हावर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रसिध्द तृतीयपंथी कार्यकर्ती कल्की सुब्रमण्यम यांना भाषणाचे निमंत्रण!

हावर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रसिध्द तृतीयपंथी कार्यकर्ती कल्की सुब्रमण्यम यांना भाषणाचे निमंत्रण!

Tuesday February 07, 2017,

2 min Read

लेखक, अभिनेत्री आणि कार्यकर्त्या कल्की सुब्रमण्यम या तृतीयपंथीयाच्या समाजात अनेकांच्या आदर्श आहेत. तामिळनाडू मध्ये त्यांनी सहोदरी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. ज्याद्वारे २००८पासून वंचीत समाजातील तृतीयपंथीयाना सल्ला आणि मदत दिली जाते. या शिवाय त्यांनी तामिळ सिनेमा ‘नार्थगी’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे, ज्या तमिळ मुख्य प्रवाहातील पहिल्या तृतीयपंथी अभिनेत्री म्हणून उदयास आल्या. त्यांच्याकडे मास कम्यूनिकेशन आणि आंतरराष्ट्रीय संबंधाबाबतच्या दोन स्नताकोत्तर पदव्या देखील आहेत. 


image


तृतीयपंथी समाजात त्या नेहमीच जनजागृती मोहिमेत आणि कल्याणकारी उपक्रमात अग्रभागी राहिल्या आहेत, त्यांचा समाजावर खूप मोठा प्रभाव आहे. देशभरात मान्यता पावल्या नंतर त्यांची किर्ती आता जगभरात पोहोचली आहे. त्यांना हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि हार्वर्ड केनेडी स्कूल येथे इंडियन कॉन्फरन्स २०१७मध्ये व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ मी तृतीयपंथीयांच्या हक्कांबाबत, मुद्यांबाबत आणि उपाय योजनांबाबत बोलते, मी यावरही बोलते की आम्हाला माणूस म्हणून मानवी अधिकार समानाधिकार कसे प्राप्त होतील?” या निमंत्रणाने सन्मान दिल्याचे सांगून कल्की म्हणतात की, त्यांना हा सन्मान सा-या समाजबांधवांसोबत वाटून घ्यायचा आहे. त्या आता सामाजिक-आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. त्याबाबत जागतिक पातळीवरील उपाययोजना त्यांना या परिषदेतून शोधून काढायच्या आहेत. या बाबतच्या वृत्तानुसार, कल्की म्हणाल्या की, “ ज्यावेळी मला हे निमंत्रण मिळाले, मला सुखद धक्काच बसला. ही मला माझ्या तृतीयपंथीयांच्या बाबत भारतात केलेल्या काम जागतिक पातळीवर सांगण्याची संधीच आहे. मी या ऐतिहासीक चळवळीबाबत बोलणार आहे जिला अध्यात्मिक दर्जा असेल. मला जागतिक दृष्टीकोनातून ही चळवळ आणि भारतीय चळवळीतील पाश्चिमात्यांपेक्षा वेगळी असलेली वैशिष्ट्ये सांगायची आहेत.” जीवनांच्या कठीण काळातून वाईट अवस्थांमधून त्या कशा जात राहिल्या, मात्र कल्की यांची बांधिलकी आणि संकल्प विलक्षण होता.