या लाकडी घडाळ्याच्या स्टार्टअप मुळे प्रत्येक ग्राहकांकडून दहा झाडे लावली जाणार आहेत!

या लाकडी घडाळ्याच्या स्टार्टअप मुळे प्रत्येक ग्राहकांकडून दहा झाडे लावली जाणार आहेत!

Friday April 07, 2017,

2 min Read

कार्बनचे वाढते प्रमाण ही खरोखर लक्ष द्यावे अशी समस्या सध्या झाली आहे, आणि याला कारणीभूत असणा-या घटकांबाबत वेळोवेळी सांगण्यात येत असते. असे असले तरी याला पायबंद घालावा यासाठी खूपच थोडे प्रयत्न केले जातात. औद्योगिक क्रांतीनंतर मानवी हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या त्यातून या कार्बनच्या समस्येलाही नकळत आक्राळ विक्राळ रूप मिळत गेले. आता तर त्याने धोकादायक पातळी गाठली आहे. इतकी की मागील तीन लाख वर्षात नव्हती इतकी पातळी त्यांनी गाठली आहे. त्यामुळे मानवी सहभाग निसर्गाच्या सहभागापेक्षा कमी पडत आहे, त्यामुळे नैसर्गिक वातावरणाचा समतोल राखण्यात अडथळा येत आहे, आणि त्याला मानवाने हातभार लावला आहे.


Image Source: L(TruWood); R(Barefoot Books)

Image Source: L(TruWood); R(Barefoot Books)


संयुक्त राष्ट्रातील प्रती माणशी कार्बन प्रदुषणाचे प्रमाण सुमारे २० मेट्रीक टन आहे. ही संख्या चिंताजनक अशीच आहे. काळ्या ढगांची रूपेरी किनार म्हणावी तर, येथे लहानशी कंपनी आहे जिला ट्रू वूड (TruWood) संबोधले जाते, त्यांच्या मते निसर्गाचा आदर ठेवला गेला नाही, किंवा त्याला समजूनही घेतले जात नाही. संयुक्त राष्ट्र स्थित, या कंपनीचे लक्ष्य शक्य तितके जागतिक मुल्य निर्माण करणे हे आहे.

‘ट्रू वूड’ चा प्रवास मे २०१६मध्ये सुरू झाला, आणि घरगुती पध्दतीने तयार करण्यात आलेल्या वस्तू ते विकतात; जसे की घड्याळे, फँशनच्या शोभिवंत वस्तू. त्यांचा कटाक्ष मात्र या वस्तू बनविताना असा असतो की, त्यांचे उत्पादन टिकाऊ आणि दर्जदार असावे. या व्यवसायाच्या जोडीनेच ते सेवाभावी संस्था ट्रीज फॉर दी नेचर सोबत भागीदारी करतात. ज्याचे लक्ष्य असते की, प्रत्येक उत्पादनाच्या विक्री सोबत दहा नवी झाडे लावणे.

‘ट्रू वूड’ चा साधा पण सुंदर उद्देश आहे : ‘तुम्हाला मिळाले त्यापेक्षा जास्त परत द्या’. आता पर्यंत, यातून त्यांनी ७५हजार झाडे लावली आहेत. आणि त्यांचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे.

ज्यावेळी अनेकानेक कंपन्या केवळ नफा आणि नफाच कमवण्याचे काम करत आहेत, त्यावेळी ते किमान पर्यावरणाचा विचार करत आहेत. हे प्रेरणादायी आहे की एक कंपनी इतरांपेक्षा वेगळा विचार करते आहे, दिवसांच्या शेवटाला, अश्या सा-या छोट्या छोट्या प्रयत्नातूनच एकत्रीतपणाने आपल्याला मोठा फरक पडलेला दिसणार आहे जो अपेक्षित आहे.

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा