गरमागरम खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणारे ʻरॉकेटशेफʼ

0

जेव्हा तुम्ही ऑनलाईन एखादा खाद्यपदार्थ मागवता, तेव्हा तुमच्यापर्यंत तो पोहोचेपर्यंत गरम असावा, अशी तुमची अपेक्षा असते. एखाद्या अस्सल खवय्यालाच गरमागरम पदार्थांचे महत्व आणि त्यांची चव समजू शकते. गुडगावस्थित ʻरॉकेटशेफʼ, हा एक फूडट्रक असून, ते दुचाकी आणि गाड्यांच्या मदतीने ग्राहकांना घरपोच अन्न पुरवण्याचे काम करतात. ७० लाखांच्या गुंतवणुकीच्या सहाय्याने ऑक्टोबर २०१५ साली रॉकेटशेफ सुरू करण्यात आले. रॉकेटशेफ व्हॅनमधील शेफ स्टोन-ओवन थिन क्रस्ट पिझ्झा तसेच सॅण्डविच ग्राहकांना ऑफर करतात. एखादा ग्राहक स्थान निर्देशक एप्लिकेशन किंवा फोनद्वारे आपल्याला हव्या असलेल्या खाद्यपदार्थाची त्यांच्याकडे मागणी करू शकतो. त्यानंतर ते तो पदार्थ घरपोच करतात. तसेच एप्लिकेशनच्या सहाय्याने ग्राहकांना हा फूडट्रक कुठे आहे, याची माहिती मिळू शकते.

या रॉकेटशेफचे संस्थापक आणि मुख्य कार्य़कारी अधिकारी रामनिधी वासन सांगतात की, ʻमाझ्या मनात कायम एका लहान व्यवसायाची कल्पना होती. जो कालांतराने अनुभवसमृद्ध होईल आणि अस्सल खवय्यांना स्वतःकडे आकर्षित करेल.ʼ गेली दोन दशके या क्षेत्रातील बड्या कंपन्यांसोबत जसे की ऑबेरॉय हॉटेल, सायट्रस हॉटेल, वेस्टिन (हैदराबाद), मॅरीएट (बंगळूरू), एचव्हीएस इंटरनॅशनल आणि रिलायन्स पेट्रोलियम यांसोबत काम केल्यानंतर राम यांचे कायम यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचे आणि अनुभवसमृद्ध काम करण्याचे स्वप्न होते. राम यांनी नवी दिल्लीमधील पुसा येथील इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ऑबेराय स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीला रॉकेटशेफ य़ांच्याकडे चार व्यावसायिक शेफ आणि तीन वाहने आहेत. तसेच त्यांनी एक विशेष ओवनदेखील तयार करुन घेतला आहे, जो कमीतकमी वेळेत खाद्यपदार्थ गरम करतो. दिवसागणिक ते ५०० रुपयांचे ६० ते ७० पिझ्झा ग्राहकांना पोहोचवतात. त्यातील ६० टक्के हा त्यांचा नफा असतो. रामनिधी सांगतात की, ʻआमची खरी गुंतवणूक पिझ्झा व्हॅन ही होती. त्यासाठी जवळपास सहा ते सात लाख रुपये खर्च आला. प्रत्येक पिझ्झा व्हॅनचा प्रतिदिन व्यवसाय हा ३५०० रुपये एवढा आहे. त्याशिवाय त्यांनी पिझ्झा किओक्स तयार केला असून, त्याचा खर्च जवळपास दोन लाख रुपये एवढा आला. सद्यस्थितीला या स्टार्टअपमध्ये १६ कर्मचारी आहेत.ʼ रॉकेटशेफच्या व्यवसायात प्रतिमाह ४० टक्क्यांनी वाढ होते. गेल्या दोन ते तीन वर्षात दिल्ली, मुंबई, गुडगाव, बंगळूरू आणि चेन्नई येथे २५० पिझ्झा व्हॅन आणि किओक्स तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच १० ते १२ कोटींचा महसूल गोळा करण्याची त्यांची इच्छा आहे.

फूडट्रकचा इतिहास हा १८०० सालातील आहे. जेव्हा टेक्सासस्थित चकवेगॉन यांनी अमेरिकन फूड ट्रक तयार केला होता. कालांतराने हा ट्रेंड ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स आणि मॅक्सिको येथे प्रसिद्ध झाला. भारतात या ट्रेंडने अजूनही ग्राहकांच्या मनात एक विशेष जागा तयार करायची आहे. काही दिवसांपूर्वी बंगळूरू सारख्या शहरांमध्ये हा ट्रेंड दिसू लागला आहे. जिप्सी किचन आणि स्पिटफायर बार्बेक्यू सारखे फूडट्रक स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ ट्रकबाहेर शिजवू लागले होते. दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैदराबाद यांसारख्या शहरांमधील लोक बाहेरील खाद्यपदार्थांना प्राधान्य देतात. आयबीइएफच्या मते, भारतीय फूड बाजारपेठेत सध्या १.३ अब्ज डॉलरची आर्थिक उलाढाल होते. तसेच २० टक्क्यांनी त्यात वाढ होत असते. तसेच भारतात नियोजित खाद्यपदार्थांच्या व्यवसायात (ऑरगनाईज्ड फूड बिझनेस) जवळपास ४८ अब्ज डॉलरची तर अन्न घरपोच करण्याच्या (फूड डिलिव्हरी) व्यवसायात जवळपास १५ अब्ज डॉलरची उलाढाल होते. मात्र या क्षेत्रात खरंच वाढ होत आहे का? २०१५ साली या व्यवसायात बऱ्याच उलाढाली झाल्या. आर्थिक अडचणी, कर्मचाऱ्यांची कमतरता यांमुळे अनेक व्यवसाय बंद झाले.

गेल्या एप्रिल महिन्यात अन्न व्यवसायात सात व्यवहारांमुळे जवळपास ७४ दशलक्ष डॉलर्सचा फायदा झाला. ऑगस्ट महिन्यात पाच व्यवहारांमुळे १९ दशलक्ष डॉलरची उलाढाल झाली. तर सप्टेंबर महिन्यात फक्त दोन व्यवहार झाले. इंडिया कोशनचे संस्थापक आनंद लुनिया सांगतात की, ʻतुम्ही जर पाहिलत तर तुमच्या लक्षात येईल की, आतापर्यंत प्रत्येक वेन्चर कॅपिटलने वेगळ्या क्षेत्रात पैसे गुंतवले आहेत. त्यापैकी अनेकांचा फायदादेखील होत नाही.ʼ या क्षेत्रातील स्टार्टअप्स डाझो आणि स्पूनजॉय यांनी ऑक्टोबरमध्ये आपले व्यवसाय बंद केले. तर टायनीआऊलने चार शहरातील आपली कार्य़ालये बंद केली. तसेच ऑक्टोबर मध्यापर्यंत ३०० कर्मचारी बेरोजगार झाले.

भारतातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांवर आधारित रॉकेटशेफचे मॉडेल आहे. रामनिधी सांगतात की, ʻरॉकेटशेफ सध्या विकसनशील अवस्थेत आहे. खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणे त्यापासून ते खाद्यपदार्थ तुमच्या दारात तयार करणे, यापर्य़ंतचा प्रवास सध्या रॉकेटशेफ करत आहे. आम्ही फक्त ब्रॅण्ड तयार करायचे काम करत नाही. तर पिझ्झा तयार करण्यासाठी, तो घरपोच पोहोचवण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठीची एक इकोसिस्टम तयार करण्याचे काम करत आहोत.ʼ

लेखक - अपराजिता चौधरी

अनुवाद - रंजिता परब

Related Stories