आंबा महोत्सव व मॅन्गो ॲपचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन

0

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी विद्यापीठाच्या आवारात असलेले विविध जातीचे आंबे तसेच लागवडीसाठी लागणारे उपकरणे कोकण कृषी विद्यीपीठाने विकसित भाताच्या जाती, फळभाज्या आदींचे प्रदर्शन व माहिती आंबा महोत्सवात देण्यात आली.


राज्यपाल सी विद्यासागर राव व कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर व कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत मॅन्गो ॲपचे अनावरण करण्यात आले. या ॲपमध्ये आंब्याच्या लागवडी पासून ते थेट बाजारपेठेपर्यंत विक्री व्यवस्था याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे ॲपसाठी डॉ. एच.जी. भावे, डॉ. बी.आर. दळवी, अतुल पाटील यांनी परिश्रम घेतले.

यावेळी आमदार संजयराव कदम, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक व आचार्य पदवी घेतलेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.(सौजन्य - महान्युज)