या तंत्रज्ञाला भेटा जीने भारतीय हवाई दलात सहभागी होण्यासाठी एमएनसी मधील नोकरी सोडली

या तंत्रज्ञाला भेटा जीने भारतीय हवाई दलात सहभागी होण्यासाठी एमएनसी मधील नोकरी सोडली

Monday July 03, 2017,

2 min Read

रूचा सुरेंद्र सियाल यांना भारतीय हवाई दलात सहभागी होण्याबाबत नेहमीच उत्सुकता होती. पुण्यातील बाणेर येथे सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची निवड त्या तीन महिलंमध्ये झाली ज्या फायटर स्क्वार्डन मध्ये पायलट म्हणून दाखल झाल्या. यामागे त्यांचे अनेक वर्षाचे स्वप्न साकारण्याची जिद्द आणि मेहनत यांचे दर्शन होते.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्यूटर टेक्नाॅलॉजी येथून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी बंगळूरू येथील प्रसिध्द कंपनीत नोकरी सुरू केली, केवळ यासाठीच की, त्यांना भारतीय हवाई दलात सहभागी होण्यासाठी प्रवेश परिक्षा देण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि तयारी करता यावी. त्या म्हणाल्या की, “ महाविद्यालयात ज्यावेळी मी अंतिम वर्षात शिकत होते, बंगळुरू स्थित सॉफ्टवेअर कंपनीने चांगल्या पगारावर नोकरीची संधी दिली. मला ती संधी घालवायची नव्हती कारण मला पुण्यात राहूनच भारतीय हवाई दलाच्या परिक्षेची तयारी करायची होती. आज माझ्या निर्णयावर मला खूप आनंद आणि समाधान आहे.”


Image: The Times of India

Image: The Times of India


रूचा यांनी वर्षभरापेक्षा कमी काळात परिक्षेची तयारी पूर्ण केली आणि त्या आता पुढील महिन्यात हैद्राबाद येथे जाण्याच्या तयारीत आहेत, जेथे त्यांना ७८ आठवड्याचे प्रशिक्षण मिळेल आणि त्या हवाईदलाच्या तांत्रिक विभागात रूजू होतील.

त्यांच्या पाठबळ देणा-या पालकांनी या सा-यात महत्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे हे सारे शक्य झाले. रूचा यांचे वडील व्यावसायिक आहेत आणि आई केंद्रीय अबकारी विभागात अधिकारी आहेत, ज्या पुण्यात सेवाकर विभागात काम करतात. मागील वर्षी याच काळात, तीन महिला— बिहारच्या भावना कांथ, राजस्थानच्या मोहना सिंह आणि मध्यप्रदेशाच्या अवनी चतुर्वेदी या तिघींनी भारतीय हवाई दलाच्या फायटर विमेन पायलट म्हणून दाखल होत इतिहास घडविला.

या तीनही महिला बहुतेक करून सुपरसोनिक सुखोई- ३० विमाने सप्टेंबर महिन्यात उडवतील, ज्यावेळी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. सध्या त्या पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी आहेत, एका वृत्तानुसार माजी हवाईदलप्रमुख अरूप राहा यांनी सांगितले, “ मला असे वाटते कि महिलांनी सुखोई-३० च्या फायटर स्क्वार्डन मध्ये जावे. जे हवाई दलातील सर्वात अत्याधुनिक फायटर आहेत आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणात जेट आहेत. जे सीमावर्ती भागातील विमान आहे, ज्याची कार्यपध्दती महिलांनी लवकरात लवकर शिकून घ्यावी.”