२१ वर्षीय दिल्लीतील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला उबेर कडून १.२५ कोटी वार्षिक पगाराची संधी!

२१ वर्षीय दिल्लीतील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला उबेर कडून १.२५ कोटी वार्षिक पगाराची संधी!

Wednesday March 29, 2017,

2 min Read

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या चार वर्षांच्या महाविद्यालयीन जीवनात रोजगाराच्या संधी शोधण्याचे वर्ष हे कसोटीचे असते. अशा तणावाच्या रोजगार शोधण्याच्या काळात एका विद्यार्थ्याला मात्र खूप मोठा आनंद मिळाला आहे, सिध्दार्थ राजा, हे २१ वर्षीय महाविद्यालयीन कॉम्पुटर सायन्स विषयाचे विद्यार्थी दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये शिकतात. त्यांना १.२५ कोटी प्रतीवर्ष देण्याची मागणी यूएस मधील कंपनी उबेर ने दिली आहे.


 फोटो सौजन्य - इंडिअन सीइओ

 फोटो सौजन्य - इंडिअन सीइओ


सिद्धार्थ यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, वसंतकुंज मध्ये घेतले आहे. त्यांचे वडील नियोजन सल्लागार म्हणून नोकरी करतात, तर आई मुक्त भाषांतरकार आहेत. सिध्दार्थ यांना बारावीच्या परिक्षेत ९५.४ टक्के गुण मिळाले, आणि डिटीयूमध्ये प्रवेशासाठी त्यांनी जेईई ची प्रवेश परिक्षा दिली.

सिध्दार्थ यांना सॉफ्टवेअर अभियंता या उबेरच्या सॅनफ्रान्सिस्को येथील कार्यालयात निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या १.२५कोटी वार्षिक पॅकेजमध्ये दोन भाग आहेत, त्यात ७१ लाख रूपये पगार आणि इतर सुविधा आहेत ज्यांची एकत्रित किंमत १.२५कोटी होते. या नोकरीच्या बाबत बोलताना ते म्हणाले की, “ ही नोकरीची संधी मिळणे आनंदाचे नक्कीच होते, आता मी सॅनफ्रान्सिस्कोला रवाना होत आहे. मी अलीकडेच उबेर सोबत सात सप्ताहाची शिकाऊ उमेदवारी केली आहे. त्यामुळे ही हजर होण्यापूर्वीची ऑफर मला मिळाली आहे. माझ्या सोबत, मला वाटते आणखी कुणी तरी आयआयटी मधून असेल.”

सिध्दार्थ यांनी त्यांच्या नोकरीबाबत आणि भविष्यातील योजनांबाबत अधिक बोलताना सांगितले की, “ मी भविष्यात माझ्या तांत्रिक ज्ञानात अधिक भर घालून उबेरमधूनही काही शिकेन, त्यानंतर मी संपूर्ण विचार करून माझ्या स्वत:च्या स्टार्टअप बाबत सुरूवात करेन जे माझ्या दीर्घकालीन जीवनातील उद्दीष्ट असेल. 

वृत्तसंस्थाच्या मते, डिटीयू मधील विद्यार्थ्याला मिळालेली ही दुसरी मोठी संधी आहे, अलिकडेच चेतन कक्कर यांना २०१५मध्ये १.२७कोटी रूपये नोकरीचे निमंत्रण गुगलने दिले होते. (थिंक चेंज इंडिया)