जर तुम्ही संकटात असाल तर शांत रहा. शांतपणे विचार केल्याशिवाय मार्ग सूचत नाहीत 

0

मागील महिन्यात भारतीय स्टार्टअपच्या विश्वाला दोन आश्चर्याचे धक्के मिळाले ज्यावेळी दोघा ऑनलाईन महत्वाच्या कंपन्या ‘मेकमायट्रीप’ आणि ‘गोइबीबो’ यांनी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. या विलीनीकरणाने या विश्वाला आजवरच्या काळातील खूप मोठी शिकवण दिली आहे. या व्यवहारामागच्या कार्यकारणभावाची चर्चा करताना मेक माय ट्रिपचे सीइओ आणि अध्यक्ष दिप कार्ला म्हणाले की,“ २०१२-१३ पर्यंत, आम्ही जागतिक बाजारातील एक्सपेडिया सारख्या स्पर्धकांशी स्पर्धा करण्यात व्यग्र होतो. मात्र २०१३मध्ये, गोईबीबो ने महत्वाचा खेळाडू म्हणून स्थान निर्माण केले. त्यांच्या तांत्रिक सज्जता आणि दीर्घकाळ काम करण्याच्या तयारीने आम्ही भारावून गेलो.”कार्ला यांच्या मते, आमच्या पेक्षा गोईबिबोचे तंत्रज्ञान चांगल्या दर्जाचे होते. आणि विलीनीकरणामागे हे एक महत्वाचे कारण होते. जरी हा व्यवहार झाला असला तरी, मेक माय ट्रिपला अद्याप दोन परवानग्या मिळायच्या बाकी आहेत,( भागधारकांची परवानगी आणि कॉम्पिटिशन कमिशन भारत सरकार यांच्या आवश्यक त्या मान्यता.)

मोबाईलस्पार्क २०१६मध्ये एका ज्वलंत चर्चे दरम्यान, कार्ला यांनी मेकमाय ट्रिपच्या प्रवासातील काही कठीण काळातील अनुभव सांगितले. ते म्हणाले, “ आम्हाला पैशाचा वास आणि पैशाची उतरती कळा यांचा अनुभव आहे. हे त्यांच्यासाठी खूपच दु:खकारक असते ज्याने भूतकाळात खूप पैसा मिळवला आहे, आणि आता तंगी अनुभवतो आहे.”

असे असले तरी भारतामध्ये ऑनलाईन प्रवासी वाहतूक उद्योग मोठ्या प्रमाणात सवलती देतात. या सवलतीच्या प्रतिकूलतेबाबत बोलताना कार्ला म्हणाले की, “ आम्ही वर्षभर सवलती देणे बंद केले तर बाजारात आमची उपेक्षा सुरू झाली. आता, गोईबिबोसोबत, आम्ही सवलतीचा दर खाली आणण्याचा आणि कमाईचा विचार करतो आहोत”. त्यांनी पुढे सांगितले की, “ दोन वर्ष आम्हाला चांगला महसूल मिळाला.(२०१२पूर्वी). मात्र ज्यावेळी किंगफिशर लयास गेली, त्याचा परिणाम ऑनलाईन प्रवाशी कंपन्यावर झाला. किंगफिशरचा अस्त आणि गोईबिबो यांच्यासारख्या कंपन्यांशी स्पर्धा यातून आम्ही घाट्यात गेलो” ते म्हणाले.

हवाई प्रवासाची तिकीटे हा ग्राहकांना आकर्षित करण्याचा चांगला मार्ग होता. त्यातून सेवांचे चांगले जाळे तयार झाले होते. मेक माय ट्रिपने तेच केले. ऑनलाईन प्रवासी कंपन्यात साचलेपणा येवू लागला त्यावेळी कंपनीने हॉटेल आणि इतर पूरक व्यवसायांवर लक्ष दिले.

व्यावसायिकाला नेहमी वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करायचा असतो, आणि त्यातून निभावून जाताना त्यांच्यासाठी खास काहीतरी मार्ग तयार होतो. अश्या वेळी काय केले? असा प्रश्न केला त्यावर कार्ला म्हणाले की, “ मी एबीएन आमरो आणि जीई कॅपिटल मध्ये अशा लोकांसोबत काम केले होते की मला माहिती होते की जर तुम्ही संकटात असाल तर शांत रहा. शांतपणे विचार केल्याशिवाय मार्ग सूचत नाहीत आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द हवी.

या चर्चा करताना असा विषय आला की एखाद्याच्या शांततेचा भंग होण्याची वेळ येते त्यावेळी काय?, कार्ला म्हणातात की "काही वेळा अशा येतात त्यावेळी ते निराश होतात. माझी शांती गमाविण्याची वेळ काही महिन्यातून एकदा तरी येतेच. मी नव्या चूका करत असतो पण त्याच त्या चूका पुन्हा करत नाही. मी नाराज होतो ज्यावेळी काही लोक त्याच त्याच चुका पुन्हा करताना दिसतात”. ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिले की काही कंपन्यानी लक्षावधीच्या किंवा त्यापेक्षा जास्त उंची गाठली. मात्र कार्ला यांना हा काळ विचित्र असल्याचे जाणवते. “या स्थितीला विचित्रच म्हणावेसे वाटते कारण अनेकदा आपल्याजवळ अशा स्थितीत तरून जाण्याची काहीच साधने नसतात. कंपन्याची मूल्य मागणी आणि पुरवठ्याच्या गतीवर ठरत असतात. मुल्यांकन विसरून जा आणि मूल्य तयार करण्याचा प्रयत्न करा. मुल्यांकन काही प्रत्यक्षात नसते. ते कागदावर असते आणि आपण जे कल्पनेत आहे ते काही प्रत्यक्षात स्विकारू शकत नाही” कार्ला म्हणाले. शेवटी ते म्हणाले की,

“कुणीतरी आले आणि म्हणाले की, मी दोन दशलक्ष डॉलर्सची व्यवस्था करतो. तुमची तयारी असू द्या नाहीतरी दुसरा कुणीतरी येईल आणि जेवून निघून जाईल. तुमचा स्पर्धात्मक फायदा निर्माण करा.

लेखक : जय वर्धन