स्वत:चा पूत्र गमावला, तरीही या माणसाने गंभीर आजारी लोकांच्या ‘शुभमंगल’ साठी बनविले विवाह विषयक संकेतस्थळ!

0

पाच वर्षांपूर्वी विजय कुमार जुंजा या बंगळूरू येथील व्यावसायिकाला मुखाचा कर्करोग असल्याचे निदान झाले, हा कर्करोग पहिल्याच टप्प्यात होता त्यामुळे त्यावर उपचार झाले. मात्र यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या चेह-यावर व्रण होता ज्यामुळे त्यांच्यासाठी आलेल्या अनेक विवाह प्रस्तावात नकार हाती आला. मुली त्यांच्याशी लग्नासाठी बोलणी करायला येत होत्या मात्र त्यांना भेटून नंतर नकार देत होत्या. त्यांच्या या सा-या स्थितीला समजून घेईल अशी वधू त्यांना मिळेल ही आशा त्यांनी सोडून दिल्यात जमा होती. मात्र ते सुदैवी होते कारण त्यांच्या पाहण्यात ‘डिव्हाईन रिलेशन्स’ हे संकेतस्थळ आले. हे संकेत स्थळ खास करून त्यांच्या सारख्यांसाठीच होते ज्याना गंभीर आजार होते, आणि त्यातून बरे होवून ज्यांना संसार थाटायची इच्छा होती.


विजय यांनी या संकेतस्थळाबाबत बोलताना सांगितले की, “ मी डिव्हाईन रिलेशन्स वर नाव नोंदविले, आणि योग्य स्थळाची वाट पहात आहे. असे कुणी जिला माझ्या चेह-यापेक्षा मनाचे सौंदर्य पहायला आवडेल. अशी कुणी जी माझ्या सारख्याच गंभीर त्रासातून गेली असेल जी माझे दु:ख तिच्या दु:खावरून समजून घेवू शकेल”.

या संकेतस्थळाची  निर्मिती ज्यांनी केली त्यांचे नाव आहे विवेक शर्मा, ज्यांनी नोव्हे. २०१६ मध्ये सुशिल डुगर सोबत हे संकेतस्थळ सुरू केले, सुशील जे स्वत: ज्येष्ठ व्यवस्थापक म्हणून आयटी कंपनीत काम करतात. त्यांना लोकांना मदत करायला आवडते आणि नेहमी त्यासाठी ते धर्मादाय कामात सहभागी होत असतात. विवेक यांनी यापूर्वी देशभरातील अनेक औषधनिर्मीती कंपन्यातून कामे केली आहेत, जसे की सिप्ला आणि सॅनेफी. त्यांनी कार्डीयोलॉजी, ऑनकोलॉजी, आणि डायलिसीस सारख्या विभागातूनही कामे केली आहेत. जेथे मोठ्या प्रमाणात गंभीर दुखण्याने हैराण लोकांसोबत त्यांनी वेळ घालविला होता. डिव्हाइन रिलेशन्स बाबत बोलताना विवेक म्हणाले की, “ जे लोक गंभीर आजाराने त्रस्त असतात त्यांचा समाजाकडे पहायचा दृष्टीकोन वेगळाच असतो. त्यांनी आव्हान स्विकारलेले असते आणि समाजाने त्यांना फेकून दिले असते. माझ्यासाठी ते साधे लोक नाहीत, ते दिव्य आहेत, त्यामुळेच त्यांच्यासोबत  संबंध जोडणे म्हणजे डिव्हाईन रिलेशन्स आहेत.”

विवेक यांनी स्वत:च अशा दुर्दैवाचा सामना केला आहे, त्यांनी २०१४ मध्ये त्यांचा एकुलता मुलगा गमावला आहे. त्याला असा आजार होता ज्याचे शेवटपर्यंत निदानच झाले नाही. याचा परिणाम त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीच्या मनावर झाला आणि ते हताश झाले. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे अशा त्रासात असलेल्या लोकांना मदत करणे असे त्यांना जाणवले, मग त्यांनी सेवाभावी संस्था सुरू केली मिकी अमोघ फाऊंडेशन, जेथे असुरक्षित महिला, मुले, यांच्या आरोग्याची तसेच शिक्षण आणि कौशल्य विकासाची काळजी घेतली जाते.

डिव्हाईन रिलेशन्स बाबत सांगताना विवेक म्हणाले की, “ गंभीर आजाराने त्रस्त असलेल्यांना पाहून माझ्या मनात नेहमी दया येते, डिव्हाईन रिलेशन्सची कल्पना माझ्या मनात त्यावेळी आली जेंव्हा मी सातत्याने तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलत असे पुण्यातील प्रसिध्द ऑनकोलॉजिस्ट आणि मुंबईतील प्रसिध्द नेफ्रोलॉजिस्ट डॉ हेमल शहा. या दोघांशी नेहमी झालेल्या संवादातून समान मुद्दे आले की या गंभीर आजारतून रूग्णांना बाहेर पडल्या नंतर त्यांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर होत असतो. अश्या प्रकारच्या वाईट अनुभवातून मी देखील गेलो होतो. त्यामुळे अशा लोकांना मदत करावी असा मी विचार केला, त्यातून डिव्हाइन रिलेशन्स तयार झाले.”

सध्या त्यांना सर्वात मोठी समस्या हीच येते आहे की, या संकेतस्थळाबाबत जागृती होणे गरजेचे आहे. यासाठी ते सोशल मीडियाची  मदत घेतात मात्र त्यांना त्या पलिकडे पोहोचायचे आहे. डॉक्टरांच्या मते अशा रुग्णांचे चेहरे भयानक असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी अशा काही व्यवस्था होणे गरजेचे होते. याबाबत बोलताना डॉ हेमल शहा म्हणाले की, “ रुग्णांना लग्नाची समस्या ही नेहमीच येते, पण त्यांचे गांभिर्यच कुणाला समजले नाही. मला वाटते की विवेक आणि त्यांचे सहकारी ते समजले ही चांगली बाब आहे, हे आव्हान त्यांनी घेतले तरी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी ते दिलासादायक असेल.”