उद्योजकांना प्रेरणा देणारे १५ सिनेमे

उद्योजकांना प्रेरणा देणारे १५ सिनेमे

Saturday July 16, 2016,

7 min Read

image


१.स्टार्टअप डॉट कॉम (Startup.com)

२००१ मध्ये तयार करण्यात आलेला हा माहितीपट GoveWorks.com या स्टार्टअपच्या यश-अपयशावर आधारित आहे. कंपनीला भरपूर निधी उपलब्ध झाला असताना आणि व्यवसाय यशस्वीपणे सुरु असताना देखील संस्थापकाचे वागणे फारच विचित्र असते. ते फारच चिडखोर असतात. त्यांच्या विचित्र वागण्याने सर्वचजण त्रस्त असतात.

हा माहितीपट का बघावा ? या माहितीपटातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. विशेषतः नवउद्योजकांसाठी. जेव्हा तुमचा व्यावसायिक भागीदार तुमच्या मनासारखे वागत नाही तेव्हा किती भयंकर परिस्थिती निर्माण होते हे पाहायला मिळते. दुसरे म्हणजे तुमच्याकडे जेव्हा सुरक्षित निधी उपलब्ध असतो तेव्हा त्याचे आर्थिक नियोजन कसे करावे, याबद्दलची माहिती या माहितीपटातून मिळते.

२. फलॅश ऑफ जिनिअस (Flash of Genius)

ग्रेग किनियर याने बॉब केर्नस यांची भूमिका साकारली आहे. अधूनमधून पवनचक्क्या चालायच्या थांबल्यास त्याचा शोध घेणाऱ्या एक संशोधकाच्या भूमिकेत तो आहे. एक खूप कुशल तंत्रज्ञ असून सुद्धा केर्नस याला त्याने केलेल्या कठीणातील कठीण कामाचे कधीच श्रेय मिळत नाही. त्याने केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी तो कशा पद्धतीने लढा देतो हे या सिनेमातून बघण्यासारखे आहे.

हा सिनेमा का बघावा ? या सिनेमातल्या संकल्पना खूप महत्वपूर्ण आहे ज्या सर्वांना प्रेरित करतात. ज्या केर्नस याने मांडल्या आहे. ज्या फक्त प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यापुरत्याच मर्यादित नाहीत तर तुमच्या महत्वपूर्ण बौद्धिक संकल्पनेचे कशा पद्धतीने संरक्षण केले जाऊ शकते हेही या सिनेमाच्या माध्यमातून शिकायला मिळते.

३. गोस्फोर्ड पार्क (Gosford Park)

रॉबर्ट आॅल्टमन २००१ हत्येचे रहस्य हा एक फारच विनोदी सिनेमा आहे जो तुमचे मनोरंजन करत तुम्हाला खिळवून ठेवतो.

हा सिनेमा का बघावा तर सर्वात महत्वाचे म्हणजे आपले मनोरंजन होते. लोकांना आनंदी करणे म्हणजेच ग्राहकांना खुश करणे हा कुठल्याही व्यवसायाचा महत्वपूर्ण भाग असतो. हेलन मिरेन्स आणि त्याची पत्नी विल्सन यांनी हे खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहे. “ अशी कोणती भेटवस्तू आहे की तुमच्या घरातल्या विश्वासू नोकर हा तुमच्या मर्जीप्रमाणे वागतो आणि इतरांपासून दूर राहतो ? ही भेट म्हणजे त्याला हव्या असलेल्या गोष्टीची पूर्तता करणे. ही पूर्तता केल्यानंतर तो तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण करतो. तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा, आवडीनिवडी जपण्यास कायम तत्पर असतो”.

४. स्टीव्ह जॉब्स : वन लास्ट थिंग (Steve Jobs: One Last Thing)

२०११ साली स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर काही कालावधीतच पीबीएसने त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे प्रसारण केले. ज्यामध्ये या प्रभावशाली उद्यामिच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यश-अपयश पचवत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झपाटल्याप्रमाणे काम करत गरुडझेप घेणाऱ्या स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्यातील चढ-उतार यात मांडण्यात आले आहे.

हा माहितीपट का पाहावा तर तुम्हाला स्टीव्ह जॉब्स यांचे वैयक्तिक आयुष्य आणि यशस्वी कारकीर्द यातून काहीतरी शिकणे फार सोपे नाही.

5. दी गाॅडफादर (The Godfather)

हा सिनेमा प्रत्येकाने एकदा तरी पाहावा. फ्रांसिस फोर्ड कप्पोला या अमेरिकन सिनेदिग्दर्शकाने सिनेमाच्या इतिहासात दी गाॅडफादर ही एक उत्कृष्ट कलाकृती निर्माण केली.

हा सिनेमा का पाहावा ? या सिनेमातील गुन्हेगारी भाग वगळता त्यात मांडण्यात आलेल्या माइकल कोरलियोन (अल पचीनो) यांनी सुरु केलेल्या लहानश्या व्यवसायातून कशा पद्धतीने भरभराट होते आणि देशातल्या एका नामांकित व्यावसायिकामध्ये त्याचे रुपांतर होते. दी गाॅडफादर या सिनेमातून तुम्ही कसे यशोशिखर पादाक्रांत कराल आणि तिथेच स्थिर राहाल हे शिकायला मिळते.

६. रिस्की बिझनेस (Risky Business)

१९८३ मध्ये, टाॅम क्रूस यांनी आपल्या शर्टचे बटन काढत आणि दोन पायातील सॉक्सवर नृत्य करत पॉप संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आणि नावारूपाला आले. या त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते स्वतः आनंद मिळवत होते. मात्र नंतर काही गोष्टी हाताबाहेर गेल्या जेव्हा त्यांच्याकडून त्यांच्या पित्याच्या कारचा अपघात झाला.

हा सिनेमा का बघावा ? क्रूस याने साकारलेला जोएल याला अपघात झालेली कार पूर्ववत करण्यासाठी कशा पद्धतीने त्वरित निधी जमवावा लागतो. कधी कधी संकटकाळी किवा आपण हताश असताना सर्वोत्तम कल्पना आपल्या डोक्यात येते.

७. बीअर वार्स (Beer Wars)

२००९ साली प्रदर्शित करण्यात आलेल्या या माहितीपटामध्ये मित्रांचा एक ग्रुप मिळून स्वतःची एक बिअर कंपनी स्थापन करतात आणि यशस्वी होतात.

का बघावा ? एखाद्या उत्पादनाचे बाजारात अनेक दिग्गज खेळाडू असताना ते उत्पादन नव्याने तयार करत, आव्हानं स्वीकारत यशस्वी होणे. इतकेच नाही तर तुमचे उत्पादन इतरांपेक्षा कसे वेगळे आणि दर्जेदार आहे हे पटवून देणे हे ‘बीअर वार्स’ या माहितीपटाच्या माध्यमातून शिकायला मिळते.

८. अप इन द एअर (Up in the Air)

जॉर्ज क्लुनी आणि अॅना केंड्रीक या दोघांचीही अप इन द एअर या सिनेमात उल्लेखनीय अशी कामगिरी आहे. रायन बिंघम या व्यक्तिरेखेवर आधारित हा चित्रपट आहे. ज्याला देशभर प्रवास करावा लागतो आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे काम दिले जाते. केंड्रीक नटली किनरच्या भूमिकेत आहे, ती मात्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांगितलेल्या कामाची वेगळ्या पद्धतीने योजना आखते.

हा सिनेमा का पाहावा ? क्लुनी ही व्यक्तिरेखा प्रभावीच नाही तर कर्मचाऱ्यांना कमी न करता काम करून घेते, जे अतिशय प्रेरणादायी आहे. कर्मचाऱ्यांना कमी करण्यापेक्षा आपल्या व्यवसायाच्या मॉडेलवर पुन्हा एकदा विचार-विनिमय करून त्यावर काम करणे ही महत्वाची गोष्ट या सिनेमात अधोरेखित करण्यात आली आहे.

९. सेशन ९ (Session 9)

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गूढ रहस्यांनी भरलेल्या या सिनेमात एक उद्यमी आपला व्यवसाय बंद करतो आणि एका मनोरुग असलेल्या रुग्णालयात नोकरी पत्करतो. तिथे तो सोडून सर्वजण मनोरुग्ण आहेत. त्या ठिकाणी अनेक भीतीदायक चित्र-विचित्र घटना घडतात.

सिनेमा का बघावा ? पैसा अधिक मिळणार म्हणून मोहाला बळी पडता कामा नये. काही चांगल्या वाटणाऱ्या ऑफर्स त्रासदायक ठरू शकतात.

१०. कॉल ऑफ़ द इंटरप्रेन्योर (Call of the Entrepreneur)

खूपच प्रेरणादायी असलेला २००७ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा तीन वाहनचालकावर आधारित आहे. ज्यातील एक व्यावसायिक बँकर होता, दुसरा अपयशी दुग्धव्यावसायिक आहे तर तिसरा कम्युनिस्ट चीन पासून निर्वासित सदस्य आहे.

हा माहितीपट का बघावा ? यातल्या या तिन्ही व्यक्तिरेखा आपल्या स्वप्नपूर्तीसाठी धडपडतात, मोठाल्या जोखीम पत्करत कठीण प्रसंगानाही मोठ्या हुशारीने सामोरी जातात. जर या व्यक्तिरेखा यशस्वी होऊ शकतात तर आपण का नाही ?

११. कॉकटेल ( Cocktail)

१९८८ मध्ये ब्रायन फ्लानागन हा तरुण अनेक अडथळे पार करत एक बार सुरु करतो, हे काम करत असताना तो आनंदी असतो मात्र त्याच्यामध्ये एक अपराधीपणाची भावना असते. त्याच्या एकूणच वाटचालीवर हा सिनेमा आधारित आहे.

सिनेमा का बघावा ? नव्याने जे व्यवसाय करू पाहता आहेत, त्यांच्यासाठी हा सिनेमा पाहणं म्हणजे नुसतीच एक धमाल आहे. यामध्ये फ्लानागन ही व्यक्तिरेखा यशस्वी उद्योजक होण्यासाठी अनेक पुस्तके वाचतो, व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करतो, त्या संबंधित मार्गदर्शक पुस्तके वाचतो. मात्र जेव्हा तो प्रत्यक्षात व्यवसाय करतो तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येते की पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार ज्ञान यामध्ये खूप फरक आहे. यामध्ये त्याचे मार्गदर्शकही त्याला परिपूर्ण माहिती देत नाही.

१२. ऑक्टोबर स्काय ( October Sky )

या सिनेमामध्ये जेक ग्यालेनहल यांनी हॉमेर हिकमन ही व्यक्तीरेखा साकारली आहे. स्पूटनिकचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर प्रेरित होऊन त्यांच्या मित्रांनी स्वतःचे रॉकेट बनवायचे ठरवले. दुर्दैवाने, त्यांच्या शहरातून त्यांना सहकार्य मिळत नाही आणि त्यांनी कोळसा खाणीत काम करावे अशी अपेक्षा बाळगली जाते. मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि मार्गदर्शक यांच्या मदतीने ते आपले ध्येय गाठतात.

सिनेमा का पाहावा ? तुमच्यासाठी नियतीने काय ठरवले हे महत्वाचे नाही, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम पाठलाग करा. तुमच्या मार्गदर्शकावर विश्वास ठेवा. त्यांच्या मदतीने तुम्ही वाटचाल करा.

१३. टाॅमी बॉय ( Tommy Boy)

वडील वारल्यानंतर, टाॅमी काॅलहन ( चेरीस फर्ले ) आणि त्याचा कर्मचारी डेविड स्पेड अनिच्छेने कौटुंबिक व्यवसाय वाचवण्याकरिता रस्त्यावर काम करतात. जे खूप त्रासदायक असते. त्यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

सिनेमा का बघावा ? कितीही वाईट परिस्थिती आली तरी टाॅमी हा कधीच माघार घेत नाही. जरी सगळे संपले असे वाटले तरी तो लढत राहतो. त्याला त्याच्या आत दडलेल्या सेल्समनचा शोध लागतो आणि तो प्रत्येक दिवस सार्थकी लावतो. व्यवसाय करत असताना तुम्ही अनेक वेळा अपयशी व्हाल, तुम्हाला सर्व सोडून द्यावेसे वाटेल, पण तसे करू नका, प्रयत्न करत रहा तुम्हाला यश नक्की मिळेल.

१४.समथिंग वेंचर्ड ( Something Ventured)

२०११ मध्ये प्रदर्शित करण्यात आलेला हा माहितीपट सिलिकॉन व्ह्ॅली उपक्रमांतर्गत भांडवली व्यवसाय या दृष्टीकोनातून मांडण्यात आलेला आहे.

का पाहावा ? भांडवली विचार-प्रक्रिया समजून घेण्यास मदत होईल. व्यवसायासाठी निधी गोळा करत असताना तुमच्या जवळ तुमचा स्वतःचा सुरक्षित निधी असू द्या जो इतरांना माहित नाही.

१५. बॉईलर रूम ( Boiler Room)

बॉईलर रूम या सिनेमाला तुम्ही वॉल स्ट्रीट या सिनेमाची सुधारित आवृत्ती म्हणू शकता, म्हणजे ज्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा बाळगली जात नाही त्यांचा भाग्योदय होतो. विशेषत: शेअर बाजारातील उलाढालीमध्ये. या सिनेमाच्या शेवटी सेठ डाविस याला जाणवते की, दुसऱ्यांच्या पैशाने आपला भागोदय होणे यात काही अर्थ नाही

का पाहावा ? पुन्हा... आयुष्यात पैसाच सर्व काही नाही. बॉईलर रूम हा सिनेमा हे दाखवतो की आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण असणे म्हणजे यशस्वी होणे असे नाही. तर आपल्या ध्येयपूर्ती साठी योग्य मार्गाची निवड करणे हिताचे असते. एक संवेदनशील मनुष्यदेखील एक चांगला नेता असू शकतो.

लेखक : जॉन रॅमटन

अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील