भर उन्हाळ्यातही वितळणार नाही आईसक्रीम, थंड राहणार पाणी

0

उन्हाळ्याच्या दिवसात जेंव्हा आपण घराच्या बाहेर फिरायला जातो त्यावेळी सर्वात आपल्याला सर्वात आधी थंड पाणी नंतर आईसक्रीमची आठवण होते. अशावेळी अनेकदा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आईसक्रीम कार्टमधले आईसक्रीम वितळले असल्यानं खाण्यास योग्य नसल्याचा अनुभूव तूम्ही घेतला असेल. तसेच रस्त्याच्या बाजूला मिळणारे पाणी किती शुद्ध असेल याचीही खात्री देता येत नाही. प्रत्येक जण बाटलीबंद पाणी विकत घेऊ शकत नाही. मुंबईच्या महेश राठी यांनी याच समस्येचे उत्तर शोधलंय. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेले महेश हे गेल्या अनेक वर्षांपासून सोलार विंड आणि बायोमास या क्षेत्रामध्ये काम करत आहेत.

महेश राठी यांनी ‘यूअर स्टोरी’ला सांगितले,

“ काहीतरी नवं करण्याची माझी इच्छा होती. मी गुजरातमधल्या भूजमध्ये फिल्ड वर्क करत होतो. त्यावेळी उन्हाळ्यात ठंड पाणी किती आवश्यक आहे हे माझ्या लक्षात आले. त्यावेळी सोलार यंत्राच्या आधारे ठंड पाणी बनवण्याचं एखादे उपकरण बनवण्याचे मी ठरवले. याच विषयावर यापुढे काम करण्याचा मी निश्चय केला.”

महेश राठी पुढे म्हणाले , “ जवळपास दोन वर्षांपूर्वीच्या उन्हाळ्यात कामाच्या निमित्तानं मी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आईसक्रीम विक्रेत्याने मला वितळलेलं आईसक्रीम दिलं. त्याच्या कार्टमध्ये ते आईसक्रीम वितळले होते. मी त्याच्याकडे दुसरे आईसक्रीम मागितले. पण इतक्या उन्हामध्ये दिल्लीतल्या सर्वच आईसक्रीमची अशीच अवस्था होते असे सांगत त्या विक्रेत्यानं मला दुसरे चांगले आईसक्रीम देण्यास नकार दिला. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी दोन रुपयांमध्ये एक ग्लास पाण्याची विक्री सुरु असल्याचं मी पाहिले. पण ते पाणी पुरेसे स्वच्छ नव्हते. त्यावेळी एक थंड फ्रिज बनवण्याचा विचार माझ्या मनात आला. ज्यामध्ये पाणी स्वच्छ आणि थंड राहील.”

अशा पद्धतीने महेश राठी यांनी थंड उपकरण बनवण्यावर काम सुरु केले. या प्रकल्पाच्या सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. यासाठी लागणारे साहित्य त्यांना चीन आणि अमेरिकेहून मागवावे लागले. काही यंत्र तर फक्त अमेरिकेतच मिळत होती. या सर्व खटाटोपामध्ये त्यांचा बराचसा पैसा आणि वेळ खर्च झाला. अशा पद्धतीने पाच लाखांचा खर्च आणि दीड वर्षांच्या कष्टानंतर त्यांनी एक कुलींग सिस्टिम तयार केली. ज्यामधले आईसक्रीम वितळत तर नाहीच तसेच पाणीही ठंड मिळते. आता त्यांनी हे उपकरण बाजारामध्ये आणण्याचे ठरवले. विशेष म्हणजे हे आईस कार्ट सोलार पॅनलच्या मदतीने चार्ज केले जाऊ शकते. तर पावसाळ्यात हे विजेच्या साह्यानेही चार्ज करता येते. यासाठी लागणारी बारा युनीटची बॅटरी केवळ अर्ध्या युनीटमध्येच चार्ज होते. या आईसकार्टमध्ये आईसक्रीम आणि पाणी थंड राहतेच. त्याचबरोबर यामध्ये मोबाईल चार्ज करण्याचीही सुविधा आहे.

हे आईस कार्ट तयार करताना सगळ्यात मोठी समस्या गुंतवणूकदाराची होती, असे महेश यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये पैसा गुंतवण्यास तयार असलेला गुंतवणूकदारच त्यांना सापडत नव्हता. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक व्यासपीठाचा आधार घेतला. या कार्टच्या संबंधित अनेक पोस्ट पेस्ट केल्या. त्यानंतर ‘मिलाप’ या संस्थेला त्यांची ही कल्पना आवडली. त्यांनी यामध्ये पैसा गुंतवण्याची तयारी दाखवली. महेश यांनी यापुढे सांगितले की, “ जर मला पैसा मिळाला तर मी अशा प्रकारचे कमीत कमी १० आईस कार्ट तयार करु शकतो असे मी या संस्थेला सांगितले. तसेच या आईस कार्टला एखाद्या स्वयंसेवी संस्थेला भाड्याने चालवण्यास देता येऊ शकते. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. दर महिन्याला त्यांना ठराविक उत्पन्न मिळू शकेल.”

महेश इथेच थांबलेले नाहीत. आता सोलार कार्ट बनवण्याचे त्यांचे ध्येय आहे. हे कार्ट मासे ठेवण्यासाठी असेल. रस्त्याच्या बाजूला मासे विकणा-या छोट्या विक्रेत्यांना याचा मोठा फायदा होईल. त्यांचे मासे दीर्घकाळ टिकतील. त्यामुळे त्यांच्या कमाईमध्ये वाढ होईल. त्याचप्रमाणे सोलार विंड , बायोमास, सोलार एअर कंडिशनर बनवण्याच्या प्रकल्पावरही महेश सध्या काम करत आहेत. महेश यांनी बनवलेले सोलार कुलर फोर इन वन आहे. यामध्ये कुलरच्या बरोबरच सोलार बॅटरी आणि इनव्हर्टरही आहे. हे उन्हाळ्यात खोली थंड करण्याचे काम करते. तर उन्हाळा संपल्यानंतर इनव्हर्टरचे काम करते. साडेबारा हजार रुपयांपासून वेगवेगळ्या किंमतीमध्ये हे कुलर उपलब्ध आहे.

मी बनवलेला सर्वात छोटा आईस कार्ट १०८लिटरचा आहे असे महेश यांनी सांगितले. हा एकदा चार्ज झाल्यानंतर त्यामध्ये १६ ते १७ तास आईसक्रीम राहू शकते. तसेच त्यामध्ये ५० ते ६० लिटर पाणी साठवण्याचीही क्षमता आहे. या आईसकार्टची किंमत एक लाखापासून सुरु होते. महेश यांनी आजवर १५ आईस कार्टची हॉटेल मालकांना विक्री केली आहे. त्याच्या फ्रिजरची क्षमता पाचशे ते एक हजार लिटर इतकी आहे. मुंबईकर महेश यांनी आपला हा व्यवसाय चालवण्यासाठी विश्वामित्र इलेक्ट्रीकल अँड इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरु केली आहे. आता क्राऊड फंडिंगच्या मदतीने कंपनीचा विस्तार करण्याची त्यांची योजना आहे.

यासारख्या आणखी नाविन्यपूर्ण संशोधनपर कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.

घरातच तयार केले ग्लोबल उत्पादन ʻ हॅप्पीफॉक्सʼ

 सौरउर्जेतून गरिबांचे जीवन उजळून टाकणारी ‘बेअरफूट पॉवर’

६३ नकार पचवूनही पराभव नाहीच, नवीन-कौशिक जोडी अखेर जिंकलीच

लेखक - हरिश बिश्त

अनूवाद - डी.ओंकार

Related Stories