‘असर-२०१६’च्या अहवालानुसार भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची चांगली प्रगती

 

‘असर-२०१६’च्या अहवालानुसार  भारताच्या तुलनेत  महाराष्ट्राची चांगली प्रगती

Friday January 20, 2017,

6 min Read

 शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रथम या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी असर राष्ट्रीय पाहणी करण्यात येते. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थितीविषयी ‘महाराष्ट्र असर-२०१६’ या अहवालाचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या संस्थापिका फरिदा लांबे उपस्थित होते. याप्रसंगी प्रथमने केलेल्या सर्वेक्षणासाठी सहकार्य केलेल्या ३४ एनजीओचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रथम शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने झालेल्या सर्वेक्षणात अनेक सामाजिक,शैक्षणिक संस्था डीआयइटी चे विद्यार्थी व व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. २०१७ मध्ये करण्यात आलेले असर हे सर्वेक्षण महाराष्ट्रातील ३३ ग्रामीण जिल्ह्यात ९७३ गावातील १९,४३० घरांमध्ये करण्यात आले.


image


महाराष्ट्रात ११ सामाजिक संस्था, २३ विश्वविद्यालय आणि महाविद्यालयांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील या सर्वेक्षणात ३ ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आणि ५ ते १६ वयोगटातील मुलांची सोपे वाचन व गणिताची चाचणी घेण्यात आली.

भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची चांगली प्रगती या अहवालात आढळून आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळांची इ. ५ वी ची ५१.७% मुले २०१४ मध्ये इ. २ रीच्या क्षमतेचा परिच्छेद वाचू शकत होती. हे प्रमाण २०१६ मध्ये ११% नी वाढले असून यंदा हे प्रथम ६२.७% झाले आहे. महाराष्ट्रातील शाळांमधील सुविधेत वाढ झाली आहे. तसेच भारताच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्रात मुलांची आणि शिक्षकांची अधिक उपस्थिती आढळून आली आहे. खाजगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची चांगली कामगिरी या पाहणीमध्ये आढळून आली आहे.


image


२०१६ चे ११ वे असर सर्वेक्षण हे एका वर्षाच्या अंतराने राष्ट्रीय स्तरावर झालेले आहे. २०१४ मध्ये १० वे असर सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावर झाले होते. महाराष्ट्रात २०१५ मध्ये देखील असर सर्वेक्षण झाले होते. असर सर्वेक्षणाची सुरुवात2005 मध्ये झाली, तेव्हापासून दरवर्षी हे सर्वेक्षण करण्यात येते. प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी ‘असर’ ही एक राष्ट्रीय पाहणी आहे. 'प्रथम’ शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने होणाऱ्या या सर्वेक्षणात देशातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था, DIETs चे विद्यार्थी व व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

असर 2016 हे 11 वे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे व महाराष्ट्राचे 12 वे सर्वेक्षण आहे. देशातील ग्रामीण भागातील मुले शाळेत जातात का? तसेच त्यांना त्यांच्या भाषेत सोपे वाचन करता येते का व सोपी गणिते सोडवता येतात का याची ‘असर’ मध्ये दरवर्षी पाहणी करण्यात येते. 3 ते 16 वयोगटातील मुलांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात येतो व5 ते 16 वयोगटातील मुलांची सोपे वाचन व गणिताची चाचणी घेतली जाते.

2016 चे 11 वे असर सर्वेक्षण हे एका वर्षाच्या अंतराने राष्ट्रीय स्तरावर झालेले आहे. 2014 मध्ये 10 वे असर सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावर झाले होते. महाराष्ट्रात 2015 मध्ये देखील असर सर्वेक्षण झाले होते. इथे दिली गेलेली माहिती राष्ट्रीय स्तराशी तुलना करून दिली आहे. त्यामुळे इथे 2014 च्या आकडेवारीशी तुलना केली गेली आहे.

2016 मध्ये असर महाराष्ट्रातील 33 ग्रामीण जिल्ह्यात, 973 गावांतील 19,430 घरांपर्यंत पोहोचले. महाराष्ट्रात 11 सामाजिक संस्था, 23 विश्वविद्यालये आणि महाविद्यालयांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले.

अहवालातील ठळक बाबी

महाराष्ट्र असर 2016 (महाराष्ट्र ग्रामीण)

.असर 2016 : महाराष्ट्र निष्कर्ष

6-14 वयोगटातील मुलांची पटनोंदणी उत्तम.

पटनोंदणीची एकूण टक्केवारी उत्तम दिसते. 2008 सालापासून 6 ते 14 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलांची नोंदणी 98.5% इतकी आहे. यावर्षी हे प्रमाण 99.1% इतके आहे.

महाराष्ट्रातील सुमारे 96%, 5 वर्षाची मुले बालवाडी, अंगणवाडी व प्राथमिक शाळेत दाखल झालेली आहेत.

2016 मध्ये महाराष्ट्रात 15-16 वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या मुलींचे प्रमाण 6.1% इतके आहे. तर भारतातील याच वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या मुलींचे प्रमाण 16.1% इतके आहे

खाजगी शाळांतून प्रवेश घेणाऱ्या 6 ते 14 वयोगटातील मुलांचे प्रमाण 18.3% (2006) ते38.3% (2016) असे वाढले आहे.

प्राथमिक शाळांतील मुलांची प्रगती उच्च प्राथमीक शाळांतील मुलांपेक्षा चांगली.

वाचन स्तर

खाजगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची चांगली कामगिरी

2016 मध्ये जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता 3 री च्या 41.2% मुलांना इयत्ता दुसरीच्या स्तराचा मजकूर वाचता आला तर खाजगी शाळांतील इयत्ता दुसरीच्या स्तराचा मजकूर वाचू शकणाऱ्या इयत्ता 3 री च्या मुलांचे प्रमाण 38.8% इतके आहे. जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता दुसरीच्या स्तराचा मजकूर वाचू शकणाऱ्या इयत्ता 3 री च्या मुलांचे प्रमाण खाजगी शाळांपेक्षा जास्त आहे.

इयत्ता 5 वी तील, दुसरीच्या क्षमतेचा मजकूर वाचता येण्याचे मुलांचे प्रमाण 2014 साली53.5% होते ते वाढून 2016 मध्ये 62.5% इतके झाले आहे.

भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची चांगली प्रगती

महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता 5 वी ची 51.7 % मुले 2014 मध्ये दुसरीच्या क्षमतेचा परिच्छेद वाचू शकत होती , हे प्रमाण 2016 मध्ये 11 टक्क्यांनी (percentage points)वाढून 62.7% इतके झाले आहे. तर भारतात शासकीय शाळांतील इयत्ता 5 वी ची 42.2 % मुले 2014मध्ये दुसरीच्या क्षमतेचा परिच्छेद वाचू शकत होती , हे प्रमाण 2016 मध्ये 0.6 टक्क्यांनी (percentage points) कमी होऊन 41.6% इतके झाले आहे

महाराष्ट्रात इयत्ता 1 च्या, अक्षरे व त्यापेक्षा अधिक वाचू शकणाऱ्या मुलांचे प्रमाण 2016 मध्ये60.7% इतके आहे, तर भारतात हे प्रमाण 53.9% इतके आहे.

गणित स्तर खालावलेला

2011 साली, इयत्ता 3 री तील 64.0% मुलांना हातच्याचे वजाबाकीचे गणित सोडविता आले नव्हते, हे प्रमाण वाढून 2014 मध्ये 81.3% इतके झाले होते. ते प्रमाण 2016 मध्ये थोडे कमी होऊन76.1% इतके झाले आहे. इयत्ता दुसरीतच या प्रकारची गणिते सोडविण्याचा अभ्यास मुलांकडून करून घेतला जातो.

इयत्ता 5 वी च्या मुलांना, भागाकाराचे गणित (3 अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे) सोडविता येण्याचे प्रमाण 2014 च्या तुलनेत वाढले आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 18.9% होते ते 2016मध्ये 20.3% इतके झाले.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र

2016 मध्ये, जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता 5 वी च्या मुलांचे वजाबाकी व त्यापेक्षा अधिक गणिते सोडविण्याचे प्रमाण हे 2014 पेक्षा इतर राज्यांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येते. राजस्थान मध्ये 2014 हे प्रमाण 32.2% इतके होते ते 2016 मध्ये 40.0% इतके झाले. तामिळनाडू मध्ये 2014ला हे प्रमाण 60.3% इतके होते ते 2016 मध्य 56.6% इतके झाले. हिमाचल प्रदेशमधे 2014 ला68.7% मुलांनी गणिते सोडविली होती 2016 ला हे प्रमाण 70.2% इतके झाले. तर महाराष्ट्रात 2014मध्ये 38.6% इतके होते ते 2016 मध्ये वाढून 47.0% इतके झाले. महाराष्ट्राच्या मुलांचे गणिते सोडविण्याचे प्रमाण कमी जरी असले तरी 2014 च्या तुलनेत 2016 मध्ये हे प्रमाण 8.4% (percentage points) वाढ झालेली आहे. इतर राज्यात इतक्या प्रमाणात वाढ झालेली दिसत नाही.

2016 मध्ये, जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता 5 वी च्या 19.4% मुलांना भागाकाराचे गणित सोडविता आले तर खाजगी शाळांतील भागाकाराचे गणित सोडवू शकणाऱ्या इयत्ता 5 वी च्या मुलांचे प्रमाण 21.5% इतके आहे. हे प्रमाण जवळपास सारखेच असल्याचे दिसून येते. तर भारतात जिल्हा परिषद शाळांतील 21.1% मुलांना भागाकाराचे गणित सोडविता आले तर खाजगी शाळांतील भागाकाराचे गणित सोडवू शकणाऱ्या इयत्ता 5 वी च्या मुलांचे प्रमाण 37.9% इतके आहे.

उच्च प्राथमिक शाळा

उच्च प्राथमिक शाळांतील मुलांच्या वाचन व गणित क्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत फारसा बदल नाही. महाराष्ट्रातील इयत्ता 8 वी च्या 24.2 % मुलांना इयत्ता दुसरीचा मजकूर वाचता आला नाही. याचा अर्थ या वयोगटातील सुमारे एक चतुर्थांश मुले पुढील शिक्षणासाठी तय्यार नाहीत. गणिताची परिस्थिती यापेक्षा बिकट आहे.

भारताच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्रात मुलांची आणि शिक्षकांची अधिक उपस्थिती

· 2016 ला महाराष्ट्रात ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वेक्षणाकरिता गेलेल्या दिवशी इयत्ता 1ते 4/5 शाळांमधील मुलांची सरासरी उपस्थिती 85.1% एवढी होती. उपस्थिती भारताच्या तुलनेत जास्त आहे, भारतात सर्वेक्षणाच्या दिवशी 71.4% एवढी सरासरी उपस्थिती होती.

· 2016 ला महाराष्ट्रात ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वेक्षणाकरिता गेलेल्या दिवशी इयत्ता 1ते 4/5 शाळांमधील शिक्षकांची सरासरी उपस्थिती 91.8% एवढी होती. भारतात सर्वेक्षणाच्या दिवशी85.4% एवढी सरासरी उपस्थिती होती.

महाराष्ट्रात शाळेतील सुविधेत वाढ

· मुलींकरिता स्वतंत्र,स्वच्छ व वापरण्यायोग्य शौचालयाचे प्रमाण 2010 मध्ये 43.2% इतके होते त्यात वाढ होऊन हे प्रमाण 2016 मध्ये 62.5% एवढे झाले आहे.

· शाळा भेटीच्या दिवशी 2010 मध्ये 90.7% शाळेत मध्यान भोजन दिले गेले होते, यात 2016मध्ये वाढ होऊन हे प्रमाण 94.5% शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले गेल्याचे दिसून आले.

· भेटी दिल्या गेलेल्या 92.1% शाळांमध्ये वीज पुरवठा आहे. त्यापैकी 78.4% शाळांमध्ये वीज पुरवठा सुरु होता. (सौजन्य : महान्युज)