ऐका रेल्वे स्थानकावरील जादुई आवाज !

0

रेल्वे प्रवास म्हटलं कि अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटताना दिसतात आणि लांबवरचा पल्ला गाठायचा असेल तर विचारायलाच नको. मुंबई रेल्वे स्थानकावरून प्रवास करणे म्हणजे काही जणांसाठी तर  मोठं शौर्य गाजवण्यासारखे असते. भरगच्च गर्दीतून वाट शोधत सगळे प्रवासी धावपळ करताना दिसतात. याच धावपळीत गर्दीच्या ठिकाणी जर एखादा सुरेल आवाज तुमच्या कानावर पडला तर... तुमची पावलं थबकल्या शिवाय राहणार नाही ! 


सौविक मुखोपाध्याय, या पश्चिम बंगालमधील तरुण गायकाने आपल्या गोड आवाजाने आणि गिटार वाजविण्याच्या कौशल्याने सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. या तरुणाने रेल्वे प्रवासादरम्यान सहप्रवाशांना आपल्या गायन कलेने खूश केले. त्याच्या गायनाचे व्हिडिओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या गायकाच्या कलेला नेटिझन्सकडून भरभरुन दाद मिळत आहे.