‘बळीराजा ते ग्राहक राजा यांना जोडणारा’ समीर आठवले यांचा अभिनव सेवाभावी प्रयोग ‘शॉप फॉर चेंज’

‘बळीराजा ते ग्राहक राजा यांना जोडणारा’

समीर आठवले यांचा अभिनव सेवाभावी प्रयोग ‘शॉप फॉर चेंज’

Saturday April 08, 2017,

10 min Read

‘शेतक-याला त्याच्या जीवनातील दुष्टचक्रातून बाहेर काढतानाच ग्राहकांचेही हित साधणा-या आगळ्या-वेगळ्या प्रयोगाची कधीही शेती न केलेल्या धडपड्या तरूणाने सुरू केलेली नव्या बदलाची यशस्वी कहाणी ‘शॉप फॉर चेंज’ वाचा आणि मदतीचा हात द्या. . . . . .!’

गेल्या काही वर्षात आपल्या देशात शेती आणि शेतीच्या विकासाचे प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसतात. याचे कारण बातम्यांमध्ये शेतकरी आत्महत्या आणि शेतक-यांची आंदोलने किंवा कर्जमाफीसारख्या राजकीय मागण्या आपल्याला वाचायला-पहायला मिळत आहेत. या प्रश्नाबाबत बोलताना गेल्या ५० वर्षात स्वातंत्र्योत्तर काळात शेतीच्या विकासाला योग्य दिशा मिळाली नाही हे लक्षात येते. यामागची कारणे राजकीय, सामाजिक तसेच भौगोलिक आणि जागतिक आहेत हे देखील जाणवते.

परंतू हा प्रश्न जर एखाद्या कधीच शेती न केलेल्या आयटी मध्ये मार्केटिंग करणा-या व्यक्तीने उत्तम पध्दतीने हाती घेतला आणि बळीराजा ते ग्राहक राजा यांच्यामधली मध्यस्थ नावाची साखळी तोडून दोघांचा निरपेक्षपणे फायदा करून दिला असे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. होय ‘युअर स्टोरी मराठी’ च्या वाचकांना आम्ही अश्याच एकाच अनोख्या शेतीच्या उध्दारकर्त्याच्या विचारांची आणि कामाची ओळख करून देणार आहोत. त्यांचे नाव आहे समीर आठवले. त्यांच्या "शॉप फॉर चेंज" या अभिनव संकल्पनेच्या यशस्वी प्रवासाची. ज्यांची स्वत:ची शेती नाही किंवा शेतीचा काहीच अनुभव त्यांच्या पाशी नव्हता अशी व्यक्ती देखील आज राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक शेतक-यांच्या कृषीमालाला चांगली बाजारपेठ आणि भाव मिळवून देण्याचे काम ते करत आहेच शिवाय ग्राहकांना देखील चांगला दर्जेदार कृषीमाल मिऴवून देत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता असलेल्या या तरूणांने आपल्या बाजार-विपणनाच्या क्षेत्रामधील कौशल्यातून शेतीच्या क्षेत्रातील मूळ समस्येला कसा हात घातला आहे त्याची स्टोरी आम्ही जाणून घेतली.

सेंद्रीय शेतीच्या क्षेत्रात माहिती देण्याच्या आणि त्याद्वारे मार्केटिंग करण्याचा व्यवसाय करता करता समीर आठवले यांचा देशातील लहान मोठ्या किमान पन्नास हजार शेतक-यांशी थेट संवाद झाला. एक अभियंता असलेल्या समीर यांचा तसा शेतीच्या विषयाशी संबंध नव्हता मात्र शेतीच्या प्रश्नात आज शेतकरी आणि ग्राहक यां दोघांना त्रास दायक ठरणारा मध्यस्थांचा प्रश्न त्यांनी जवळून अभ्यासला. आणि यातूनच एका अस्वस्थतेचा जन्म झाला. ही स्थिती बदलता यावी यासाठी काही करण्याची उर्मी त्यांच्या अंतरात्म्यात दाटून आली.


image


ते म्हणतात की, “ सेंद्रीय शेतीसंबंधी उत्पादने विकताना मला जाणवले की पाच एकरचा असो किंवा पन्नास एकरचा शेतकरी असो दोघांचे दु:ख एकच आहे.” ते पुढे म्हणाले की, “ जॉन एफ केनेडी यांचे प्रसिध्द वाक्य आहे की, फार्मर इज ओनली परसन हू बाय इन रिटेल ऍण्ड सेल इन होलसेल” जसे चर्चिल यांनी देखील म्हटले आहे की, ‘जो पिकवतो आणि जो घेतो त्याना दोघांनाही त्यांचे मुल्य ठरविण्याचा अधिकार नाही तो अधिकार आहे मध्यस्थाला”. आणि हा मध्यस्थच मग ग्राहक आणि शेतकरी या राजा म्हटल्या जाणा-या दोघांना गुलाम बनवितो. आणि नफेखोरी पासून भेसळी पर्यंत सा-या त्या गोष्टी करतो ज्यातून त्याचा फायदा त्याला हवा असतो. त्यामुळे शेतक-याला त्याच्या उत्पादनाच्या मेहनतीच्या आणि खर्चाच्या तुलनेत कमी भाव मिळतो आणि त्याचा धंदा आतबट्ट्याचा होतो, तर ग्राहकाला हवा तसा शुध्द शेतीमाल मिळत नाही आणि जास्त पैसे कितीही कसेही देवूनही त्याला भेसळयुक्त आणि कमी दर्जाचा माल घ्यावा लागतो. ही साखळी तोडण्याचा निर्णय आठवले यांनी घेतला.

ते म्हणाले की, “ग्राहक चांगल्या वस्तूला चार पैसे जास्त देवून घ्यायला तयार आहे मात्र त्याला दर्जा हवा आहे मात्र याचा फायदा घेवून मध्यस्थ हवा तसा दर घेवूनही शेतक-याला मात्र कमी पैसे देतो आणि ग्राहकाला देखील हव्या त्या प्रतिचा पुरवठा करत नाही.” आठवले यांनी या विषयावर पूर्ण वेळ देण्याचे ठरविले आणि घरच्या कौटूंबिक जबाबदा-या त्यांच्या धर्मपत्नीने स्विकारण्यास मान्यता दिल्याने त्यांना या क्षेत्रात मग पूर्णत: काम करण्यास वाव मिळाला.


image


ते म्हणाले की, “ १३-१४ साला पासून अनेकांना भेटलो, अभ्यास केला आणि या प्रश्नाचा अभ्यास केला त्यावेळी समजले की, नव्या बाजारपेठीय सूत्राने हा प्रश्न मार्गी लावता येईल”. म्हणजे नेमके काय? यावर ते म्हणाले की, शेतक-याना त्यांचा दर्जेदार माल त्यांच्या नावाने थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून द्यायचा प्रयोग सुरू केला. मग त्यांनी अशी जाहिरात केली.

‘बारीपाडा शेतक-यांचा उत्कृष्ट इंद्रायणी तांदूळ तुमच्या घरी’

धुळ्यातील बारीपाडा येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला. सुवासिक सेमी पोलिश इंद्रायणी तांदूळ. तुम्हाला आपल्या डोंबिवली, ठाणे व विक्रोळी येथील केंद्रांद्वारे उपलब्द्ध करून देण्यात आम्हाला आनंद होत आहे.

ते म्हणाले की, “हा तांदूळ बारीपाडा येथील मेहनती व प्रगतिशील शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे. तांदुळाच्या प्रत्येक पॅक वर (५ किलो किंवा १० किलो) पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव देण्यात आलेले आहे. बारीपाडा येथील शेतकरी व त्यांचे नेतृत्व श्री चैतरामजी पवार यांच्या कडे आहे त्यासाठी डोंबिवली येथील सेवाभावी संस्था विवेकानंद सेवा मंडळाचे सहकार्य त्यांना लाभले.

आठवले म्हणतात की, “ही आपल्या भारतातील फेअर ट्रेड क्रांतीची फक्त एक सुरुवात आहे. रास्त भावाने थेट ग्राहकांना माल मिळतो आणि शेतक-याला त्यांच्या उत्पादनाधारीत किंमतही मिळते. हा तांदूळ ५ किलो पॅक ३७५ रुपये, १० किलो पॅक ७०० रुपये अशा दराने विकला जातो

ते जाहिरात करतात की,

‘आपण आपली ऑर्डर देऊन भारतातील शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी बळ* देऊ शकता. खालील पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत:

१) आमची *वेबसाईट www.shopforchange.in* वर ही ऑर्डर २४x७ नोंदवू शकता. आम्ही सुरक्षित पेमेंट गेटवे वापरतो.

२) खालील नंबर वर कॉल न करता फक्त दिलेल्या नमुन्यात मधील माहिती आम्हाला *whatsapp* करा:

9320032675

लिहा

तूमचे नाव:

तुमचा पत्ता:

किती किलो हवेत:

डिलिव्हरीची सोयीची वेळ:

३) 022 6533 5771 या नंबर वर सोमवार ते शनिवार मध्ये १० ते ६ या वेळात *कॉल करून ऑर्डर* नोंदवा.

*Terms and Conditions*

१) सध्या आम्ही फक्त डोंबिवली, ठाणे व विक्रोळी मध्येच डिलिव्हरी देतो.

२) ऑर्डर दिल्यानंतर हा तांदूळ आम्ही ८ ते १० दिवसात डिलिव्हरी देऊ.

३) कॅश ऑन डिलिव्हरी असल्यास सुट्टे पैसे देण्याची विनंती.

धन्यवाद,

*शॉप फॉर चेंज, फेअर ट्रेड टीम.*

*तुमचा मदतीचा हात कोणाला शेतकऱ्याच्या विधवेला, की जीवंत शेतकऱ्याला?*

समीर आठवले यांच्या या सेवाभावी कार्याबाबत त्यांच्या ग्राहकांना आणि शंभराहुन जास्त शेतकरी सहका-यांना समाधान आहे. त्यांची संस्था : शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचे उदिष्ट: ' शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड ' ह्या संस्थेने शेतकरी ते ग्राहक ह्यांच्यात सुसंवाद घडवून त्यांच्या मधील व्यापार (कुठल्याही आर्थिक स्वार्थाशिवाय) घडवुन आणण्यासाठी व्यासपीठ तयार करणे हे आहे.

या संस्थेचे संस्थापक समीर आठवले हे प्रॉडक्शन इंजिनअर (उत्पादन अभियंता) आहेत. समीर त्यांनी ३ वर्षे L&T मध्ये नोकरी केली आणि त्यानंतर साधारण सात वर्षे स्वतःचा व्यवसाय केला. समीर ह्यांची लहानपणापासून असलेली सामाजिक कामाविषयीची आवड आणि अध्यात्मिक बैठक त्यांच्या व्यवसायात त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तसे जुनेच प्रश्न पण कुठेतरी नवीन उत्तर शोधणं समीरना गरजेचं वाटू लागले. या अस्वस्थतेतून एका कधीही न संपणाऱ्या चळवळीचा जन्म झाला.

ते म्हणतात की, “ ज्या कारणाने मी अस्वस्थ होतो त्या स्थिती मध्ये बदल करायला हाव होता आणि हा बदल हा नेहमी आपल्या पासून घडवायचा असतो ह्या वाक्यावर माझा ठाम विश्वास होता.” कोणीतरी हे केलेच पाहिजे मग मी का नाही? ह्या भावनेतून २०१३-१४ पासून त्यांनी व्यवसायातून बाहेर पडून सामाजिक काम करायचे ठरवले. विविध प्रयोगांची सुरुवात झाली. अर्थात हे सगळं करताना त्यांना त्यांच्या पत्नीची साथ लाभली म्हणून हे शक्य झाले. समीर ह्यांनी ' शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड ' ह्या संस्थेला त्यांच्या जीवनाचे ध्येय बनवले आहे.

' शॉप फॉर चेंज ' चे काम सुरू झाले. सुरुवातीला छोटे प्रयोग करायचे ठरले. सुरुवात शेतमालाने करण्यापेक्षा प्रोसेस फूड नी करावी असे ठरले. कारण शेतमाल हा नाशिवंत आहे त्यामुळे पहिला प्रयोग त्या बरोबर करणे शक्य नाही. उत्तराखंड मधील महिला शेतकरी गटाने बनवलेले नैसर्गिक जाम, झारखंडमधील आदिवासी महिलांनी बनवलेले हॅन्ड मेड सोप, राजस्थानमधील आदिवासींकडील मध, कोकणातील फणस मोदक आणि देशभरातील कारागीरांनी बनवलेली ज्यूट आणि कॅनवास ची उत्पादने निवडून प्रवास सुरु झाला .

मुंबई मधील अनेक कंपन्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन, तेथे स्टॉल लावून मार्केटिंग सुरु झाले. L & T Infotech, WNS, Godrej आणि इतर कंपन्यांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. आता अस्तित्वात असलेल्या यंत्रणेबाहेर जाऊन नवीन यंत्रणा निर्माण करण्यावर भर दिला गेला. विक्रीतुन खर्च वगळता मिळालेला नफा ते उत्पादने बनवणाऱ्या लोकांमध्ये वाटला जाऊ लागला. वर्षभरात हजारो उत्पादन विकून अश्या प्रॉडक्ट ना सुद्धा बाजारपेठ मिळू शकते असा विश्वास निर्माण झाला. अगदी कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे यशस्वी होताना आढळला.

ते म्हणाले की, “ गेल्या वर्षी दुष्काळचे सावट आले पण संकट सुध्दा संधी घेऊन येते असा माझा विश्वास कायम होता. अशाच दुष्काळाने ग्रासलेल्या दोन शेतकरी कुटुंबाना ठाणे येथे पिठल-भाकरीचा स्टॉल ' शॉप फॉर चेंज' ने लावुन दिला. माझ्या शेतकरी मित्रांनी संधीचे सोने केले आणि केवळ महिनाभरात नव्वद हाजारांची कमाई केली.”


image


'शॉप फॉर चेंज' चे असे प्रयोग सुरूच आहेत. ‘जर ग्रामीण भागातील शेतकरी महिन्यातून एक दिवस मुंबई मध्ये आला आणि अश्या प्रकारे काही उपक्रम तयार केले गेले तर त्याच्या शेतीला लागणारे भाग भांडवल चांगल्या प्रकारे उभे राहू शकते. WNS आणि L & T INFOTECH मध्ये अश्या प्रकारे शेतकरी फूड फेस्टिवल उपक्रम ' शॉप फॉर चेंज ' ने राबवला आणि २ दिवसात माझ्या शेतकरी मित्रांनी दहा हजार रुपयांची कमाई केली’ असे ते सांगतात.

दुष्काळातुन सावरलेल्या शेतकऱ्याला नियमन मुक्तीच्या शासकीय निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी संप करून संकटात टाकले . ' शॉप फॉर चेंज ' तयार होतीच. त्यांनी शेतकऱ्याला मुंबईमधे शेतकरी ते ग्राहक विक्री केद्रांची साखळी उभारून दिली. जरी हे वरकरणी सोपे वाटले तरी ते उभे करण्यासाठी गेले वर्षभर प्रचंड काम चालु होते.

जुलै २०१६पासून ' शॉप फॉर चेंज ' च्या सुरु झालेल्या कामाने फेब्रुवारी २०१७पर्यंत कुठल्याही आर्थिक पठिंब्याशिवाय अनेक टप्पे गाठले. डोंबिवली, ठाणे इथे शेतकऱ्यांची दोन कायमस्वरूपी हक्काची विक्री केंद्रे सुरू झाली. फेब्रुवारी २०१७पासून मुंबईमध्ये घरपोच भाजी पोहचवण्याची व्यवस्था सुरू झाली. आतापर्यंत ५० ते ६० लाखांचा व्यवसाय शेतकरी गटांनी केला. १५-२० मराठी तरुणानां रोजगार उपलब्ध झाला. हे सगळे करताना प्रचंड अडचणींवर मात करून ' शॉप फॉर चेंज ' ही संस्था हा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे.

या त्यांच्या अभिनव कळ कळीच्या प्रयोगात त्यांना काही वाईठ गोष्टींचा सामना करावा लागणे ओघाने आलेच त्याबाबत सांगतात नते म्हणाले की, “आज मुंबई मध्ये पुष्कळ गट 'शेतकरी ते ग्राहक' उपक्रम राबवत आहेत. मला कुणावरही टिका करायची नाही पण यातील बरेच गट अजूनही कृषीउत्पन्न बाजार समिती मधून भाज्या आणून विकतात. आता भाजी तर फक्त शेतकऱ्यांचीच असते मग APMC मधून आली काय किंवा शेतकऱ्याकडून आणली काय? पैसे तर शेतकऱ्यालाच मिळत आहेत असा चुकीचा वाद सुध्दा ते घालतात.” त्यामुळेच 'शॉप फॉर चें ' सारख्या उपक्रमाचे वैशिष्ट्य, महत्व आणि जबाबदारी वाढते. इतर उपक्रमातील आणि यातील हा फरक मात्र ग्राहकांनी समजावून घेणे गरजेचे आहे.

ते म्हणतात, “ शेतकऱ्याची खरी समस्या 'दर (किंमत)' ही नाही तर त्याची खरी समस्या आहे की त्याच्या शेतात रोज झाड वाढते, तो झाडाला वाढण्यापासून थांबवू शकत नाही, रोज टोमॅटो पिकतो, २६ जानेवारीला त्याला सुट्टी देता येत नाही आणि दुसरे म्हणजे शेतमाल एकदा पिकला की, १-२ दिवसांपेक्षा जास्त ठेवता येत नाही. याच परिस्थितीचा फायदा अडते, मध्यस्थ, दलाल आणि इतर विक्रेते घेतात आणि त्याला खूप कमी दरात माल विकायला लावतात.


image


“ही स्थिती सध्या सरकारने केलेल्या नियमन मुक्ती नंतर सुद्धा फारशी बदलली नाही. जेव्हा नोटबंदी आली तेव्हा तर बाजार समिती ने व्यवहार बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी जुन्या नोटा घ्या नाही तर माल विकत घेणार नाही अशी अडवणूक केली. अशा अनेक अडचणीना शेतकरी दररोज तोंड देत आहे.” ते म्हणाले.

मात्र या स्थितीत देखील बळीराजाला थोडासा दिलासा गेल्या ५ -६ महिन्यात 'शॉप फॉर चेंज' च्या कामामुळे मिळाला आहे. शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा ३०-४०% अधिक रक्कम मिळू लागली आहे. तसेच त्यांची बाजारात होणारी पिळवणूक पूर्णपणे थांबली आहे. निदान या शंभर शेतक-यांना या व्यवस्थेमुळे नक्कीच कधीही आत्महत्येचा विचार करावा लागणार नाही. या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. आता 'शॉप फॉर चेंज' ला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे पण त्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची. आपल्या सहकार्याने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही चळवळ पोहचवून असे व्यासपीठ तयार करायचे आहे की कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्येचा विचारच करू नये!

हे सर्व करण्यासाठी काही गोष्टींची गरज आहे आठवेल म्हणतात की, “ शेतकऱ्याला यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग भरवणे, गावोगावी संकलन केंद्र उभी करणे, शहरी भागात विक्री केंद्र वाढवणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित तरुण उद्योजक घडवणे, ग्रामीण आणि शहरी भागात रोजगार निर्मिती करणे, आधुनिक आणि परंपरागत शेतीची सांगड घालणारे अभ्यासवर्ग घेणे, तंत्रज्ञानाचा वापर करून 'शेतकरी ते ग्राहक ' व्यासपीठ सक्षम बनवणे,

शहरी भागात ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करणे. यावर आम्हाला आता लक्ष द्यायचे आहे.” त्यासाठी आर्थिक बळ तर लागणार आहेच.

गेल्या सहा महिन्यापासून या सगळ्या गोष्टी ' शॉप फॉर चेंज ' ने कुठल्याही आर्थिक पाठबळाशिवाय उभ्या करून बदलाची सुरुवात केली. मात्र आता आपल्या सारख्यांच्या पाठींब्याची गरज आहे तो मिळाला तर हा बदल शाश्वत परिस्थितीत रूपांतरीत होईल ह्यात कुठलीही शंका नाही. ते म्हणातात, “आपण दिलेली आर्थिक मदत रुपये १० असो की दहा हजार रूपये ही थेट शेतकऱ्यापर्यंत पोहचेल ह्याची खात्री बाळगा.” या चळवळीच्या संस्थापकाशी आपण संपर्क साधू शकता.

समीर आठवले, संपर्क: ९३२००३२६७५

ई-मेल [email protected] किंवा आपली आर्थिक मदत तुम्ही थेट खाली दिलेल्या खात्यात ही टाकू शकता:

Shop for Change Fair Trade

HDFC Bank Ltd

A/c No. - 09981450000133

IFSC - HDFC0001573

Branch - Kalina, Santacruz East

Type of Account - SAVINGS (SB - INSTITUTION)

PAN AAMCS7573B

CIN U7499MH2009NPL189443