लेफ्ट. कर्नल राजा चारी: नासाचे तिसरे मूळ भारतीय वंशाचे अंतराळवीर! 

0

नासाने १२ नव्या अंतराळवीरांची तुकडी सादर केली आहे, त्यात अमेरिकन भारतीय लेफ्ट. कर्नल राजा चारी यांचा देखील समावेश आहे. १८ हजार अर्जातून ज्या बारा जणांची निवड करण्यात आली त्यांना आता खडतर समजल्या जाणा-या प्रशिक्षणाला जावे लागणार आहे, ज्यामध्ये त्यांना अंतराळात वेगवेगळ्या स्थितीत, पृथ्वीच्या कक्षेत तसेच खोल अंतराळात कसे राहावे यांचे शिक्षण देण्यात येईल.


Image source: Huffington Post
Image source: Huffington Post

या तुकडीत सात पुरूष आणि पाच महिला आहेत. १९५९पासूनचा हा बावीसावा वर्ग असेल ज्यात अमेरिकेच्या अंतराळयात्रींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गेल्या वीस वर्षातील अंतराळयात्रीच्या प्रशिक्षणार्थींची ही सर्वात मोठी तुकडी आहे.

नासाचे अंतराळवीर राजा यांची अधिकृत ट्वीटर हँडलवरून नुकतीच  ओळख करून देण्यात आली.

Follow

NASA Astronauts

✔@NASA_Astronauts

Meet Raja Chari, one of our 12 #NewAstronauts! He's a @usairforce Lt. Col. from Cedar Falls, IA. Learn more: https://www.nasa.gov/astronauts/biographies/raja-chari …

403403 Retweets 1,6601,660 likes

याबाबतच्या वृतानुसार राजा, जे नोवाचे रहिवासी आहेत, यूएस एअरफोर्स अकादमीमधून पदवी परिक्षा १९९९ मध्ये उत्तिर्ण आहेत, त्यांनी अंतराळ विज्ञान या विषयात अभियांत्रिकी मध्ये पदवी मिळवली आहे, त्यांनी अंतराळ विज्ञान आणि अंतराळ शास्त्र यात मास्टर्स पदवीसाठी मास्च्यूसेट तंत्रज्ञान इंस्टीट्यूट येथे प्रवेश घेतला आणि यूएस नेवल टेस्ट पायलट स्कूल येथून पदवी मिळवली आहे.

३९ वर्षांचे चारी, हे ४६१व्या फ्लाइट टेस्ट स्क्वार्डनचे कमांडर आहेत, त्याशिवाय ते एफ- ३५ या एकत्रित टेस्ट फोर्समध्ये एडवर्ड एअरफोर्स बेस कँलिफोर्निया येथे कार्यरत आहेत. यासाठी अर्ज केलेल्यांना अनेक शारीरिक चाचण्यातूनही जावे लागले, त्याशिवाय काही शैक्षणिक चाचण्याही होत्या तसेच कामाचा अनुभव देखील पाहिला गेला. ज्यात हजार तास जेट विमान उडविण्याचा अनुभव सर्वात महत्वाचा होता.

या बाबतच्या वृत्ता नुसार, १२ निवड झालेल्या उमेदवारांमध्ये सहा लष्करातील अधिकारी आहेत. तीन शास्त्रज्ञ आहेत, दोन डॉक्टर आहेत,एक अभियंता आहे ज्याला अंतराळ अभियांत्रिकीचा अनूभव आहे आणि एक नासाचा संशोधक पायलट आहे.

या वृत्तानुसार, अमेरिकेचे उपाध्य़क्ष माइक पेन्स यांनी जॉन्सन स्पेस सेंटर येथे बोलताना सांगितले की, “ हे असे १२ स्त्री-पुरूष आहेत ज्यांनी स्वत:च्या अंगभूत गुणांच्या बळावर आमच्या देशाला नव्या शोधांच्या क्षेत्रात नव्या उच्चतम पातळीवर नेण्याचे ठरविले आहे आणि मला वाटते त्यांच्या कडून आमची मुले-नातवंडे नव्याने प्रेरणा घेतील, तुमच्या प्रत्येक कृतीकडे ते पाहत असतील ज्यात अमेरिकेच्या बाबतीतल्या गोष्टी तुम्ही भविष्यात घडविणार आहात”.