मुंबईच्या या दोन मुलांना भेटा, जे अल्प उत्पन्नगटातील आहेत आणि यूएसमध्ये बॅले शिकत आहेत!

मुंबईच्या या दोन मुलांना भेटा, जे अल्प उत्पन्नगटातील आहेत आणि यूएसमध्ये बॅले शिकत आहेत!

Saturday May 27, 2017,

2 min Read

अनेकांना असे वाटत असेल की बॅले हा नृत्यप्रकार केवळ महिलांसाठी असेल, मात्र मुंबईची दोन मुले आहेत, त्यांनी ही परंपरा मोडली आहे. २१ वर्षांचे मनिष चौहान आणि १५ वर्षांचे अमिरुध्दीन शहा हे ते दोन मुंबईकर बॅलेरिनोस आहेत.


image


मनिष आणि अमीर यांनी त्यांचे सारे लक्ष बॅले शिकण्यावर असावे यासाठी शाळा सोडली आहे. नवी मुंबईच्या या रहिवाश्यांनी दोन वर्षापासून  इस्त्राईली-अमेरिकन शिक्षक येहूदा मॅवोर यांच्याकडून शास्त्रोक्त पध्दतीचे  डान्सवोर्क्स अकादमी येथून बॅले शिकण्यास सुरूवात केली. मॅवोर यांच्या मते, “ त्यांना अमेरिकेत जाण्याची गरज पडली कारण त्यांना मी जे काही शिकवेन त्यापेक्षा जास्त शिकण्याची आवश्यकता होती. माझ्या अंदाजापेक्षा त्यांनी प्रगती केली आणि मला याचा अभिमान वाटतो. भारताचे बॅलेसाठीचे ते उत्तर असतील, परंतू हे घडू शकले नसते जर त्यांनी जागतिक पातळीवरील ज्ञान घेतले नसते.”

मनिष यांचे वडील टॅक्सीचालक आहेत, आणि अमिर यांचे वडील बांधकाम कामगार आहेत. दोघेही अल्पउत्पन्न गटातील आहेत, त्यामुळे त्यांना डान्स वोर्कस् अकादमी येथील शुल्क परवडत नाही. यावर मनिष म्हणाले की, “ मला काही पैसे बचत करून माझ्या वाढदिवशी काही वर्षापूर्वी नृत्य कंपनीत काम करण्याची भेट मिळाली आहे, त्यांच्याकडे स्थानिक काम होते त्यात मी ऑडीशन दिले आणि शिष्यवृत्ती मिळवली. अमिरने ऑडिशन देखील दिले नाही परंतू मॅवोर सरांना खात्री होती की, त्यांला बक्षीस मिळेल. आम्हाला दोघांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.”

पोर्टलॅन्ड येथे त्यांना नुकतीच पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली असून वर्षभर प्रतिष्ठीत ओरेगॉन बॅले थिएटर (ओबीटी) येथे ते शिकत आहेत. ओबीटी हे खूप भव्य विद्यापीठ आहे, जेथे निकोलो फॉन्टे आणि जेम्स कुडेल्का यांच्या सारख्या दिग्गज कोरीओग्राफर्सचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. एका वृत्तानुसार मनिष म्हणाले की, “ जर मला ही संधी मिळाली आहे तर, मी माझ्या सहाध्यायींप्रमाणचे त्यासाठी संघर्ष करत आहे, नियमीत काम मिळावे म्हणून प्रयत्नरत आहे. आता मी स्वप्ने पाहण्याचे धाडस करतो आणि मला ज्यात गती आहे ते करतो”.

यावर मॅवोर म्हणाले की, “ मी ओबीटी मध्ये बॅले मास्टर लिसा किप यांना काही व्हिडीओ दाखवले आणि केवळ वर्षभरापूर्वी त्यांनी पोर्टलॅण्ड येथे ओबीटी मध्ये बोलावून त्यांना काही अधिकचे शिक्षण देण्याची तयारी दर्शवली.”

अलिकडेच, त्यांना दोघांनाही न्यूयॉर्क जॉफरी बॅले स्कूल येथील तीन महिन्यांची पूर्ण शिष्यवृत्ती देखील मिळाली. मात्र ते शिक्षणासाठी जावू शकले नाहीत कारण त्यांचा विसा वेळेवर तयार होवू शकला नाही. या काळात त्यांना अनेकदा कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून द्यावे लागले. या संधीमुळे आता ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांचे व्यावसायिक कौशल्य सिध्द करून दाखवतील. त्यांचे कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय यातून त्यांनी ही संधी खेचून आणली आहे. (थिंक चेंज इंडिया)

    Share on
    close