दरवर्षी ४००००० बालकांचे वाचवणार प्राण: 'युनिसेफ' ची महत्त्वाकांक्षी सार्वजनिक लसीकरण मोहिम

घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हिपॅटायटीस ब हे असे सात रोग आहेत जे बालकांना अवचित गाठून त्यांचं जीवन संपवतात किंवा त्यांना जायबंदी करतातात. ‘मिशन इंद्रधनुष’ या केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेचं उद्दीष्ट या रोगांना नेस्तनाबूत करून निरोगी बालकांची पिढी तयार करणं हे आहे. अशा या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा लोकांमध्ये प्रचार करणं, या मोहिमेसाठी लोकांची मनोभूमी तयार करण्याचा विडा युनिसेफनं उचललाय. याची दवंडी पिटणारी ही कथा.

0

लसीकरणाच्या माध्यमातून बालकांना निरोगी राखण्याचं ध्येय ' मिशन इंद्रधनुष' या केंद्र सरकारच्या कार्यक्रमानं आखलेलं आहे. या उदात्त ध्येयाचा पुरस्कार करण्याच्या हेतूनं युनिसेफनं जबाबदार पालकांना आपल्या बालकांचं पूर्णपणे लसीकरण करून घेण्यासाठी तयार करणारी एक मोहिम नुकतीच सुरू केली आहे.


सुरक्षेच्या इंद्रधनुष्याचे सप्तरंगी हास्य
सुरक्षेच्या इंद्रधनुष्याचे सप्तरंगी हास्य

केंद्र सरकारच्या ‘मिशन इंद्रधनुष’ या कार्यक्रमाचा लोकांमध्ये चांगला प्रचार व्हावा, लोकांनी जास्त वेळ न दवडता शक्य तितक्या लवकर त्या कार्यक्रमाचा अंगीकार करावा याउद्देशानं युनिसेफनं या मोहिमेवर जोर देण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी लसीकरणाचा पुरस्कार करणा-या समर्पित लोकांच्या लक्षवेधक अशा प्रेरणादायी कार्याचा पुरक असा उपयोग करून घेता येईल असा दृष्टीकोन युनिसेफनं ठेवला आहे. लसीकरणासाठी लोकांचं मन वळवून त्यांना प्रेरित करता यावं यासाठी युनिसेफनं आजच्या आणि भविष्यात येणा-या पिढींसाठी मोठी नियमित लसीकऱण चळवळ उभारली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून २०२० या वर्षाच्या अखेरी पर्यंत लसीद्वारे ज्यांचं निर्मूलन करता येईल अशा सात रोगांसाठी ( घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हिपॅटायटीस ब हे सात रोग ) ही लसीकरण मोहिम चालवण्याचं लक्ष या निश्चित करण्यात आलय.

सध्या सुरू असलेल्या या प्रयत्नांच्या माध्यमातून दर वर्षी भारतातल्या चार लाख बालकांचे प्राण वाचवण्याचं उद्दीष्ट या मोहिमे अंतर्गत ठेवण्यात आलय. या दृष्टीनं सध्या सुरू असलेला हा जनसंपर्क आणि जागृतीचा कार्यक्रम सुरू राहावा यासाठी युनिसेफनं ‘एक स्टार ऐसा भी’ ही मालिका सुरू केली आहे. भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची कोनशीला समजले जाणारे फ्रंटलाईन कार्यकर्ते आणि अपेक्षित असा सकारात्मक बदल घडवणा-या इतर लोकांच्या कार्याचं महत्त्व लोकांना सांगण्यासाठी या मालिकेच्या माध्यामातून चार प्रेरणादायी व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. जगातला हा सर्वात मोठा उपक्रम आहे.

या पैकी पहिला व्हिडिओ हा १० एप्रिल २०१५ या दिवशी प्रसारीत करण्यात आला. हा व्हिडिओ पूरनचंद्र या ओडिशाच्या एका ऑटो ड्रायव्हरची मनोवेधक गोष्ट सांगतो. ओडिशामध्ये सरकारच्या ऑल्टरनेट व्हॅक्सिन डिलिव्हरी सिस्टम ( AVDS) अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या अनेक ड्रायव्हर्सपैकी पूरनचंद्र हा एक आहे. तांबडं फुटल्याबरोबर, रोज पहाटे पूरन प्रथम आरोग्य केंद्रावर पोचतो. तिथं तो लशी आणि इतर आवश्यक सामान आपल्या ऑटोत चढवतो. त्यानंतर मग तो आपल्या ‘टीकाकरण एक्सप्रेस’मध्ये लसीकरण मोहिम सुरू करतो.

AVDS एक नाविण्यपूर्ण अशी लसीकरण मोहिम असून लोकांमध्ये मध्यस्ताची भूमिका बजावणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी वस्त्यांमध्ये काम करणा-या संघटनांची मदत घेतली जाते. याबरोबर पूरनचंद्रासारख्या नागरिकांचीही या कार्यक्रमासाठी मदत घेतली जाते. विशेषत: जिथं पोहोचणं कठीण असतं अशा वस्त्यांमध्ये लसीकरण मोहिम प्रभावीपणे पोहोचून ती राबवली जावी यासाठी लस वितरणाची मजबूत व्यवस्था उभारण्याचा या कार्यक्रमाचा प्रयत्न आहे.

दूसरा व्हिडिओ हा या मोहिमेत महत्त्वाचं कार्य करणा-या भारतातल्या फ्रंटलाईन कार्यकर्त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकतो. लसीकरण मोहिमेपासून सहज संपर्क होत नाही अशा दूरच्या आणि दुर्गम भागात राहणा-या बालकांसह अगदी कुणीही वंचित राहू नये हा या कार्यक्रमाचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून अनेक अडचणींवर मात करून यश मिळवणा-या ‘आशा’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. या संस्थेत झोकून देऊन काम करणा-या स्वयंसेविकां पैकी एक नाव म्हणजे झारखंडची अर्सिता. देशाच्या आरोग्य वितरण प्रणालीचा अर्सिता ही एक महत्त्वाचा दुवा आहे. या बरोबरच अर्सिता विज्ञानावर आधारीत माहितीच्या आधारे लसीकरणाबाबत गैरसमज किंवा संशय असलेल्या लोकांचा दृष्टीकोण बदलण्याचं महत्त्वाचं काम करते. शिवाय ती लोकांच्या गैरसमजुतींचं आणि अंधश्रद्धांचंही निराकरण करते. आपल्या बालकांना एक चांगल्या आयुष्याची सुरूवात करण्यापासून रोखणा-या पालकांच्या मनात असलेले चुकीचे समजही दूर करण्याचं काम अर्सिता करते.

तिच्या या गांभिर्यानं केलेल्या प्रयत्नांना वस्तीपातळीवरआरोग्यसेवा पुरवणारे कार्यकर्ते मदत करतात. शिवाय प्रत्येक बालकाला पुढे आरोग्यदायी आणि चांगलं आयुष्य मिळावं यासाठी आपल्या गावाला बालकांचं आयुष्य वाढवणारी आणि त्यांना सुरक्षित ठेवणारी लस उपलब्ध व्हावी म्हणून काही पंचायतींचे नेते लसीकरण मोहिमेच्या बाजुनं काम करतात. असे नेते सुद्धा अर्सिताला मदत करत असतात.

पीटीआयनुसार, अशा या चैत्यन्यदायी समूहाचा भाग असलेले आणखी दोन व्हिडिओ लवकरच प्रसारीत करण्यात येणार आहेत. याबाबतची नाविण्यपूर्ण ऑनलाईन मोहिम आपण इथं पाहू शकता- #babiesneedyou.


worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Stories by sunil tambe