२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची श्रद्धांजली

0

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांना राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस जिमखाना येथील शहीद स्तंभास पुष्पचक्र वाहून विनम्र अभिवादन केले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुंबीयांनीही यावेळी पुष्प वाहून शहीदांना अभिवादन केले.