आठ सेलेब्रिटीज् जे दररोज योगा करतात, आणि त्याचा लाभ मिळवतात!

0

योगाचे महत्व युगानुयुगे चर्चिले गेले आहे. असे आयुध ज्याने एखाद्याला मन, शरीर आणि श्वास यांचे नियमन करता येते, ज्याला जगभरातून मान्यता आणि लोकप्रियता लाभली आहे. योग जे कधीकाळी केवळ आध्यात्मिक साधना म्हणून पाहिले जात होते, आता शरीर साधना आणि आत्मसंयमनाचे तसेच व्यायामाचे साधन बनले आहे.


अनेकांना त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी होणा-या लाभांवर विश्वास आहे, आणि योगाच्या माध्यमातून अधिक निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत.  चला त्या सेलब्रिटीबाबत जाणून घेवूया जे दररोज योगाच्या माध्यमातून निरोगी जीवन अनुभवताना इतरांनाही प्रेरणा देत आहेत.

करिना कपूर-खान

अशी अभिनेत्री, जिच्या झीरो फिगर शरीराकडे पाहून कुणालाही तिचा हेवा वाटावा. करीना त्यांच्या  फिटनेसचे श्रेय योगाला देतात. करिना दररोज  ५० सूर्य नमस्कार घालतात. त्यासाठी त्यांना ४५ मिनीटे लागतात,  करीना योगाच्या माध्यमातून स्वत:ला शारिरीक तंदूरूस्तच ठेवत नाहीत तर मानसिक चिंता पासून मुक्त ठेवतात.

शिल्पा शेट्टी- कुंद्रा

या अभिनेत्रीच्या अनेक डिव्हीडी प्रसिध्द झाल्या आहेत, ज्यात त्या वेगवेगळी आसने करताना दिसतात, जेणेकरून योगाचा प्रचार आणि प्रसार करता यावा. मानदुखी आणि स्पॉन्डीलायसीस सारख्या आजाराने त्रस्त झाल्यावर त्यांनी व्यावसायिक योगाचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले आणि त्यातून त्यांना पूर्णत: फायदा झाला. स्वत:हून याबाबत बाजू मांडताना त्या योगाला आपल्या फिटनेसचे रहस्य असल्याचे सांगतात.

अक्षय कुमार

त्यांच्या मार्शल आर्टच्या छंदाबद्दल माध्यमे आणि त्यांचे चाहते यांना माहिती आहेच. असे असले तरी एकूणच त्यांच्या शारिरीक तंदुरूस्तीचा भाग म्हणून ते रोज योगासने करतात आणि ध्यान धारणा देखील!

सिध्दार्थ मल्होत्रा

सिध्दार्थ यांचा कटाक्ष फिटनेसवर असतो, आणि त्यांनी नवनविन पध्दतीने स्वत:ला नेहमी तंदुरूस्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, मग ते सायकलिंग असो किंवा बास्केटबॉल खेळणे असो. ते योगाही करतात आणि त्यांनी त्यांची छायाचित्रे समूह संपर्क माध्यमातून जारी केली आहेत, ज्यात ते योगाची विविध आसने करताना दिसतात.


मल्लिका अरोरा-खान

मल्लिका यांचा योगाशी परिचय करून दिला तो करिना कपूर यांनीच आणि त्या स्वत: आता योगाच्या चाहत्या झाल्या आहेत. त्या शक्ति-योग दररोज दोन तास करतात, मग त्यांचा दिनक्रम कितीही कठीण का असेना!


बिपाशा बासू

त्या योगा आणि तंदुरुस्तीच्या देशातील आदर्श मानल्या जातात. बिपाशा ज्या ठामपणे मानतात की निरोगी जीवन आणि जीवनशैली रोजच्या योगाच्या सरावानेच शक्य आहे.


लारा दत्ता

लारा या देखील अशा सेलिब्रेटी आहेत, ज्या रोज योगाचा सराव करतात, त्यांच्या यू ट्यूब वाहिनीवर त्यांचे योगासने करतानाचे व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. त्यांनी त्यांच्या गरोदरपणातही पालकत्वाबाबतची योगासने केली आहेत.


नर्गिस फाखरी

नर्गिस, ज्यांची योगाशी ओळख त्यांच्या मैत्रिणीने करून दिली, योगाचा सराव २००६ पासून करत आहेत. त्यांना योगा केल्याने उत्साही वाटते आणि त्यातूनच त्यांना दिवसभर सक्रीय राहता येते असा त्यांचा विश्वास आहे.