गार्डन सिटी बंगळूरूच्या ‘मेट्रो’ स्तंभाना जोडून लवकरच तयार होत आहेत 'वर्टिकल गार्डन्स' 

0

भारताची गार्डन सिटी म्हणून प्रसिध्द असलेले बंगळूरू, मध्यंतरीच्या काळात हिरवळ कमी होत असण्याच्या समस्येला सामोरे गेले आहे, वाढत्या नागरिकीकरणाच्या समस्येत शहरातील झाडे तोडली जात होती. अलिकडेच अशी माहिती समोर आली की, एका जाहिरात कंपनीने झाडे तोडली कारण महत्वाच्या वाहतूक  जंक्शनजवळ त्यांच्या महत्वाच्या स्मार्टफोन कंपनीच्या जाहिराती झाडांमुळे नीट पाहता येत नव्हत्या. शहराच्या मेट्रो प्रकल्पासाठी, ज्याला ‘नाम्मा मेट्रो’ संबोधले जाते, ज्याचे काम सुरू आहे, त्यांच्या कामासाठी देखील खूप झाडांची कत्तल करण्यात आली होती. असे असले तरी या प्रकल्पाच्या आधारे काही नव्या झाडांची वाढ शहरात केली जात आहे.


Source : Times of India
Source : Times of India

हायड्रोफोनिक्स ही विशिष्ट पध्दत आहे, ज्यामध्ये झाडे मातीत रूजवली जातात आणि त्यांना वेगवगळ्या प्रकारच्या पोषणमुल्यांचा खुराक दिला जातो. मेट्रो वाहतूकीला आधार देण्यासाठी बांधण्यात येणा-या खांब आणि स्तभांना या हरितबागा जोडल्या जाणार आहेत. ‘हायड्रोब्लूम’ हा शहरातील नवउद्योग, या प्रकल्पाची जबाबदारी घेत आहे. त्यासाठी बंगळूरू मधील अनिल कुंबळे चौकात खांबावर बगिचा लावण्याची परवानगी मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड म्हणजेच बीएमआरसीएल ने दिली आहे. हा उपक्रम सध्या प्रायोगिक तत्वावर राबविला जात असून त्यांच्या यशस्वीतेच्या मापदंडानुसार त्याचा शहराच्या इतर भागात अंमल केला जाणार आहे. 

‘हायड्रोब्लूम’चे मुख्य कार्यकारी सुनिल जोस, यांनी चॅटच्या माध्यमातून सांगितले की, “ एकदा आम्हाला अपेक्षित परिणाम आले की, हा प्रकल्प पूर्णपणे एम जी मार्गावर राबविला जाईल.  आम्ही सामाजिक-व्यापारी बांधीलकीच्या कराराव्दारे यासाठी प्रायोजकांचा देखील शोध घेत आहोत. बंगळूरू सारख्या शहरात 'वर्टिकल गार्डन्स' अर्थात उभे बगिचे ही संकल्पना खरोखर उपयुक्त अशीच आहे कारण येथे प्रदुषणाची समस्या धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे.”

खास प्रकारची झुडूपे ९० टक्के कमी पाण्यात वाढवली जातात, आणि सर्वसामान्य प्रकारच्या मातीत वाढवली जातात त्या पेक्षा वेगळ्या वातावरणात पाचशे लिटर पाणी वापरून एका खांबावर ही रोपटी जगवली जातात आणि पाण्याची टाकी महिन्यातून केवळ एकदाच भरण्यात येते.

हा एक अभिनव असा प्रयोग आहे, सध्याच्या वाढत्या प्रदुषणाचे प्रमाण पाहता, आणि झाडांची वाढती कत्तल आणि त्यामुळे घटती संख्या पाहता केवळ बंगळूरूतच नाही तर आमच्या सर्वच मेट्रो शहरातून हा प्रयोग करण्याची आवश्यकता आहे.