यश अंती लाभणार शक्य हे सत्य हे यावर आमचा दृढ विश्वास: श्रध्दा शर्मा यांचे नवउद्यमींना मोलाचे मार्गदर्शन!

यश अंती लाभणार शक्य हे सत्य हे यावर आमचा दृढ विश्वास: श्रध्दा शर्मा यांचे नवउद्यमींना मोलाचे मार्गदर्शन!

Friday September 30, 2016,

3 min Read

‘यश अंती लाभणार सत्य हे’ या यशाच्या मंत्राची आठवण देत युअरस्टोरीच्या मुख्य संपादिका आणि संस्थापिका श्रध्दा शर्मा यांनी टेकस्पार्क२०१६च्या दोन दिवसांच्या कार्यशाळेचा शुभारंभ केला. बंगळूरू मधील नवउद्योजकांसमोर स्वत:च्या अनुभवांच्या माध्यमातून मोलाचा सल्ला देताना त्यांनी उमेदीने काम करत राहणारेच यश मिळवतात असा विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, गुंतवणूकदार मिळतील की नाही अश्या संभ्रमात असलेल्या हजारो नवउद्योगांमध्ये तेच तरतात ज्यांना स्वत:च्या कर्तृत्वा वर विश्वास असतो आणि जे कश्याचीही वाट न पाहता आपल्या मनातील उमेद न हारता काम करतात तेच यशस्वी होतात असे शर्मा म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेल्या कर्नाटकाचे माहिती आणि तंत्रज्ञान तसेच पर्यटन मंत्री प्रियांक खारघे यांनी राज्य सरकारने नवउद्यमीना इतर कोणत्याही राज्यापेक्षा कर्नाटकात सर्वाधिक चांगल्या सुविधा देऊ केल्या असून विविध क्षेत्रात नव्याने पदार्पण करणा-या उद्यमीना आवश्यक सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याची ग्वाही दिली.

image


शुभारंभाचे पुष्ष गुंफताना श्रध्दा शर्मा यांनी उपस्थित तरूण नवउद्यमींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, या कार्यक्रमाला येताना त्यांच्या मनात सहा वर्षापूर्वी सुरुवात करताना ज्या भावना येत असत त्यांची स्मृती जागृत झाली, त्यामुळे मला थोडे नाराज देखील वाटले असे शर्मा म्हणाल्या. त्या म्हणाल्या, “सहा वर्षापूर्वी मी जेंव्हा बंगळूरू येथे आले त्यावेळी माझ्या मनात काहीतरी धमाकेदार करून दाखवण्याची उर्मी होती. गेल्या वर्षभरात जेंव्हा मी टेकस्पार्कच्या कार्यक्रमाच्या संकल्पनेवर काम करत होते तेंव्हा मला या वर्षभरात किती शतके निघून गेली असे वाटत होते. त्या म्हणाल्या की याच शहरात सहावर्षापूर्वी पहिल्यांदा युअरस्टोरीची काहीच ओळख नव्हती त्यावेळी मायक्रोसॉफ्टने टेकस्पार्कचे प्रायोजकत्व स्विकारले तेंव्हा लोकांना वाटले की हा मायक्रोसॉफ्टचा उपक्रम आहे. त्या म्हणाल्या की मला अजूनही आठवते की त्यावेळी२०१०मध्ये प्रशांत चोकसी यांनी या कार्यक्रमात मुंबई येथून येऊन हजेरी लावली होती आणि मला सांगितले होते की, तुमच्या मागे कुणीतरी असते ते्व्हा अश्या कार्यक्रमासाठी तुम्ही भाग्यवान आहात हे लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्यात चांगले काम करण्याचा हुरूप येत असतो. त्यामुळे या कार्यक्रमाला आज आपण सारे आणि या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व देणारे सारे मान्यवर आले त्यांचे मी आदरपूर्वक स्वागत करते असे त्या म्हणाल्या.

image


श्रध्दा शर्मा म्हणाल्या की, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, एका मोठ्या व्यक्तीला मी या कार्यक्रमासाठी आमच्या सोबत या म्हणून विनंती करायला गेले त्यावेळी त्यांचा यात कसा काय फायदा आहे याचे सारे वर्णन मी सांगितले. मात्र त्यांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला, ते म्हणाले की, तुमच्या बोलण्यातून मला असे वाटते की या सा-या कामात तुम्ही फारच तणावग्रस्त आहात आणि मला माझी कामे शांतपणाने करायला आवडतात त्यामुळे मला तुमच्या सोबत येण्यास काही स्वारस्य नाही’ शर्मा पुढे म्हणाल्या की, गेली दोन वर्ष आपण कुणाला किती गुंतवणूक मिळाली याची चर्चा करत आणि ऐकत आहोत. जेंव्हा रतन टाटा यांनी माझ्या सोबत गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली त्यावेळी देखील इतर काही जणांना निराश वाटले असेल की ते तिच्या सोबत गुंतवणूक करत आहेत कारण दरवर्षी वीस हजारापेक्षा जास्त नवे उद्योग येतात आणि त्यांना गुंतवणूक करणा-यांचा शोध असतो. सात वर्षापासून मी हेच काम केले गुंतवणूकदार कोण मिळतील हे शोधत आम्ही आमचा संघर्षपूर्ण प्रवास केला, असे सांगून त्या म्हणाल्या की जर गुंतवणूकदार मिळाला तर काम कसे व्यवस्थित चालते अशी आपली धारणा असते पण त्यासाठी इथे मोठी स्पर्धा असते आणि त्यात अनेकदा दु:खद अनुभव देखील येतात. पण मोठे गुंतवणूकदार नाही मिळाले म्हणून यश मिळत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. ज्याच्यात हिंमत न हारता काम करत राहण्याची उमेद असते ते नक्कीच यश मिळवतात आणि तुमच्यातील उमेद जिवंत ठेवा हेच या टेकस्पार्कच्या माध्यामातून मला तुम्हाला सांगायचे आहे असे त्या म्हणाल्या. त्यामुळे कुणी किती गुंतवणूक मिळवली किंवा नाही हे महत्वाचे नसून या टेकस्पार्कमध्ये आपल्यातील ‘स्पार्क’ वाढविण्याचा प्रयत्न केला की नाही याचा विचार करा असे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की दु:खी न होता काम करत राहा. आनंदी राहा आणि मेहनत प्रयत्न करत राहा यश तुमचेच आहे. काम करत राहा यश मिळतेच हा मंत्र देताना त्यानी स्वानुभवाच्या चार ओळी सांगितल्या त्या अश्या होत्या.

‘डर मुझे भी लगा फासला देखकर; पर मै बढता गया रास्ता देखकर

खुद बखुद नजर आ गयी मेरी मंजील; मेरा हौसला देखकर’