हे ब्रँण्डेड बूट बनले आहेत भारतीय समुद्रातील प्लास्टिक कच-यापासून!

0

एका अद्भूत कामगिरीतून आदिदास ने अलिकडेच पुनर्वापराच्या प्लास्टिक कच-यापासून नवे उत्पादन तयार केले आहे. समुद्रात वाढत जाणा-या प्लास्टिक कच-याला कमी करण्यासाठी काम करणा-या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ‘पर्ले’ या एका ना नफा संस्थेसोबत समन्वय साधून आदिदासने ही उपलब्धी भारतीय समुद्रातून मिळवली आहे.

हे बूट, ‘अल्ट्राबूस्ट अनकँग्ड पर्लेय’ या नावाचे अनोखे उत्पादनआहे. या ब्रँण्डने या उत्पादनाच्या ७हजार जोड्या बनविल्या आहेत. ज्या प्रति जोडी २२० डॉलर्सना उपलब्ध आहेत. २०१७ मध्ये आदिदासने याच्या एक लाख आणखी जोड्या विकण्याचे ठरविले आहे.त्यातून अकरा लाख प्लास्टिक बाटल्यांचे पुनर्वापर करणे शक्य होणार आहे असे एका अहवालात म्हटले आहे. या बुटात वापरण्यात येत असलेल्या प्लास्टिकचा शोध भारतीय समुद्रातील फेकून दिलेल्या वस्तूपासून घेण्यात आला आहेत. 

मालदिवच्या परिसरातील ११९२ कोरल महाद्विपांच्या परिसरात हा शोध घेण्यात आला. या अहवालानुसार बुटाच्या वरच्या भागाचा ९५% हिस्सा समुद्रातून मिळवलेल्या प्लास्टिकचा तयार करण्यात आला आहे. तर पाच टक्के भाग रिसायकल्ड पॉलिस्टर पासून तयार करण्यात आला आहे. यांच्या टाचा, आणि इतर भागही पुनर्वापर करण्यात आलेल्या वस्तूंपासून तयार करण्यात आले आहे. कंपनीला एक बूट तयार करायला ११ रिसायकल्ड बॉटल वापराव्या लागतात.