ध्येयाने पछाडलेल्या दोन तरूणांची आयटी उद्योग क्षेत्रात गरुड भरारी

0

स्वप्नपूर्तीची इच्छा आणि ध्येय असेल तर माणूस जगात काहीही करू शकतो...याचा प्रत्यय आपणला अनेकदा आला असेल, पण कोणताही पाठिंबा नसताना फक्त काही तरी वेगळे करायचे या ध्येयाने पछाडलेल्या दोन तरूणांनी फक्त स्वत.ची आयटी कंपनीच सूरू केली नाही तर ती नावारूपालाही आणली. नोएडातील प्रांशू श्रीवास्तव आणि अभिषेक प्रताप सिंह या आयटी क्षेत्रातील दोन मित्रांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करून 'इनिकवर्ल्ड' ही कंपनी सूरू केली. नोएडातील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून प्रांशू व अभिषेक या दोघांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात हुशार असलेले हे दोघे महाविद्यालयातील अन्य कार्यक्रमातही हिरहिरेने भाग घेत असत. पण सुरूवातीसासून या दोघांना स्वत.चे वेगळे काहीतरी करण्याची तसेच कोणाच्याही मदतीशिवाय स्वत.च्या पायावर उभे राहण्याची इच्छा होती. ही इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. या दोघांनीही आपण काय करू शकतो, याचा विचार करण्यास सुरूवात केली. अभिषेक हा तांत्रिक कामात हुशार असलेल्याचे प्रांशूला माहिती होते तर प्रांशूचे मार्केटिंग ज्ञान प्रचंड असल्याचा अभिषेकला विश्वास होता. या दोघांनीही आपल्या जिद्दीचा चांगल्या ठिकाणी वापर करून स्वत.चे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांचे वय अवघे १९ वर्षे इतके होते.. प्रांशू सुरूवातीला स्वत.चे युट्यूब चॅनेल चालवत होता. ज्यामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हिडिओ ट्युटोरिअल्सचे प्रशिक्षण देत असे. त्याच्या चॅनेलला त्यावेळी उत्तम प्रतिसाद मिळत होता त्या दरम्यान अभिषेक फ्रिलान्सिंग करत होता...


२०१३ मध्ये दोघांच्या मनाचा निश्चिय झाल्यावर त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरूवात केली...पूर्ण माहिती घेतल्यानंतरच ते पूर्ण ताकदीने मार्केटमध्ये उतरले..त्यासाठी त्यांनी ग्रेटर नोएडातील अनेक कंपन्यांना भेटी दिल्या...या भेटीनंतर मिळालेल्या माहितीनंतरच त्यांनी काय करायचे याचा निर्णय घेतला. सर्व आवश्यक माहिती जमा झाल्यावर त्यांनी इनिकवर्ल्ड नावाची आयटी सर्व्हिस बेस्ड कंपनी सूरू केली.

दोघेही लहान असले तरी ते एखाद्या जाणकारासारखे विचार करायचे. त्यांनी सूरू केलेले काम वडिलधा-यांना सांगितले नव्हते. त्यांना स्वत.च्या पायावर उभे राहून आणि मेहनत घेऊन कमावलेल्या पैशांतून कंपनीचा विस्तार करायचा होता. पुढे लवकरच त्यांना एका कंपनीचे कामही मिळाले. मिळालेले काम दोघांनीही अहोरात्र मेहनत करून मुदतीच्या आत पूर्ण केल्यानं त्या कपनीचा दोघांवर अधिक विश्वास बसला आणि त्यांना पुढेही त्या कपंनीचे काम मिळत गेले. हळूहळू कंपनीचा मोठा विस्तार होत गेल्याने त्यांनी पहिल्या प्रोजेक्टनंतर स्वत.चा सर्व्हर घेतला आणि त्यापुढील त्यांच्या कामाला खरी गती आली. प्रांशू सांगतो की, आम्ही प्रोजेक्टबाबत अगदी मन लावून काम करतो आणि ग्राहकांचे काम मुदतीपूर्वीच दिल्याने त्यांच्यात एकप्रकारे विश्वासार्हता निर्माण होते. त्यामुळे एकदा आमच्याकडे आलेले ग्राहक पुढे भविष्यातही टिकून राहतात. किंबहूना त्यासाठी आम्ही काळजीही घेतो. कंपनीसाठी लागणा-या अटी आणि नियमांचे पालन करून ऑगस्ट २०१५ मध्ये कंपनीसाठी रितसर परवाना घेतला.


इनिकवर्ल्ड कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना आवश्यक ती वेबसाईट, मोबाईल अप तयार करून दिले जातात. त्याबाबत कोणतीही टेक्निकल अडचण निर्माण झाल्यास अवघ्या २ तासांत ती अडचण दूर केली जात असल्याचा दावा प्रांशू आणि अभिषेक करतात. प्रांशू आणि अभिषेक दोघे मिळून एखाद्या कंपनीच्या कामाचं प्रोफाईल तयार करून ते आकर्षक पद्धतीने जगासमोर प्रेझेंट करतात. कंपनीचे सर्व लेखी होत असलेले काम डिजीटल करून कंपनीला एकप्रकारे फायदा पोहोचवतात. त्यामुळे कंपनीला जास्त कर्ममचा-यांची गरज भासत नाही आणि कंपनीच्या वेळतही बचत होते. कंपनीत असेलली अटेंडन्स शीट, लॉग शीटसारखी कामे डिजीटल केल्याने कंपनीला कागदपत्रे ठेवण्याची गरज भासत नाही. कंपनीची सर्व कामे डिजीटल केल्याने सर्व माहिती सहज मिळू शकते.

एवढ्या कमी कालावधीत इनिकवर्ल्ड कंपनीकडे ५० हून अधिक नियमित ग्राहक असून सध्या दोघेही ६० हून अधिक प्रोजेक्टवर काम करत आहेत. कामाची पद्धत उत्तम असल्याने आणि दिलेले काम मुदतीपूर्वीच पूर्ण होत असल्याने कंपनीवरील विश्वास वाढत असून मिळणा-या प्रोजेक्टची संख्या वाढतच जात आहे. याबाबत प्रांशू सांगतो की अद्याप आम्ही मार्केटिंगवर पैसा खर्च केलेला नाही. फक्त सोशल नेटवर्किंग साईट्च्या माध्यमातून कंपनीचे मार्केटिंग सूरू आहे. असे असले तरी अधिकाधिक कामे ही माऊथ पब्लिसिटीमुळे मिळत असल्याचे प्रांशूने सांगतिले. इनिकवर्ल्ड कंपनीचे ग्राहक फक्त भारतातच नाहीत तर परदेशातही असल्याचा दावा दोघांनी केलाय.. कंपनीला अधिक काम मिळत असल्याने कंपनीने नोएडात एक ऑफिस घेतले असून त्यांच्यासोबत ५ जणांची एक टीम काम करत आहे. एकामेकांवर असलेला विश्वास हेच कंपनीच्या वाढीचे मुख्य कारण आहे. कंपनीतील सर्व सदस्य एकमेकांच्या टॅलेंटवर विश्वास ठेवत असून मिळालेला प्रोजेक्ट मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेतो..

प्रांशू आणि अभिषेक १९ वर्षांचे असताना काम सूरू केले. दोघांच्या संगनमताने कंपनीचे नाव ठेवले इनिकवर्ल्ड. इनिकवर्ल्ड ही आयटी सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात यांचे ग्राहक आहेत. स्वप्न तर सगळीच पाहतात, परंतू मोजकेच असतात ते आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जीवन पणाला लावतात..असेच एक स्वप्न पाहिले प्रांशू आणि अभिषेकने आणि त्याला पूर्ण करण्यासाठी या दोघांनीही दिवसरात्र मेहनत केली...ते यशस्वीसुद्धा झाले..