सायकल चालवून लैंगिक समानतेचा अनोखा लढा: राकेश कुमार सिंह 

0

राईड फॉर जेंडर फ्रिडम वाल्या सिंह साहेबांना आपण जाणता काय? नाही ना? परंतू हे तर आपल्या शहरातून देखील गेले आहेत, आपण लक्ष दिले नसेल. ठिक आहे, युअर स्टोरी आपली भेट घालून देत आहे अशा व्यक्तिशी, जे वेगळ्या प्रकारे लढा देत आहेत लैंगिक समानतेसाठी.

"न हो कुछ सिर्फ सपना हो तो भी हो सकती है शुरुआत,
ये शुरुआत ही तो है कि यहाँ एक सपना है..."
-सुरजीत पातर

सुरजीत पातर यांच्या या ओळी राकेश कुमार सिंह यांना चपखलपणे लागू होतात, आणि याच ओळी त्यांच्या फेसबूकच्या स्टेटसच्या ओळी आहेत. हे खरे आहे की, सुरुवात स्वप्नातूनच होते, स्वप्ने नसती तर न जाणे किती कल्पना जन्माला येवूच शकल्या नसत्या.अशाच सुरुवातीचे स्वप्न राकेश कुमार सिंह यांनी तीन वर्षांपूर्वी पाहिले  होते त्याला नाव दिले ‘राइड फॉर जेंडर फ्रिडम’. राकेश यांचा हा लढा त्या हिंसेविरोधात आहे जिला आपण लिंगभेद म्हणतो. आणि हे स्वातंत्र्य केवळ स्त्रिया किंवा पुरुष यांच्यासाठी नाही तर त्या तृतीयपंथीयासाठीही हवे ज्यांना इंग्रजीत ट्रान्सजेंडर म्हणतात. तरी देखील बहुतांश कारणे महिलांशी संबंधीत आहेत.


राकेश बिहारचे राहणारे आहेत आणि १५मार्च २०१४पासून या शहरातून त्या शहरात आपल्या सायकलवरून निघाले आहेत. आता पर्यंत राकेश यांनी अकरा राज्यांतील १७९००किलोमिटर अंतर पार केले आहे. राकेशकुमार सिंहने १५मार्च२०१४ पासून राइड फॉर फ्रिडमसाठी चेन्नईतून यात्रेला सुरुवात केली.

उत्तर प्रदेशातील असे शहर जेथे मुली शिकून सवरून देश विदेशात आपल्या यशाचा झेंडा फडकविताना दिसत आहेत. त्याच शहरात कुणा घरात लग्न होत आहे, शहनाई वाजत आजे, नवरा घोडीवर बसत आहे आणि नवरी घरी आली आहे,परंतू नवरी आल्यानंतर सुरु होते वेगळ्याच प्रकारचे भांडण ज्याला आम्ही सामजिक भाषेत हुंडा म्हणतो. नवरी तेवढा हुंडा घेवून आली नाही की सासरच्या लोकांचा छळ सुरु झाला. एक दिवस माहिती आहे काय झाले? त्या मुलीने जाळून घेतले आणि पोलिसांनी हे सांगून फाईल बंद केली की, मुलगी चुकीने भाजून मृत्यू पावली. कारण सासरच्यांविरोधात काही पुरावा मिळालाच नाही. त्याच दिवशी कर्नाटकच्या एका शहरात मुलीच्या अंगावर मुलाने तेजाब यासाठी टाकले कारण की मुलगी अन्य कुणाशी तरी लग्न करणार होती. त्यानंतर एक दिवसांने उत्तराखंडातील एका माणसाने आपल्या बायकोला केवळ या कारणासाठी मारहाण केली की, भाजीत मीठ कमी होते, त्याने आपल्या मुलांसमक्ष पत्नीला इतके मारले की ती गतप्राण झाली.. . . . हे आहे कटूसत्य, ज्यांच्याशी राकेश कुमार सिंह यांचा लढा सुरु आहे. समाजात पसरलेल्या कुप्रथांविरोधात आपल्या सायकल वरून ते जनजागृतीसाठी निघाले आहेत.


राकेश कुमार सिंह १७हजार ९०० किलोमीटरचा प्रवास करून आले आहेत. राकेश कुमार सिंह म्हणतात की, अशी कोणती संस्था आहे, जेथे छेडखानीचे, भ्रूण हत्या करण्याचे, बलात्कार, लिंगाधारीत गर्भपात, तेजाब हल्ला, किंवा हुंड्यासाठी त्रास देण्याचे शिक्षण दिले जाते? हाच प्रश्न त्यांच्या विचाराला चालना देतो. त्याचे उत्तर शोधण्यासाठी ते या शहरातून त्या शहरात या राज्यातून त्या राज्यात सायकलवरून फिरत आहेत. आतापर्यंत त्यानी अकरा राज्ये पार केली आहेत. राकेश यांचा सर्वात मोठा लढा हा आहे की खूप काही बदलत असले तरी भारतीय समाज बदलत नाही. व्यायामासाठी सायकल चालविणारे लाखो मिळतील, किंवा स्कुटर आणि कार नाही म्हणून सायकल चालविणारे सुध्दा खूप आहेत, मात्र लैंगिक समानता यासाठी सायकलवरून फिरणा-याबाबत क्वचितच आपण ऐकले असेल.

राकेश यांचे महत्वाचे प्रश्न, ज्याबाबत ते आपल्या प्रवासा दरम्यान विचारू इच्छितात, समजावून सांगतात,

-सर्व प्रकारच्या लैंगिक स्वातंत्र्याचा सन्मान करा.
- महिलांवर होणारे अन्याय पाहून गप्प बसू नका,आणि त्यांना लढण्यासाठी मदत करा. मुलगा-मुलगी असा भेद करण्यापेक्षा -- त्यांच्यात समानता कशी राखता येईल ते पहा.
- सर्वांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत परिघांचा सन्मान करा.


राकेश कुमार सिंह ६०ते ८०किमी सायकल यात्रा दररोज करतात. एखादा माणूस सारे आयुष्य आपले घर चालविण्यात घालवितो. थोडे जास्त पैसे असतील तर एकाचे दोन किंवा दोनाचे तीन फ्लँट खरेदी करतो. वेगन आर ची डस्टर किंवा डस्टरची बीएमडब्ल्यू मध्ये फिरु लागतो. रस्त्यावरच्या खाण्यापासून पंचतारांकीत मध्ये पोहोचतो. सामाजिक स्तरावर आम्ही पुढे जाणे त्यालाच समजतो, जे आमच्या मासिक उत्पन्नावर अवलंबून असते. पण राकेश यांच्यासारखे लोक या सा-यातून मुक्त झाले आहेत. राकेश अनेक चांगल्या कंपन्यातून नोकरी करून आले आहेत, मिडिया हाऊस मध्येही होते, मात्र त्यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करावे असे होते. त्यांच्यासाठी पैसा खूपच हल्की-फुल्की गरज होती. हे विचारल्यावर की आपली रोटी, कपडा, मकान यांची व्यवस्था कशी होते? राकेश निश्चिंतपणाने उत्तर देतात, की मी याची चिंता करत नाही. जे राज्य, जे शहर, ज्या गावात जातो तेथे कुणी ना कुणी असा भेटतोच, ज्याच्या अंगणात एक रात्र घालवू शकेन. कुणी सकाळच्या न्याहरीची व्यवस्था करतात, तर कुणी दुपारच्या जेवणाची करतात. कुठे तरी बसून सांयकाळी चहा पितो तर कुठेतरी रात्रीचे जेवण. जेवण आणि बिछाना या माझ्या गरजा नाहीत. माझा लढा वेगळ्याच दिशेने आहे. माझ्या जवळ असे काही मित्र सुध्दा आहेत. जे मला वेळोवेळी आर्थिक मदत करतात, सायकल चालत राहणे गरजेचे आहे.


राकेश B'twin च्या सायकलने प्रवासाला निघाले आहेत, सुरुवातीला त्यांच्याजवळ अन्य सायकल होती, मात्र बंगळूरू सायकल यात्रे दरम्यान बी व्टिन कंपनीने त्यांना रा इड फॉर जेंडर फ्रिडम साठी सहकार्य करण्याचे ठरविले आणि ही सायकल त्यांना भेट दिली. हे विचारल्यावर की हा लढा इतक्या उशीराने का सुरु केला ते म्हणाले की, “ पहात, समजत आणि वाचत तर लहानपणा पासून होतो, मात्र ज्यावेळी समजण्यास सुरुवात केली त्यावेळी वाटले की जे करतो आहे ते करण्यासाठी मी बनलो नाही तर माझा लढा कुणा दुस-या गोष्टी सोबत आहे. मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे. आपल्या भोवताली ज्यावेळी लैंगिक असमानता पाहतो, त्यावेळी आतून त्रास भरून येतो”

राकेश एका दिवसांत रस्त्यात चार सभा लावतात, त्यात लैंगिक समानतेच्या बाबत माहिती देतात, आणि त्या बाबतची जाणिव करून देतात. समाजात पसरलेल्या लेंगिक असमानतेमुळे राकेश हैराण असतात. घरच्यांनी देखील आता हे स्विकारले आहे, राकेश सायकलवरून निघाले आहेत आणि परतणार नाहीत. हे विचारल्यावर की या सायकल यात्रेने काय होणार आहे? असा काही परिणाम होणार आहे का? राकेश म्हणतात की, मार्च २०१४ ते जानेवारी २०१७ पर्यंत जर दहा लोक माझ्यामुळे सुधारले असतील तर हे माझे सर्वात मोठे यश आहे. मी पूर्ण समाज पूर्ण जग बदलण्याची गोष्ट सांगत नाही. कारण असे करता येणे शक्य नाही. पण मी काही लोकांना जरी सुधारू शकलो तरी मला त्यात आनंद आहे आणि हिच माझी उपलब्धी आहे. ते लोक दहा वीस किंवा पन्नासही असतील.


राइड फॉर जेंडर फ्रिडम यात्रे दरम्यान राकेश यानी काही रात्री अशाही घालविल्या ज्यावेळी त्यांना उपाशी झोपावे लागले आहे.काही वेळा सकाळचा चहा देखील मिळाला नाही. कोणताही ऋतू असो, पावसाळा किंवा हिवाळा, कडाक्याचे ऊन असो किंवा गोठवून टाकणारी थंडी जेथे रात्र झाली तेथे तंबू टाकून झोपले आणि सकाळ झाली की निघाले. राकेश यांनी छोट्याश्या सायकलवर सारा संसार जमा केला आहे. सायकलच्या समोर एक खोका आहे त्यात त्यांना भेटणारे लोक त्याच्या मनात असेल तसे पैसे टाकतात. या पैश्याचा वापर ते अनेक चांगल्या कामात करतात. कधी कुण्या गावात पुस्तके वाटली, कुण्या गावात मुलाना मिठाई किंवा चॉकलेट वाटली, मुलांच्या चेह-यावरील आनंद राकेश यांना पुढे जाण्यास आणि त्यांच्या राइड फॉर जेंडर फ्रिडम लढ्यात लढण्याचे अवसान देतो.

एकीकडे राकेश म्हणतात की, हा सर्व जेंडरचा लढा आहे,ज्यात स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी सुध्दा येतात पण हा लढा तर महिलांपूरताच मर्यादीत राहिला आहे? त्यावर राकेश सांगतात की, “ नाही तसे नाही, प्रत्यक्षात आमच्या समाजात महिलाची स्थिती खूपच खराब आहे. त्यामुळे माझ्या मनाविरोधात मी महिलांच्या अधिकारांबाबत चांगले वाईट यांतून स्वत:ला वेगळे ठेवू शकत नाही. मात्र याचा अर्थ हा अजिबात नाही की, मी केवळ महिलांबाबत चिंता करतो. माझा लढा त्या माणसासाठी देखील आहे जो मेहनत केल्यावर त्याच्या मेहनतीचे योग्य पैसे मिळवू शकत नाही. माझा लढा त्या समाजाशी देखील आहे ज्याने तिस्-या वर्गाला ज्यांना आम्ही ट्रान्सजेंडर म्हणतो त्यांना पूर्णत: बाहेर ठेवले आहे. मी सर्वासाठी आवाज उठवतो आहे आणि सर्वासाठी बोलतो आहे”.


यात्रे दरम्यान राकेश यांना अनेक प्रकारच्या नकारात्मक तत्वांचा सामना करावा लागला. काहीनी तर त्याना निराश करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ लोक राकेश यांचे पूर्ण म्हणणे न ऐकताच निघून गेले.परंतू राकेश यांनी घाबरून हार मानली नाही. राकेश म्हणतात की, मी जितक्या लोकांना भेटलो माझ्या समजण्याच्या विचार करण्याची व्याप्ती वाढली आणि मला समजू लागले की सुरुवात नेमकी कुठे होते. सुरुवात घरातून होते. आमचा समाज लहानपणापासून मुलगा आणि मुलगी यांच्या खाणे पिणे, उठणे बसणे, पेहराव यांच्यात फरक करायला सुरुवात करतो. त्यामुळे प्रत्येक आजाराचे मूळ ते घर आहे जेथून एक माणूस निघतो अथवा जनावर निघते. जसे संस्कार होतील तसेच फळ मिळते ना. 

माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विश्वविद्यालय मध्ये  राकेश यांना वीसी प्राचीन प्रतीक चिह्न प्रदान करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यासमोर आयआयएम सारख्या संस्थेत त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. तेथेही त्यांना हे दिसले की, सुशिक्षित घराण्यातून आलेल्या घरातील विद्यार्थ्याच्या घरी किंवा त्यांच्या आसपासच्या वातावरणातून लिंग विषयक अनेक प्रकारच्या समस्या आहेत. राकेश जिथे जिथे जातात, लोक आपले मन मोकळे करतात. राकेश यांची ही यात्रा आता २०१८ पर्यंत चालणार आहे, त्याचा समारोप बिहारमध्ये होणार आहे. राकेश यांचे एक पुस्तक ’बम संकर टन गनेस’ हिंन्दयुग्म प्रकाशनात आले आहे, ज्यात वाचकांचे भरपूर प्रेम आणि आपुलकी मिळाली.

लेखिका : रंजना त्रिपाठी