स्टॅनफोर्डच्या संशोधकांनी तयार केले आहेत ‘कूलक्लोद्स’ जे तुमच्या शरीराला ठेवतात ३डिग्री थंड!

स्टॅनफोर्डच्या संशोधकांनी तयार केले आहेत ‘कूलक्लोद्स’ जे तुमच्या शरीराला ठेवतात ३डिग्री थंड!

Thursday October 06, 2016,

1 min Read

कूल कपड्यांची कल्पना पुन्हा शोधून काढण्यात आली आहे. स्टॅनफोर्ड विद्यापिठामधील अभियंता आणि संशोधकांनी स्वस्तातील या कूल परिधानाचा शोध घेतला आहे. प्लास्टिक आधारीत या कपड्यामुळे वातानुकूल यंत्रणेशिवाय लोकांना थंड राहता येणार आहे.

सायन्स मॅगेझीनच्या वृत्तानुसार, या कपड्यातून शरीराची उष्णता इन्फारेड रेडिएशनच्या माध्यमातून बाहेर टाकली जाते, त्यामुळे हे कपडे परिधान करणा-या व्यक्तिला २.७डिग्री सेल्सीयस सुती कपड्याच्या तुलनेत थंड वाटते, तर २.१ डिग्री सेल्सीयस इतके साधारण सिंथेटिक्स कपड्याच्या तुलनेत थंड वाटते.

image


“ साधारण स्थितीत, जेंव्हा तुम्ही व्यायाम करत नसता, ५०टक्के उष्णता इन्फ्रारेडच्या माध्यमातून उत्सर्जित केली जाते,” या अभ्यासगटाचे प्रमुख वाई कुई यांनी सांगितले. ही ती उष्णता असते जी पांघरुणात थांबवून ठेवली जाते, त्यातून शरीर गरम राहण्यास मदत मिळते.

त्यांच्या चमूने तयार केलेल्या कपड्यात याच्या नेमके उलट घडते, कोणत्याही अडय़ळ्याशिवाय रेडिएशन कपड्यातून बाहेर जाईल याची यात काळजी घेतली जाते. या तंत्रज्ञानामुळे केवळ वातानुकूल यंत्रणांचा वापरच केला नाही तरी चालते असे नाही तर बदलत्या हवामानात पंखा लावला नाही तरी शरीराची उष्णता कमी राहील याची या चमूने काळजी घेतली आहे.

सध्या, हे कापड थोडे जाड आहे आणि त्वचेवर थोडे विचित्र वाटतात. “ जेंव्हा आपण त्याला स्पर्श करतो, ते मुलायम आहे, ते लवचिक आहे आणि ते अगदी सर्वसाधारण कपड्यासारखेच वाटतात.” कुई यांनी अधिक माहिती दिली.

- थिंक चेंज इंडिया