नोकरी सोडून दोन चार्टर्ड अकाउंटेंटनी तयार केला ‘कंटेट क्रिएशन प्लॅटफॉर्म !

0

आज व्हिडीओ कंटेट आणि जाहिराती वेगाने वाढत आहेत. त्या दिशेने शेकडो एजन्सीज आणि डिजीटल एजन्सीज काम करत आहेत. त्यासोबतच व्यक्तिगत ग्राहकांच्याही बाजारात अनेक संधी आहेत. जेथे अनेकजण आपल्या परिवारातील किंवा परिचयातील मित्रांची मदत घेणेच पसंत करतात. याच विस्ताराच्या अपेक्षेतून ‘आॅसमनेस’ हे कंटेट क्रिएशन प्लॅटफॉर्म   सुरू करण्यात आले आहे. आशिष आणि शिवानी या स्टार्टअपचे कार्यकारी प्रमुख आहेत. याशिवाय त्यांच्या चमूत अनुभवी लेखक, ऍनिमेटर, इलस्ट्रेटर, व्हिडिओग्राफर, व्हिडिओ एडिटर, संगीतकार, आणि साउंड इंजिनिअर आहेत.

प्रत्येक संस्थेच्या स्थापनेमागे काही ना काही रोमांचक गोष्ट असतेच काहींना ही कथा सांगणे सोपे असते, काहींना कठीण. याचे कारण असे की सुरुवातीच्या काळात संघर्ष केल्याने त्यांना आपल्या उपलब्धीचे मुल्य माहिती असते. आजही आपला गैरसमज असतो की कोणत्याही कामाला यश मिळणे किंवा अपयश मिळणे यात त्यातील बाजार किंवा विपणन करणा-यांचा महत्वाचा भाग असतो. या लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही संस्थेला योग्य संधी आणि तिचा योग्य वापर करता येणे खूपच महत्वाचे असते.

संधी आणि कष्ट यांच्या बळावरच आॅसमनेस सारख्या स्टार्टअपचा जन्म होत असतो. आॅसमनेस हा रचनात्मक उद्यम आहे. ज्यांनी आज विचार, भावना आणि संचार यांना कथानकाचे रुप देताना व्हिडिओ आणि फिल्मच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केले आहे.

आॅसमनेसची सुरूवातीची माहिती देखील रोचक आहे. व्यवसायाने केपीएमजी चार्टर्ड अकौंटंट आशिष चावला आणि शिवानी कौल यांच्या मनात हे विचार सन २०१४मध्ये आले, मात्र या दोघांनी त्याला प्रत्यक्ष स्वरुपात २०१५मध्ये अंमलात आणले. त्याचे एक सहकारी त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी मुलींच्या वाढदिवशी स्मृतीत राहिल अशी भेटवस्तू द्यावी असा विचार व्यक्त केला. त्यानंतर शिवानी आणि आशिष यांनी मुलीचा तिच्या आई-बाबांसोबत कथास्वरुपातील व्हिडिओ तयार केला जो कायम स्मृतीत राहिल. तो लोकांना पसंत पडला आणि त्याचे कौतूक झाले.

त्यानंतर दोघांनी कंपनी बदलली आशिष यांनी जीई नावाच्या इ-कॉमर्स कंपनीत काम सुरू केले तर शिवानी यांनी डब्लुएनएस असेंजरमध्ये रुजू झाल्या. त्यापूर्वी शिवानी एस्पायरमध्ये कंटेट हेड म्हणूनही काम करत होत्या. अखेर कॉ्पोरेट फायनान्स जगात तेरा वर्ष काम केल्यावर आशिष(३५)आणि शिवानी(३५) यांनी असे काम केले जे त्यांचे स्वप्न होते. काही असा कंटेंट ज्यात व्यक्तीच्या जीवनाचा खास भाग असेल आणि अशा प्रकारे आॅसमनेसचा जन्म झाला.

आशिष आणि शिवानी यांनी अनेक वेगळ्या लोकांसोबत काम केले. ज्यात करोडपती कॉर्पोरेट पासून स्टार्टअप, इवेंट मॅनेजमेंट कंपनी, वेडिंग प्लानर्स, लहान मुले आणि आई-बाबा, सामाजिक समूह असे सारे होते. आशिष सांगतात की, आॅसमनेसचे वैशिष्ट्य हे आहे की, ते एका खास सिध्दांतानुसार काम करते. कधीकाळी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक आदर्श होता ज्यातून क्षणोक्षणी प्रेरणा मिळत होत्या. या प्रेरणेतून सामान्यांना आणि कदाचित सा-या जगाला शक्ति मिळत असे.

रचनात्मकतेचा व्यापार

आॅसमनेसचा मूळ उद्देश व्हिज्युअलायझेशन, संगीत आणि लेखन यांच्यात गुणवत्ता तयार करणे हा आहे. आशिष आणि शिवानी या स्टार्टअपचे कार्यकारी प्रमुख आहेत. त्यांच्याशिवाय त्यांच्या संघात अनुभवी लेखक ऍनिमेटर इलस्टे्टर व्हिडीओग्राफर, व्हिडीओ एडिटर संगीतकार आणि साऊंड इंजिनिअर आहेत. आपणांस सांगावे लागेल की, आॅसमनेसने कॅनन, गोइबीबो (Goibibo), विओम नेटवर्क्स, मॅक्स इंश्योरन्स, इंडीहायर, पर्ल अकादमी आणि जीएसके सोबत काम केले आहे.

त्यांच्या संघाला ग्राहकांकडून माहिती घ्यावी लागते की, त्यांना काय हवे आहे आणि मग त्यांचा चमू एक संहिता तयार करते ज्यात कथा कविता आणि गाणीसुध्दा असतात. अशाप्रकारे ते आपल्या ग्राहकांच्या सूचना अंमलात आणतात आणि त्यानुसार काम करतात. ज्याचा त्या व्यक्तिने केवळ विचार केलेला असतो. चमू आपल्या वतीने संपूर्ण प्रयत्न करतो की, त्यांना ग्राहकांना नेमके जे हवे तेच देता येईल. आपणास ज्ञात हवे की यात ऍनिमेशन, लाइवशूट अश्या सा-या बाबी असतात. त्यानंतर मूळ संगीत तयार केले जाते जे ग्राहकांना भावनिकदृष्ट्या जोडते. संस्थेची पहिली गरज ग्राहकांशी भावनिक एकरुपता ही आहे. आशिष सांगतात की. “ आमचा हेतू ग्राहकांच्या मनात ते भाव निर्माण करण्याचा असतो की, ज्यात ते कायम आठवण ठेवतील”

आशिष सांगतात की, “ आपल्या सुरुवातीच्या दिवसांत संस्थेसाठी हे कठीण काम होते की, ते ग्राहकांना आपल्या सर्जनशिल आणि भावनिक कामकाजाची माहिती देत राहतील. मग संकल्पना असो किंवा मूळ संगीत आणि संहिता असो किंवा ऍनिमेशनपर्यंत त्यांना मेहनत करावी लागे. त्यासोबत बाजारातील प्रतिस्पर्धा सुध्दा त्यांच्यासाठी अाव्हानच होते.

स्थिती बदलण्याचा प्रयत्न

जरी त्यांना हे जाणवले की अशा व्यावसायिक एजन्सीला शोधणे कठीण आहे की, जी कॉर्पोरेट किंवा वेगवेगळ्या कंपन्याना हवे असलेले संगीत आधारित व्हिडिओ साहित्य पुरवू शकेल, सुरुवातीला त्यांना यासाठी खूप अडचणी आल्या. बहुतांश संगितकार वेगळे होऊन काम करत होते आणि व्हिडिओ तसेच ऍनिमेशन प्रोडक्शन हाऊसदेखील वेगळे होऊन काम करत होते. त्या विसंगत आॅसमनेस असा मंच होता जेथे हे सारे काम एकत्र होत असे. येथे मुख्य कल्पना, संहिता, गीत सारे एकाच ठिकाणी जुळवले जात होते. शेवटी त्यांनी सारे लक्ष्य कॉर्पोरेटवर दिले. त्यातून त्यांना मोठा फायदा झाला आणि लोकांचे त्यांच्याकडे लक्ष गेले.

चमूने त्यांच्या महसूलाबाबत काहीच सांगितले नाही. मात्र हे नक्की की ते फायद्यात आहेत. जेथे कॉर्पोरेटसाठी यांचे शुल्क दोन लाख रुपये आहे. आणि आता ते टीव्ही प्रचारातही काम करतात. जेथे हे कॉर्पोरेटसाठी पन्नास लाख रुपये आणि व्यक्तिगत प्रकल्पासाठी पन्नास ते सत्तर हजार रुपये शुल्क आकारतात. आशिष यांच्या मते, आज आॅसमनेसचे प्रमुख लक्ष्य शाळांमध्ये आपली पक्की ओळख बनविणे हे आहे जेथे मनोरंजक किस्से, कहाण्यांना संगीताच्या माध्यमातून प्रस्तूत केले जावे. गोष्ट जर बाजाराची करायची झाली तर आज व्हिडीओ कंटेट आणि जाहिरातीच्या क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे, या क्षेत्रात शेकडो डिजीटल एजन्सीज काम करत आहेत. सोबतच व्यक्तिगत पातळीवरही अनेक संधी आहेत जेथे अनेक लोक आपल्या परिचित आणि कुटूंबाची मदत घेत आहेत.

सिस्कोच्या एका अहवालानुसार २०१७पर्यंत जगातील ७०टक्के मोबाईल इंटरनेट ट्रॅफिक व्हिडीओमध्ये बनविला जाईल.  सोबतच आज यूट्यूब सारख्या व्यासपीठावर ऑनलाईन व्हिडिओची संख्या शंभर ते एकशेवीस दशलक्ष आहे.

लेखिका : सिंधु कश्यप