संमोहन चिकित्सक ते बेकरी व्यावसायिक, उज्ज्वला पटेल यांचा अनोखा प्रवास

0

ज्या पालकांची मुलं लहान असतात ते पालक तक्रार करतात की, ' माझी मुलं हिरव्या पालेभाज्या खात नाहीत. मला कळत नाही काय करावं ज्यामुळे त्यांच्या रोजच्या आहारात पालेभाज्या असतील.

उज्ज्वला पटेल यांना पण ही समस्या सतावत होती आणि शेवटी प्रश्न अनुत्तरीतच राहायचा की, मुलीच्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश कसा होईल. त्याचवेळी त्यांना एक कल्पना सुचली, "हिरव्या पालेभाज्यांचे केक आणि कुकीज बनवल्या तर, म्हणजे तिच्या रोजच्या आहारात हिरव्या भाज्या जातील याची खात्री होईल." उज्ज्वला त्यांची बेकरी व्यवसाय सुरु करण्यामागची आठवण सांगतात. यामुळेच त्या बेकरी व्यवसायात आल्या आणि त्यामुळेच त्यांनी स्वतःची बेकरी सुरु केली आणि त्या माध्यमातून त्यांनी कप केक आणि इतर पदार्थ तयार केले.


यामुळेच त्यांना त्यांच्या समस्येवर उत्तर मिळालं आणि त्यांनी भाज्या आणि गव्हाचं पीठ यापासून केक तयार करायला सुरवात केली. तिच्या पदार्थांमध्ये दुधी भोपळा, बीट, पालक, भोपळा, मेथी, मटार, रताळी, मका आणि काळी मिरी हे काही पदार्थ असतात.

या प्रत्येक वस्तूंपासून ती केक आणि कुकीज सहित दोन पदार्थ तयार करते.

या सगळ्या पदार्थांमध्ये रसायनं आणि इतर बाहेरचे पदार्थ तसंच बेकिंग पावडरही नसते. उज्ज्वला यांनी तयार केलेले केक आणि कुकीज आपल्या मुलांच्या आहाराची काळजी करणाऱ्या आयांमध्ये फार लोकप्रिय आहेत.


गुलाबी पऱ्या आणि हिरवे राक्षस

जेव्हा आईने तयार केलेली गुलाबी परी आणि हिरवे राक्षस उज्ज्वला यांच्या मुलीला आवडायला लागले, तेव्हा आपल्या मुलीच्या रोजच्या आहारात आवश्यक भाज्यांचा समावेश असावा यासाठी हा योग्य मार्ग आहे अशी उज्ज्वला यांना खात्री झाली.

हिरवे राक्षस म्हणजे पालका पासून बनवलेल्या कुकीज आणि केक होते. तर गुलाबी परी बीट पासून तयार केली होती. काही दिवसांचा प्रश्न होता, लवकरच त्यांच्या मुलीला रंगीबेरंगी पौष्टिक केक आणि कुकीज खायची सवय लागली.

एक दिवस त्यांच्या मुलीने हे रंगीत पदार्थ रोजच का नाही बनवत असं विचारलं. त्यावर आईने हे पदार्थ अधिक रुचकर बनवण्यासाठी अधिकाधिक भाज्या वापरायला सुरवात केली आणि त्यांच्या घरातील बेकरीत नवनवीन पदार्थ बनवण्याचे प्रयोग सुरु झाले.


संमोहन चिकित्सक झाली बेकरी उद्योजक

उज्ज्वला यांना २०१३ मध्ये दुसरी मुलगी होई पर्यंत त्या केक आणि कुकीज हे आवड म्हणून बनवायच्या. पण घरातली जबाबदारी वाढल्याने त्यांनी संमोहन चिकित्सक म्हणून काम करणं बंद केलं आणि पूर्णवेळ बेकरी व्यावसायिक झाल्या.

चंडीगडच्या पंजाब विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून उज्ज्वलाने भारतातल्या कॅलिफोर्निया संमोहन चिकित्सा इंस्टीट्यूट मधून प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या रेकी चिकित्सक म्हणून काम करायला लागल्या. " ही एक चिकित्सा पद्धती आहे ज्यासाठी लोक माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येत होते आणि मी त्यांना संमोहित करून त्यांच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घ्यायचे आणि त्यांच्या समस्येवर उपाय सांगायचे. असं उज्ज्वला सांगतात. त्यांना त्यांचं हे वेगळ्या प्रकारचं काम करायला फार आवडायचं, पण घरात एक लहान मुल असताना हे काम करणं अवघड होतं.

त्या सांगतात, संमोहन चिकित्सक म्हणून काम बंद करण्याचा निर्णय अवघड नव्हता, कारण केक आणि बिस्किट्स बनवणं त्यांना आवडायचं आणि १० वीत असताना बेकरी पदार्थ बनवण्याचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला होता."माझ्या मुलांसाठी तयार केलेले बेकरी पदार्थ मी माझे नातेवाईक आणि ज्यांना मुलं आहेत अशा मित्र मैत्रिणींना दिले तेव्हा, तुझ्यात बेकरी पदार्थ बनवण्याचं कौशल्य आहे, तू हा व्यवसाय सुरु कर असे सगळे म्हणाले," असं उज्ज्वला सांगतात.

हा विचार कृतीत आला १५ ऑगस्ट २०१५ ला आणि केक कप आणि इतर काही पदार्थांची निर्मिती झाली. हा दिवस उज्ज्वला साठी स्वातंत्र्याचा दिवस होता असं त्या सांगतात.

भाज्यांपासून तयार केलेल्या केक आणि कुकीज

भाज्यांपासून बनवलेल्या कुकीज या इतर केक प्रमाणेच तयार केल्या जातात. फक्त कणिक मळताना त्यामध्ये भाज्या टाकल्या जातात, हे त्याचं वैशिष्ठ्य आहे. काही भाज्यांची त्या प्युरी बनवतात तर काही भाज्या बारीक करून घेतात तर काही भाज्या मिक्सर मध्ये घालून बारीक करतात आणि पिठात मिसळतात. बीटामुळे केक आणि कुकीज का हलका गुलाबी रंग येतो तर भोपळ्यामुळे पिवळा रंग येतो. आणि हे रंग लहान मुलांना आकर्षित करायला पुरेसे आहेत.

सध्या सर्वसाधारणपणे उज्ज्वला दिवसातून १० ते १५ असे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ तयार करतात आणि सध्या तरी बेंगळूरू मधील या पदार्थांना असलेली मागणी त्या पूर्ण करू शकतात. त्या बेंगळूरू मध्ये स्थायिक आहेत. त्यांचं मूळ गाव बोकारो मधून उज्ज्वला दिल्लीला गेल्या आणि उच्च शिक्षणासाठी चंडीगढला गेल्या.

उज्ज्वला कमीतकमी अर्धा किलो केकची ऑर्डर घेते आणि तो केक बनवून द्यायला साधारण एक दिवस लागतो. एखाद्या कार्यक्रमासाठी केक आणि कुकीज हव्या असतील तर काही दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते.

लेखिका : सास्वती मुखर्जी

अनुवाद : श्रद्धा वार्डे

Related Stories

Stories by Team YS Marathi