कोलकातास्थित ग्रीन क्लिन मिडियाच्या कामातून प्रतिमहिना लाखाची कमाई होते आहे; रहिवासी संकुलात कचराकुंड्यावर जाहिराती करून!

कोलकातास्थित ग्रीन क्लिन मिडियाच्या कामातून प्रतिमहिना लाखाची कमाई होते आहे; रहिवासी संकुलात कचराकुंड्यावर जाहिराती करून!

Tuesday August 09, 2016,

3 min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनची अधिकृत सुरुवात २ऑक्टोबर २०१४रोजी झाल्यापासून सामाजिक व्यावसायिकतेची एक नवी लाट आली आहे. अभिनव तंत्रज्ञान आणि नव्या युगाच्या साधनांनी भारतात स्वच्छ आणि हिरवा परिसर व्हावा यासाठी चळवळ सुरू झाली आहे. कोलकाता मध्ये जॉय पानसारी आणि अंकीत अग्रवाल यांनी पाहिले की, या चळवळीत सर्वात महत्वाचा प्रशन आहे तो कचराकुंड्यांच्या पुरेश्या उपलब्धतेचा. देशातील स्टार्टअपला मिळणा-या यशाच्या पार्श्वभुमीवर या दोघांनी नवी कल्पना राबविली आहे जी महसुल मिळवून देणारे मॉडेल म्हणून नावारुपाला आली आहे ती आहे ऍडबीन्स!

image


नोव्हेंबर २०१४मध्ये दोघांनी ग्रीन क्लिन मिडिया वर्क्स सुरू केले, यामध्ये कल्पना अशी होती की, कोलकातामध्ये रहिवासी संकुलात कचराकुंड्या लावायच्या जाहिरातींसहीत! ‘यातून आम्हाला महसूल मिळवून देणा-या नव्या कल्पनेला यश मिळाले, ‘ऍड माय बीन’ ज्यातून पर्यावरणस्नेही पध्दतीने आमच्या ग्राहकांच्या जाहिराती करण्यात आल्या. यातून मग आम्ही शहराच्या प्रत्येक कोप-यावर ऍडबीन लावण्यास सुरुवात केली. या ऍडबीनचा उपयोग केवळ कचराकुंडी म्हणून केला नाही तर जाहिरातीसाठी देखील झाला.” २६वर्षांच्या अंकीत यांनी सांगितले जे सीए आहेत आणि कोलकाता येथील सेंट झेवियर महाविद्यालयाचे स्नातक आहेत. हे काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी तीन वर्षे अर्न्स्ट आणि यंग सोबत काम केले होते.

सामाजिक आर्थिक चळवळीचा समन्वय

कोलकातास्थित जीसीएमडब्ल्यू चा दावा आहे की, त्यांच्याकडे अभिनव जाहिरातीच्या कल्पना आहेत. ज्यातून जाहिराती थेट रहिवासी संकुलात कचराकुंड्यांची विशेष रचना करुन केल्या जातात. जीसीएमडब्ल्यू ने १५ रहिवासी संकुलातून ८०कचराकुंड्या लावल्या आहेत ज्यातून २५००पेक्षा जास्त घरात ही जाहिरात पोहोचते. यातून दोन प्रकारच्या जाहिराती केल्या जातात, पारंपारीक व्हिनाईल प्रिंट आणि ब्लॅकलिट जाहिराती.

साध्या व्हिनाईल स्टिकर प्रकारच्या जाहिरातीचा उपयोग क दर्जाच्या ग्राहकांच्या मुक जाहिराती फलकावर करण्यासाठी होतो. १८*१२ इंच, २४*१८ इंच आणि दोन्ही बाजुला जाहिराती असणारे फ्लिपर. बँकलीट ऍडबीन्स सहसा सणांच्या वेळी वापरल्या जातात ज्यात लेड लाइटची योजना असते.

जॉय पान्सरी, सहसंस्थापक, ग्रीन क्लिन मिडिया वर्क्स

जॉय पान्सरी, सहसंस्थापक, ग्रीन क्लिन मिडिया वर्क्स


जिसीएमडब्ल्यू ला २० ग्राहक आहेत, ते मनोरंजन, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील आहेत. या शिवाय फॅशन, अन्न आणि खाद्य पदार्थ कंपन्या तसेच वेगवेगळ्या ऑनलाईन संस्था फँटम प्रॉडक्शन हाऊस युनायटेड बँक ऑफ इंडिया गुप्ता ब्रदर्स मिरा टिफिन माय सर्विस टॅक्स स्पीड मेडिसीन आणि फॅब ग्रोसरी त्यांच्या ग्राहक आहेत.

“ जाहिरातींवर खर्च केलेला पैसा सीएसआर ऍक्टिवीटी म्हणून मोठ्या संस्था खर्च करतात. हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणा-या किंवा पाचशे कोटीची उलाढाल असले्ल्या कंपन्या त्यात आहेत. किंवा निव्वळ नफा पाच कोटी पेक्षा जास्त असलेल्या कंपन्यात यात आहेत. यातून कंपनीला गेल्या तीन वर्षांपासून सीएसआर मध्ये काम करण्याची प्रेरणा मिऴाली आहे.” २५वर्षीय जॉय यांनी सांगितले. त्यांनी बंगळुरूच्या दयानंद महाविद्यालयातून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.”

अंकित अग्रवाल, सहसंस्थापक, ग्रीन क्लिन मिडिया वर्क्स

अंकित अग्रवाल, सहसंस्थापक, ग्रीन क्लिन मिडिया वर्क्स


आव्हानात्मक टप्पा

अंकीत सांगतात, की जाहिरातीसाठी हे सारे नवीन असले तरी, युएस किंवा युके प्रमाणे जेथे कचराकुंड्यावर जाहिराती हा सर्वपरिचीत प्रकार आहे. त्यांना ग्राहकांना जाहिरात मिळवण्यासाठी राजी करावे लागते. ते मान्य करतात की अनेक ब्रँण्ड त्यांच्या जाहिराती कचराकुंड्यावर करण्यास राजी नसतात त्यांना राजी करावे लागते. ऍडबिन्स ज्या अनेक दिवस वापरता येतात, त्यांची दर सप्ताहात सफाई केली जाते. आणि नेहमीच्या ग्राहकांसाठी हे केले जाते. या कचराकुंड्या जागोजागी मोफत सेवा देत असतात. सध्या कंपनीने सुरुवातीचे दोन लाख भांडवलात गुंतवले असून ते सह गुंतवणूकीतून उभारले आहेत. सध्या त्यातून त्यांना ८०हजार ते एक लाख पर्यत महसूल प्राप्त होत आहे.

पुढे जाताना

जीसीएमडब्ल्यू चे ध्येय आहे की, शाळा,महाविद्यालयात ऍडबिन्स लावाव्या रेल्वे मेट्रोज रस्ते यावर आणि हैद्राबाद, बंगळूरू, पुणे आणि मुबंई या शहरात विस्तार करावा. लवकरच ते वायफाय ऍडबिन्स आणत आहेत ज्यांचा हॅशटॅग असेल थ्रोबिन. वायफाय ऍडबीनची संकल्पना अशी असेल की जिचा वापर करताना मोफत वायफाय आणि बक्षीस कुपन दिले जाईल. कच-याच्या पुन्हा वापरायोग्य वस्तूंसाठी ते नवा प्रकल्प तयार करत आहेत जेणेकरून जमिनीचे प्रदुषण कमी करता यावे यासाठी योग्य सक्षम गुंतवणूकदारांचा ते शोध घेत आहेत.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

दोन क्रिएटीव्ह महिलांनी घेतलाय क्रिएटीव्ह नाशिक बनवण्याचा ध्यास

भिंतीमध्ये वाढलेल्या देशी झाडांच्या पुनःरोपणातून जैवविविधतेचे रक्षण करणारी ‘ग्रीन अम्ब्रेला’

तुमच्या दिवाणखान्याच्या खिडकीत ऑक्सिजनची मात्रा निर्माण करणारी रोपे लावाल तर आरोग्याला मोठा फायदा होईल

लेखिका : अपरजिता चौधरी

अनुवाद : नंदिनी वानखडे- पाटील