English
 • English
 • हिन्दी
 • বাংলা
 • తెలుగు
 • தமிழ்
 • ಕನ್ನಡ
 • मराठी
 • മലയാളം
 • ଓଡିଆ
 • ગુજરાતી
 • ਪੰਜਾਬੀ
 • অসমীয়া
 • اردو

काशा की आशा : उद्योगजगत महिलांचं. महिलांसाठीचं...

पॉन्डीचेरी हे शहर वसाहतींचं म्हणून ओळखलं जातं. चर्च, मंदिर आणि नियोजनबद्ध वसाहती, फ्रेंच पद्धतीचे रस्ते या साऱ्यातून वसाहतीच्या या शहराची ओळख दिसून येते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या केंद्रशासित प्रदेशाची नवीन ओळख होतेय, ती म्हणजे महिला उद्योजकांना मिळणाऱ्या नवनवीन संधी !

न्यूयॉर्कमधल्या एका भागात वाढलेल्या काशा वांदे फ्रांस आणि अमेरिका अशा दोन्ही देशांचा वारसा लाभलेल्या. त्यांचं बालपण हे त्यांच्या पालकांना वेगवेगळ्या कामात मदत करण्यात गेलं. जुन्या घराची डागडुजी करणं, बकऱ्या पाळणं, घोडेस्वारी आणि वायोलिन शिकणं असा त्यांचा लहानपणीचा नित्यक्रम! काशा सांगतात, "माझ्या फावल्या वेळात मी पुस्तक वाचत असे. माझ्या छोट्याश्या झाडावरच्या घरात किंवा लाकडी चुलीच्या शेजारीबसून ! मला वाटतं पुस्तक सोबत असेल तर माणूस कुठेही जाऊ शकतो आणि माझ्या भटक्या स्वभावाला या सवयीनेच कुठेतरी खतपाणी घातलं गेलं. मी थोडी मोठी झाले आणि नंतर मी नौकाविहार करायला शिकले आणि अनेक तलावाच्या काठावर बसून निवांत पुस्तक वाचत असे."

ट्युलान विद्यापीठातून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी मिळवली. अगदी आपल्या वडिलांप्रमाणे, जे पेशाने अर्किटेक्ट होते. प्रशिक्षणादरम्यान काशा या बांधकाम व्यवसायातल्या एकमेव महिला विद्यार्थी होत्या. त्यांना वास्तुविशारद आणि कंत्राटदार यांच्यातला संवाद ऐकायला खूप आवडत असे, जो अर्थात नेहमी इमारतींच्या बांधकामाविषयी असे.


सुरुवात

काशा या १९९२ साली भारतात आल्या. कारण त्यांच्या यजमानांना पॉन्डीचेरीच्या लीसी फ्रेन्काईसमध्ये शिकवण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. काशा यापूर्वी कधीच भारतात आल्या नव्हत्या किंवा इथं येण्याचा विचारही त्यांनी कधी केला नव्हता.

" मी चेन्नईला विमानातून उतरले आणि बस ! भारताच्या प्रेमातच पडले. आता मी दुसरीकडे राहण्याचा विचारही करू शकत नाही. रंग, परंपरा,मुल्य,लोक इतकंच नाही तर गोंधळ आणि गोंगाट सुद्धा मला आवडून गेला. मला हे सगळ प्रचंड आवडलं." काशा सांगत होत्या.

त्यांनी भारतातील अनेक उत्पादनांची न्यूयॉर्क इथं विक्री करायला सुरुवात केली. त्या राहत होत्या त्या न्यूयॉर्कमधल्या भागात हस्तकला उत्पादन आणि वस्त्र ही नवीनच संकल्पना होती. काशा म्हणतात " अर्थात मी कधी दुकानात काम केलं नव्हतं किंवा दुकान चालवलं सुद्धा नव्हतं, एकदा मी गाडी चालवताना या आत्ताच्या इमारतीवरून पुढे गेले . मला ती इमारत ठाऊक होती, त्या इमारतीत पूर्वी एक कपड्याचं दुकान होत, जे आता बंद होतं. मी माझी स्कूटर थांबवली आणि मागे वळून पाहिलं. सहज विचार केला, मी " दुकान उघडणार " पण त्यांनतर मी मागे वळून पाहिलच नाही, आम्ही दुकान सुरु केल्यावर सहा महिन्यांनीसुद्धा मी दुसरीकडे दुकान हलवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला हे दुकान इथेच हवं होत."

त्या आपली उत्पादनं पॉन्डीचेरी, आसपासचा परिसर तसंच भारतातल्या अन्य भागातूनही मागवतात. जे अगदी खास असतात आणि महागच असतात असं नाही. वस्तू घेतानाही त्या एखाद्या महिलेनं बनवलेली असावीत, यावर काशा भर देतात. वेगळेपणाला प्राधान्य देणाऱ्या काशा, चामड्याच्या बॅग्स, वस्त्रं आणि आभुषणं आदी स्वत: बनवतात. त्यांच्यासोबत काही स्थानिक महिलांही काम करतात. ज्या आहेत, एलिसा, वनजा, सुमती, मेडलीन आणि सोफिया.

आर्ट ब्युटीक च्या संकल्पनेला नवं आयाम देत त्यांनी या ठिकाणी सुरु केलेला कॅफे. ज्यात सेंद्रिय कॉफी, घरगुती केक्स, युरोपियन थाळी आणि पारंपारिक डोसा तो ही नारळाच्या चटणीसह अशा नानाविध पदार्थांची चव चाखायला मिळते. एखाद्याला छान पुस्तक वाचत कॉफीचा मग हातात घेऊन निवांत बसावंस वाटलं तर त्यासाठी जागा हवी, या जाणीवेतून काशा यांनी हे कॅफे सुरु केलंय. काशा की आशा या बुटिकनंतर तब्बल दोन वर्षांनी! इथं आल्हाददायी वातावरण तयार करायचं होतं. मनमिळावू चेहरे, आरामदायी खुर्च्या, डोक्यावर आच्छादित छत, आणि सुंदर फुलं, अशा या प्रसन्न वातावरणात कॅफेमध्ये बसणाऱ्यांना कोलाहलापासून थोडी शांतता लाभावी अशा दृष्टिनं हे तयार करण्यात आलं.


आव्हानं :

काशा की आशा व्यतिरिक्त त्यांनी पॉण्डी आर्ट हा नवा उपक्रमही २०१३ मध्ये सुरु केला. या अंतर्गत भारतापुढील आजच्या आव्हानांचा कलेद्वारे लोकांपर्यंत संदेश पोहोचवला जातो. स्थानिकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद बघून त्या म्हणतात," मी १९९२ साली भारतात आले तेंव्हाच मी इथे राहण्याचा योग्य निर्णय घेतला. इथं सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे अगदी कमी काळ मिळणारा पर्यटनाचा मौसम! युरोपियन ग्राहकांपासून भारतीय ग्राहकांपर्यंत बदलत जाणारा ग्राहक वर्ग! जेंव्हा वर्षातले निव्वळ चार महिने आणि आठवड्याच्या शेवटी आपला व्यवसाय तेजीत असतो तेंव्हा व्यवसाय सांभाळणे अत्यंत कठीण असतं. पण आम्ही नवनवीन कल्पना राबवतो. काही विशेष कार्यक्रम आखतो आणि काहीही झालं तरी काशा की आशा इथे राहणारच "

काशा की आशा सुरु होऊन आता एक दशक उलटलंय.! पर्यटक जितके दिवस पॉण्डिचेरित असतात, तितके दिवस इथे हमखास येतात. आणि दरवर्षी आवर्जून भेट द्यायला येतात.

" माझ्या मते मला सर्वात जास्त आनंद तेंव्हा होतो जेंव्हा माझा कर्मचारी वर्ग काशा की आशा हे स्वत:चं असल्यासारखं त्याची काळजी घेतात आणि आपल्या ग्राहकांशी सुद्धा तितक्याच आस्थेनं वागतात. आमचे पाहुणेही अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देतात आणि इथे असताना ते खूप खुश आणि आरामात असतात. हेच कारण आहे की मी कधीच हे सारं काही सोडून देऊ शकत नाही." काशा अभिमानानं सांगतात.


मुळ लेखिका – दिव्या चंद्रा

अनुवाद – प्रेरणा भराडे

This is a YourStory community post, written by one of our readers.The images and content in this post belong to their respective owners. If you feel that any content posted here is a violation of your copyright, please write to us at mystory@yourstory.com and we will take it down. There has been no commercial exchange by YourStory for the publication of this article.

Related Stories

Stories by Team YS Marathi