तृतीय-चतुर्थश्रेणीच्या नोक-यांसाठी कुठलीही मुलाखत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी.

तृतीय-चतुर्थश्रेणीच्या नोक-यांसाठी कुठलीही मुलाखत नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी.

Saturday January 09, 2016,

2 min Read

केंद्र सरकारमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोक-यांमध्ये आजपासून कुठलीही मुलाखत होणार नाही. ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनी या तरुणांसाठी ‘नव्या वर्षाची भेट’ आणि भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी मोठे पाऊल असल्याचे सांगितले.

त्यांनी काल ट्विट केले की,

“तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या सरकारी नोक-यांमध्ये मुलाखत घेणे रद्द करण्यात येईल. यामुळे भ्रष्टाचाराला संपविण्यात मदत मिळेल.” दिल्लीपासून मेरठसाठी १४पथाच्या एक्स्प्रेस वेच्या नोएडामध्ये कोनशिला कार्यक्रमादरम्यान याबाबतच्या घोषणेनंतर त्वरित त्यांचे व्टिट आले आहे.

नोएडामध्ये एका रँलीला संबोधित करताना त्यांनी सांगितले की,

“आम्ही तरुणांना अद्भुत भेट देणार आहोत, जी तरुणांना भ्रष्टाचारापासून मुक्त करेल, त्यातून तरुणांना कुणावरही अवलंबून राहण्याच्या दबावापासून मुक्त करेल.”

पंतप्रधानांनी सांगितले की, “मुलाखतीला कुणाच्या प्रभावाचा वापर करून नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून पाहिले जाते. आणि या प्रक्रियेत योग्य लोक बाजूलाच पडतात. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला घेतला आहे की, नवीन वर्षाची भेट म्हणून, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोक-यांमध्ये कुठलीही मुलाखत होणार नाही.”

पंतप्रधानांनी २०१६ची सुरुवात होण्याच्या आधीपासूनच विकासाच्या गतीला वाढविले आहे. पंतप्रधानांनी दिल्लीच्या शेजारील नोएडाच्या सेक्टर–६२मध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवे आणि एनएच–२४ रुंदीकरणाचा पाया ठेवताना दिल्ली–एनसीआरच्या लोकांना नविन वर्षाची भेट दिली आहे. त्यामार्फत अडीच वर्षात निजामुद्दीनपासून युपीच्या सीमेलगत पासून दासना आणि हापुड यादरम्यान चालणा-या वाहनांना १४पथांमधील रस्ता मिळेल. त्याव्यतिरिक्त महामार्गाच्या दोन्ही बाजूला पादचा-यांसाठी फुटपाथ आणि सायकलचालकांसाठी सायकल ट्रेकची देखील व्यवस्था होईल. पंतप्रधानांनी पायाभूत सुविधांच्या परियोजनेच्या गरजांबाबत सांगितले की, अशा योजनांमुळे लोकांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण भागात विकासाची गती जलद होण्यासाठी पायाभूत सुविधांचा प्रकल्प लोकांचे उत्पन्न देखील वाढवेल.

image


या क्षणी पंतप्रधानांनी १८५७ च्या आंदोलनात मेरठच्या भूमिकेच्या स्मृती जागवल्या आणि सांगितले की, दिल्ली-मेरठ एक्सप्रेस–वे प्रदुषणापासून मुक्तता देईल.

परियोजना एका दृष्यात : ७५००कोटी रुपयांच्या या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मेरठचे अडीच तासाचे अंतर ४०मिनिटात पूर्ण होईल. या परियोजनेला पूर्ण होण्यात अडीच वर्षाचा कालावधी लागेल आणि हे काम ४टप्प्यात केले जाईल. ६पथांच्या एक्स्प्रेस वेसोबत एनएच२४ला डासनापर्यंत १४पथांचे केले जाणार आहे आणि त्यानंतर मेरठपर्यंत रस्ता १०पथांचा होईल. ६पथांच्या एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूला चार – चार पथांचा महामार्ग असेल.

लेखक : नीरज सिंह

अनुवाद : किशोर आपटे.

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा