तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुरुष महिलांपेक्षा वरचढ नसतात : प्रतीक्षा नायर

0

प्रतीक्षा नायर महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि एक कॉम्पिटेटिव्ह कोडर आहे. तिचं असं ठाम मत आहे की , ज्या महिला करीयरच्या मध्यात काम थांबवतात त्यांनी मुलं मोठी झाल्यावर पुन्हा कामाला सुरवात करावी.

केरळ मधल्या कोल्लम मध्ये प्रतीक्षा चा जन्म झाला. तिच्या आयुष्यातील ९ वर्ष ती बेंगळूरू मध्ये राहिली. त्यानंतर तिचे कुटुंबीय त्रिवेन्द्रम ला राहायला गेले. ती २०१४ मध्ये पुन्हा बेंगळूरूला परतली. इंटरनेशनल इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी या संस्थेत ती पाच वर्षांचा एम टेक हा अभ्यासक्रम शिकत आहे. (IIIB)


कोडींग करणारी मुलगी

ती आठवीत असल्यापासूनच संगणक विज्ञान आणि प्रोग्रामिंग शिकली. तिला तेव्हापासूनच प्रोग्रामिंग आणि कोडींगची आवड होती. " प्रोग्रामिंगचे प्रश्न वेगवेगळे तर्क लावून सोडवायचे हे मला फार रंजक वाटायचं, याचं अजून काही योग्य उत्तर असेल का? कोड अजून संक्षिप्त करता येईल का? या प्रश्नांची उत्तरं देताना किंवा हे प्रश्न सोडवताना मला माझी आवड लक्षात आली. रिकाम्या वेळात असे प्रश्न सोडवणे मला फार आवडायला लागलं."

तिची प्रोग्रामिंग आणि कोडींगची आवड जोपासता जोपासता ती काहीच दिवसात कॉम्पिटेटिव्ह कोडींग क्षेत्रात आली. कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग सुरु करून तिला एक वर्ष झालं असेल. तिची पहिली आठवण ती सांगते," माझी पहिली स्पर्धा फारच मनोरंजक होती. मला फक्त एकच प्रश्न सोडवता आला आणि मी थोडी नाराज झाले होते. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी मला धीर दिला आणि सांगितलं की , ही फक्त सुरवात आहे. जर तू मनापसून प्रयत्न केलेस तर अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी तुला मिळणार आहे."

तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला

प्रतीक्षाच्या वर्गात ३३ मुलं आणि २९ मुली होत्या, म्हणजे १:१ प्रमाण. प्रतीक्षा उत्साहाने सांगते. हे आशादायी चित्र असतानाही, जेव्हा आपण म्हणतो कि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुरूषांच वर्चस्व आहे तेव्हा ती लगेच प्रत्युत्तर देते," मला अजिबात असं वाटत नाही की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांपेक्षा पुरुष सरस असतात, मला असं वाटतं दोघांची म्हणजे महिला आणि पुरुषांची क्षमता ही सारखीच असते. तिला असं वाटतं की , महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील वातावरण हे पारंपरिक रूढीवादी, लिंग भेद करणारं(पुरुषांचं वर्चस्व असणारं) असतं त्यामुळे महिला आयटी क्षेत्रात यायला धजत नाहीत.


महिलांचा श्रामामधील सहभागासंदर्भात बोलताना ती सांगते," आयटी क्षेत्रातील काम हे मनोरंजक नसते किंवा महिलांमध्ये असलेल्या कौश्ल्यापेक्षा अधिक कौशल्याची गरज असते. वैद्यक क्षेत्र, वास्तुविशारद, परिचारिका किंवा फॅशन तंत्रज्ञान याकडे त्यांचा अधिक कल असतो. पण आता पहिल्यापेक्षा अधिक महिला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत.

मैलाचा दगड

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रुळताना, तीला डाटा एनालीटीक्स म्हणून काम करायचं आहे. "मोठ्या प्रमाणवर डाटा किंवा आकडेवारी हाताळणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे, आणि आजच्या काळात त्याचा प्रयोग किंवा वापर करणं म्हणजे अद्भुत आहे.मला डाटा संशोधका (साईन्टीस्ट) बरोबर काम करण्याची इच्छा आहे. (एखादा माझ्यासारखाही असावा)म्हणजे डाटा किंवा आकडेवारीच विश्लेषण करणे, त्याचं वर्गीकरण करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे.

फेसबुकची सी ओ ओ शेर्ली सांडबर्ग, गुगलची सुरक्षा कवच असलेली परिसा तब्रीझ या कर्तृत्वान महिला तिच्या आदर्श आहेत. हेकर्स रेंक विमन्स कप या स्पर्धेत भारतात ती तिसरी आली," हि कामगिरी प्रेरणादाई होती." तिच्या महाविद्यालयातील महिला जोडीदाराबरोबर ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेचा तिचा अनुभव ती हसत हसत सांगते," आमची सुरवात अतिशय उत्तम झाली होती, त्यामुळे सगळे प्रश्न वेगाने सोडवण्यास आम्हाला प्रेरणा मिळाली. भविष्यातील आमच्या कोडींग क्षेत्रातील कारकिर्दीत ही स्पर्धा म्हणजे मैलाचा दगड ठरली आहे."

करिअर आणि मातृत्व

प्रतीक्षा अजून लहान आहे, तरीपण आम्ही तिला विचारलं की , महिलांना घर आणि काम यामध्ये एका गोष्टीची निवड करावी लागते याबाबत तुला काय वाटत. " लग्नानंतर किंवा बाळंतपणानंतर महिलांनी काम सोडण्याची गरज आहे. पण तरीही मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. (सक्ती करू शकत नाही). काही महिलांना असं वाटतं की , उत्तम गृहिणी आणि आदर्श माता होण्यासाठी नोकरी सोडणं गरजेचं आहे. मला वाटतं या दोन्ही गोष्टीं व्यवस्थित हाताळणे गरजेचे आहे. तरीही महिलांनी मुलं थोडी मोठी झाल्यावर कामाला सुरवात करावी असं वाटतं." ती हे कळकळीने सांगते.

पुढील कारकीर्द

प्रतीक्षा तिच्या पुढील वाटचालीसाठी अतिशय उत्साही आहे. तिचं पदवी शिक्षण झाल्यावर तिला डाटा सायन्स या विषयात Phd करायची आहे. " डाटा सायन्स मधील नक्की कोणता विषय निवडायचा हे अजून मी ठरवलेलं नाही. कारण आता मी दुसऱ्या वर्षात शिकत आहे, आणि ते ठरवण्यासाठी अजून मला अनेक विषय शिकायचे आहेत." असं ती सांगते.

तिच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कारकिर्दीकडे वाटचाल करताना तिला प्रेरणा देणाऱ्या गोष्टींवर तिचा विश्वास आहे," सुधारणेला नेहमीच संधी असते, असं काहीतरी आहे ज्याच्यामुळे मी कधीच नाराज झाले नाही. काही वेळा मी माझ्या क्षमतांचा पूर्ण वापर करू शकत नाही, तेव्हा मी स्वतःला खात्रीशीर पणे सांगते, उद्याचा दिवस हा नवीन दिवस आहे. निराशा, उदासीनता किंवा आळस आला, तसंच यशाच्या काळात मी स्वतःला बजावत असते की , यापेक्षा अजून यश मिळवण्यासाठी किंवा अधिक चांगल्या वाटचालीसाठी अजून प्रयत्न करण्याची गरज आहे."

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : श्रद्धा वार्डे