाच्या आवृत्तीबाबत देखील प्रयत्नशील आहोत. आम्ही ‘पाइप’ची पूर्वकल्पना अशा एका माहिती प्रसार सेवेच्या रुपात करत आहोत, जे विभिन्न उपकरणे आणि त्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही.” त्या व्यतिरिक्त त्यांचे म्हणणे आहे की, वर्तमानात या दोघांचा उद्देश येणा-या भविष्यात अन्य एका ऍप च्या विकासावर लक्ष न देता, याच ऍपला अधिकाधिक उत्कृष्ट बनविण्याचा असेल.

image


या तरुण संस्थापकांचा उद्देश वर्तमानात भारताव्यतिरिक्त जगात वाढणाऱ्या स्टार्टअपच्या गतीकडे लक्ष केंद्रित करण्याचा असेल. त्यांचे म्हणणे आहे की, वास्तवात तरुणांसाठी आम्हाला काहीतरी प्रेरणादायक बनवायचे आहे. जेणेकरून ते देखील या ऍपचा उपयोग काळाच्या वाढणा-या गतीसोबत घेतील. ते पुढे म्हणतात की, “ काश्मीरचे हजारो शिक्षित तरुण उत्पादक आणि फायदेशीर रोजगाराबाबत खूपच अंधकारमय संधीचा सामना करतात. जागतिक स्तरावर लक्ष दिले तर, बेरोजगार तरुणांसमोर देखील अशाच काही समस्या येतात. बेरोजगारीच्या या नकारात्मक प्रभावाव्यतिरिक्त येथील तरुण सामाजिक–सांस्कृतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी देखील हतबल आहेत. काश्मीरचे स्थायी भविष्य अर्थव्यवस्थेच्या उत्पादीत क्षेत्रांमध्ये सध्याच्या नोकरीवर अवलंबून राहण्याव्यतिरिक्त यावर देखील निर्भर करते की, काश्मीरच्या तरुणांना या माध्यमातून आपल्या भविष्याच्या निर्मितीची परवानगी दिली जावी. एका स्टार्टअप संस्कृतीची निर्मिती आणि विकास हाच एकमेव रस्ता आहे, जो काश्मीर मध्ये रोजगाराच्या सृजन आणि तरुणांच्या सबलीकरणाच्या दिशेने उपयोगी पडेल.


लेखक: निशांत गोयल

अनुवाद: किशोर आपटे.